आज गुरुद्वादशी निमित्त मी केलेली कविता ...
सदा तुझे रूप पाहो माझे नयन |
तू सगुण निर्गुण | गुरुदत्ता ||धृ. ||
तुझे गुणगान ऐकोत माझे श्रवण |
भजन कीर्तन | गुरुदत्ता ||१ ||
सदा माझे मुखी असो तुझे नाम |
तूंचि निजधाम | गुरुदत्ता ||२ ||
सुगंधी फुले मी तुजला अर्पियेली |
पावन होई घ्राण | गुरुदत्ता ||३ ||
काया वाचा मने घडो तुझी सेवा |
दर्शन देसी केव्हा? गुरुदत्ता ||४||
श्रीपाद वल्लभ स्वामी अक्कलकोट |
नमितो वैभव | गुरुदत्ता ||५||
-- शब्दांकित (वैभव दातार )
गुरुद्वादशी
💬 प्रतिसाद
प
पुंबा
Mon, 10/16/2017 - 14:50
नवीन
श्रवण म्हणजे कान वाटलंय काय तुम्हाला?
श्रवन म्हणजे पण 'ऐकणंच'..
- Log in or register to post comments
व
वैभवदातार
Mon, 10/16/2017 - 15:44
नवीन
श्रवण म्हणजे कान आणि ऐकणे असे दोन्ही अर्थ होतात.
ह्या अभंगात भाव जास्त महत्त्वाचा आहे. देवाचे नामस्मरण केल्याने कान सुद्धा तृप्त होवोत असे म्हणायचे आहे.
- Log in or register to post comments