Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

समजूत

द
दिपक लोखंडे
Mon, 10/16/2017 - 06:02
💬 2 प्रतिसाद
"अनुराधा.. अग कुठं आहेस तू? कुठं लपलियेस.. अनु.." "अहो.. परत त्या पिंपळाच्या झाडापाशी गेलेय ती.." "काय सांगताय?.." "हो.. जे बघितलं तेच सांगतेय.." "बरं.. मी बघतो.." "अनु.." "हो, आले आजोबा.." "बेटा कुठं होतीस? असं संध्याकाळी बाहेर फिरणे ठीक नाही.." "का?.. काय होतं संध्याकाळी बाहेर फिरल्याने?.." "अगं.. ते पिंपळाचं झाड आहे ना, त्याच्यावर रात्री एक म्हातारा येऊन बसतो.." "तुमच्यासारखा?.." "छे.. नाही तो खूप वाईट असतो, तुझ्यासारख्या लहान मुलींना आपल्या जाळ्यात फासून त्याचं रक्त पितो.." "अय्या खरचं?.. तुम्ही कधी बघितलं त्याला?" "मी.. मी नाही गेलो कधी तिकडे.. " "मग तुम्हाला कसं माहीत?.." "मला.. मला माझ्या आईनं सांगितलं." "बरं.. पण आजोबा माझी आई कुठं आहे?.." "अं.." "सांगाना आजोबा.." " तुझी आई देवाकडे गेले.." "देव बाप्पाकडे?.." "हो.." "मग ती परत कधी येईल?.." "तू जेंव्हा त्या रात्री पिंपळाच्या झाडाकडे जायचं बंद करशील तेंव्हा.." "पण का.. मला आवडतं तिथं बसायला.. आणि हे तर आईला पण माहीत आहे.." "ते मला माहित नाही.. तुझी आई म्हटली की तू तिथं जाणं बंद केल्याशिवाय ती परत येणार नाही.." "बरं.. मी नाही जाणार तिकडे. तुम्ही आईला लवकर यायला सांगा.." "हो.. बर, तू जा आत.. टी.व्ही. लाऊन बस.." "आज काय समजूत काढली तिची?.." "काही नाही.. परत तीच समजूत.. आणि परत तोच प्रश्न.. माझी आई कुठं आहे.." "अहो, असं किती दिवस चालणार.. मी काय म्हणते, आपण तिला एकदा स्पष्टच सांगितलं तर.." " छे!.. काय बोलताय तुम्ही.. सात वर्षाचं पोर आहे ते.. त्याला काय समजावणार?.." " पण.." " पण वगैरे काही नाही.. ह्या सगळ्यावर विचार करायला अनु अजून लहान आहे.. योग्य वेळ आल्याशिवाय तिला असलं काही सांगणं ठीक नाही.." " मग काय.. रोज कशी समजूत काढायची तिची?.." " जशी आज काढली.."

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1618 views

💬 प्रतिसाद (2)
स
सिरुसेरि Mon, 10/16/2017 - 12:08 नवीन
निशब्द . सुन्न .
  • Log in or register to post comments
प
पुंबा Mon, 10/16/2017 - 14:34 नवीन
अपूर्ण आहे काय गोष्ट?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    4 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    4 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    4 days ago
  • सुंदर !!
    4 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    4 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा