Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • संस्कृती..
  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न (वाविप्र)
  • गणेशचतुर्थीला शुभारंभ!
  • «
  • ‹
  • 4773
  • 4774
  • 4775
  • 4776
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

मायक्रोव्हेव स्पेशल : बेसन लाडू

इ
इशा१२३
Sun, 10/15/2017 - 20:40

Ladu
नमस्कार मंडळी! दिवाळीचा फराळ करायला सुरवात झालीये.दरवर्षी प्रमाणे या वर्षीही बेसन लाडू मायक्रोव्हेवमधे केलेत.मायक्रोव्हेवमधे होणार्या सोप्या,झटपट आणि खमंग लाडूची पाककृती देत आहे.
साहित्य: बेसन पिठ : ३ वाट्या
तूप :एक वाटी
पिठीसाखर :दोन वाटी
वेलदोडा पुड
काजु,बेदाणे
Sahity
कृती : प्रथम तूप पातळ करुन घेणे.मायक्रोव्हेवमधिल भांड्यात डाळीचे पिठ (जाडसर) (लाडू रवाळ होतात आणि पिठ खमंग भाजले जाते म्हणून डाळीचे जाडसर पिठ घ्यावे.)घेऊन त्यात पातळ तूप घालून मिश्रण एकत्र करुन घ्यावे.
आता मायक्रोव्हेवमधे हाय पॊवरवर हे मिश्रण दोन मिनिट भाजून घ्यावे.नंतर हे निट ढवळावे व पिठाच्या गाठी मोडुन घ्याव्यात व परत दोन-दोन मिनिट ठेवावे. प्रत्येकवेळी मिश्रण निट ढवळून परत ठेवावे.साधारण बदामी रंग आणि खमंग भाजल्याचा वास आला कि कमी पॊवरवर दोन दोन मिनिट दोन तिन वेळा ठेवावे.
Kruti
बेसन छान भाजले जाइल.नंतर गार झालेल्या मिश्रणात पिठीसाखर, वेलदोडा पुड,बेदाणे घालून लाडु वळावेत.वरुन काजू लावून सजवावेत. अतिशय कमी वेळात ,श्रमात व झटपट लाडू तयार .
Besan ladu


  • Log in or register to post comments
  • 5982 views


वाचनखूण लावा
| 5982 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
र
रेवती Sun, 10/15/2017 - 20:46 नवीन
वाह! आता दिवाळी जवळ आल्यासारखी वाटतिये. लाडू चांगले दिसतायत. मी तुला विचारणारच होते की लाडू रवाळ झाल्यासारखे वाटले ना. माझ्याकडेही तसेच झाले होते. घरी सगळ्यांना बीनरवाळ आवडतात म्हणून मी नेहमीप्रमाणे करते, अन्यथा हे लाडू मावेमध्ये करताना हात न दुखता बेसन भाजले जाते. ते सुखाचे वाटते. ;) मी पयली.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Mon, 10/16/2017 - 05:14 नवीन
सुरेख दिसत आहेत लाडू
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 10/16/2017 - 19:49 नवीन
रेवती म्हणते तसे दिवाळी आल्याची वर्दी ह्या लाडूंनी दिली आहे, :) छान दिसत आहेत बे ला. मी ही मा वे मध्येच भाजते बेसन.. स्वाती
  • Log in or register to post comments
म
मराठी अमर्यादित Tue, 01/30/2018 - 09:16 नवीन
छान दिसत आहेत लाडू...!! अजुन रेसिपि इथे http://www.marathi-unlimited.in/top-recipes/
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    16 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    16 hours 16 minutes ago
  • सुंदर !!
    16 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours 22 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: देवराजश्री
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:08
  • सदस्य: गबाळा
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:01
  • सदस्य: सन्केतनिमकर
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 05:46
  • सदस्य: सअप
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 23:36
  • सदस्य: Anuja
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 19:58
  • «
  • ‹
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781
  • 4782
  • 4783
  • 4784
  • 4785
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा