बुलेट घेतल्यापासूनचे सुखद क्षण
रोज ऑफिसला बुलेटवरच जातो. मनमोकळ्या स्वभावाच्या माझ्या बॉसशी ऑफिसात गप्पा मारताना सहजच म्हणालो, हैद्राबादपासून तीन-चारशे किलोमिटरच्या परिघात मी सर्वत्र बुलेटवर फिरलोय. एक स्कोडा, एक व्हॉल्वो, दोन टोयोटा आणि इतर किरकोळ, ही कौटुंबिक वापराची वाहने असलेल्या बॉसच्या डोळ्यात मनोमन कौतुक आणि (मी प्रवासाला वेळ काढू शकतो म्हणून की काय,) किंचित हेवा तरळला. त्यानं माझ्या पाठीवर थाप मारली व म्हणाला, “तू साला बहोत ऐश करता है!”
***
ऑफिसला जाताना मालकिणीला शाळेत सोडतो. तिला एक विद्यार्थी बालसुलभ-कौतुकमिश्रित-आदरानं म्हणाला “मॅडम आपके पास बुलेट है!”
***
गावाकडून हैद्राबादला खरेदीसाठी आलेल्या मित्रासोबत मीही कपडे घेतले. संध्याकाळी त्याला बसस्टॉपवर सोडून घरी परत निघालो. बंगीकॉर्डने बुलेटला सामान बांधण्यात नवीन काही नाही. कपड्यांची कॅरीबॅग पेट्रोलटाकीवर ठेवून, तिला बंगीकॉर्डने लेगगार्डला बांधून मी मोकळा झालो. बाजूच्या फूटपाथवर उभा असलेला एकजण हे सर्व पहात होता. त्याला बहुधा हा प्रकार नवीन असावा. माझी त्याच्याशी नजरानजर होताच त्याने भुवया उंचावून-मान डोलावून-मस्त स्मित देऊन मला दाद दिली.
***
बुलेट चा सायलेन्सर बदलून आवाज वाढवणे हे अयोग्यच आहे ... सालेन्सर असा बदलावा कि व्हॉल्युम कमी होईल पण आवाजाची प्रत सुधारेल (हे माझे वैयक्तिक मत )पण मुळात सायलेन्सर किंवा अन्य कोणताही कंपनीने दिलेला भाग बदलू नये. लोकं जास्ती क्षमतेचे लाईट लावतात, बल्ब बदलून हॅलोजन वाले बल्ब लावतात हे चुकीचे वाटते. कंपनीने वायरींग करताना या लोडचा विचार केला असेलच असे नाही त्यामुळे असे बदल करू नयेत असे स्पष्ट मत आहे. हँडल, सीट वगैरे बदलाचा गाडीच्या इंजिन / वायरींगवर लोड येत नसल्याने तो निर्णय आपला आपण घ्यावा.२५ वर्षे जुनी यझदी विकत घेऊन तो मॉडिफाय पण केली आहे ..अगदी इंजिन रिबोरिंग करून ओव्हरसाईझ पिस्टन टाकण्यापासून सर्व गोष्टी बदलल्या :)याबद्दल अधिक लिहा की राव.. असे काहीतरी आतापर्यंत कधीच केलेले नाही.