Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

फुलवर (कॉलीफ्लॉवर)

प
पगला गजोधर
Mon, 10/16/2017 - 06:58
साहित्य: १ मध्यम कॉलीफ्लॉवरचा गड्डा बारीक गुच्छ काढलेला (गुच्छ साधारण जायफळाच्या आकाराएवढी) फोडणीसाठी: १ टेस्पून तेल (अर्ध नेहमीचं व अर्ध मोहोरीचं (ऐच्छिक), किंवा एकाच प्रकारचं तेल वापरू शकता ), १ टी स्पून चिमटी मोहोरी, १ कढीपत्त्याची डहाळी वाटण : ४ हिरव्या मिरच्या (**जास्त तिखट नको असेल तर डिसीड करून घ्याव्या) ८ लसूण पाकळ्या, १ इंच आले साल काढून कोथम्बीर छोटा बचकाभर, नखभर हळद लिंबाची फोड एक्स फॅक्टर (ऐच्छिक) : एक टीस्पून फिश सॉस , तीळ गार्निशसाठी ============================================================== पूर्वकृती : एका उघड्या पातेल्यात (कॉलीफ्लॉवरचे बारीक गुच्छ बुडतील व वर साधारण एक इंच पाणी येईल, एवढे ) पाणी घेऊन त्यात एक टीस्पून मीठ टाकावे व उकळत ठेवावे, पाणी खळखळा उकळू लागले कि त्यात फ्लॉवर टाकावा, साधारण २-३ मिनटे ठेवावा, **झाकण मारू नका.... साधारण तुम्ही खाता त्याच्या ८०% शिजले असे वाटते तेव्हा, गॅस बंद करा.... दोन तीन मिनिटे त्यात फ्लॉवर राहू देत .. **पातेल्यावर झाकण लावू नका.... मोठ्या जाळीतून सर्व पाणी काढून फ्लॉवर निथळत राहू द्या .... पाणी तिकडे उकळत असता मिनव्हाईल तुम्ही कोथम्बीर आलं लसूण, चिमूटभर हळद एक चमचा पाणी टाकून मिक्सरमध्ये वाटून घ्या... ================================================================== कृती: कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी घालावी, मोहरी तडतडली कि लगेच कढीपत्ता टाकावा, कढीपत्ता टाकल्यावर लगेच २ सेकंदाच्या अंतराने वाटण घालावे (नाही तर कढीपत्ता जळू शकतो) साधारण २ मिनिटे परतावे. आलं लसूण फोडणीचा सुगंध दरवळू लागताच त्यात, आच मंद करावी, निथळलेला फ्लॉवर टाकावा. फ्लॉवर उलथणीने मसाल्यात माखून घ्यावा. छोटी लिंबाची फोड पिळावी. ऐच्छिकएक्स फॅक्टर वाले आता फिश सॉस फिरवून शिंपडतील. हलक्या हाताने परतत राहा, ३०-४० सेकंदाने गॅस बंद करा. तिळाने गार्निश करा. **फिश सॉस टाकणारे मीठ जरा जपून वापरा (कारण फिश सॉस स्वतः खारट असतो) गरम पोळी / फुलका बरोबर सर्व्ह करावी. Fl

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7420 views

💬 प्रतिसाद
र
रेवती Mon, 10/16/2017 - 11:26 नवीन
फोटू व कृती दोन्ही छान.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Mon, 10/16/2017 - 11:42 नवीन
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! तुम्ही वरील पाकृ मध्ये फेरफार करून, हिरव्या मिर्ची ऐवजी थोडं (लाल तिखट + लोणच्याचा मसाला ) टाकून , "अचारी (हिंदी: अचार ) फ्लॉवर" म्हणूनही सर्व करू शकता.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Mon, 10/16/2017 - 12:53 नवीन
कोबीच्या भाजीत फिश सॉस वाचुन आमचं देशस्थ इमान थोडं जळले. एरवी कोंबडं ते बोकुड सगळं चालतं पण कोबीच्या भाजीत फिश सॉस म्हणजे शुगर फ्री घालून पुरण वाटल्यागत झालं. असो. फिश सॉस जास्त वापरून खरपूस भाजता ही कोबी चकण्यात चालावी काय?
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Mon, 10/16/2017 - 13:18 नवीन
एक्स्क्यूजमी ... ? कोबी ?? फ्लॉवरची भाजी ... अहो ट्राय तर करून पहा ... जरा वेगळं काहीतरी .... माझ्या कन्येने आज ताटातील सर्व सर्व-केलीली भाजी शहाण्या बाळासारखी खाल्ली ... तिला तर चायनीज ची आठवण आली (फॉर लॅक ऑफ प्रॉपर वर्ड ... )
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 10/16/2017 - 16:39 नवीन
नागपूरकर असतील ते, त्यांच्याकडे फुलगोभी आणि पत्ता गोभी असतो ना.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 10/17/2017 - 06:54 नवीन
फुल'कोबी' म्हणतो बुआ आम्ही, अन आम्ही नागपूरकर नाही, सातारकर आहोत, किंवा होतो म्हणा एकेकाळी :(
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Tue, 10/17/2017 - 09:18 नवीन
अहो फुल'कोबी' नव्या प्रकारे ट्राय तर करून पहा ... जरास वेगळं काहीतरी ....आवडली तर, मी 'सुकट + कांद्याची पात' याची रेसिपी टाकेन ...
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Mon, 10/16/2017 - 13:26 नवीन
मस्तं झटपट पाकक्रूती. फुलवर नाव पण आवडलं.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Mon, 10/16/2017 - 13:42 नवीन
लहानपणीचं आठवतंय की, आमची भाजीवाली फुलवर म्हणायची कॉलीफ्लॉवरला ... मला तर पत्त्यातल किल्वर चे चित्र फुलवरच्या भाजीत दिसायचे ... किती तरी दिवस फुलवर व किल्वर हे एकच समजायचो ...
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 10/16/2017 - 19:44 नवीन
भाजी आवडली, स्वाती
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 41 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 53 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 57 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा