Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

खरं खरं सांगा

च — चुकलामाकला, Wed, 10/11/2017 - 16:08
तुमच्यासुद्धा मनामध्ये एक रेखा असते ना? उच्चार नसाल करत भले, पण एक रेखा असते ना? भले तुमची बायको सुशील सुंदर सुगरण, द्रुष्ट लागावी असं सुखी संसारीक जीवन. पण कधीतरी कुठ्ठतरी आठवण ही येतेच ना? सिलसिला बघताना मन गिरकी घेतेच ना? तुमच्यासुद्धा मनामध्ये एक रेखा असते ना? नसाल तुम्ही अमिताभ पण म्हणून काय झालं? साले उप्परवालेने भी असलं हार्ट दिलं. संस्कार बिस्कार,पाप-पुण्य,समाज काय म्हणेल? इमोशनल लोच्यामध्ये भिजत घोंगडे पडते ना? तुमच्यासुद्धा मनामध्ये एक रेखा असते ना? वाचताना कविता तुमच्या ओठी हसू फुललं. कुणी नाही ना आजूबाजूला हळूच बघून घेतलं. कुणी म्हणजे नक्की कोण तुम्हालाही कळलं. पण आणखी एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं. आपली 'जाया' कुणाची तरी रेखा असू शकते ना? तुमच्यासुद्धा मनामध्ये एक रेखा असते ना?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5276 views

💬 प्रतिसाद
प
पद्मावति Wed, 10/11/2017 - 16:45 नवीन
:) आपली 'जया' कुणाची तरी रेखा असू शकते ना? हा हा मस्तच.
  • Log in or register to post comments
प
पुंबा गुरुवार, 10/12/2017 - 06:40 नवीन
झकास्स!!
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया गुरुवार, 10/12/2017 - 06:43 नवीन
आवडली कविता ...
  • Log in or register to post comments
त
तिमा गुरुवार, 10/12/2017 - 06:46 नवीन
आमच्या मनांत रेखाच काय, मधुबाला, वहिदा, नूतन, मौशुमी अशा कित्येक असतात, आणि आम्ही उघडपणे, आमच्या जयाला हे कधीच सांगितलं आहे! आणि तिचाही, 'गर्जेल तो पडेल काय ?', या म्हणीवर नितांत विश्वास आहे.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 10/12/2017 - 12:48 नवीन
वरच्या यादीत फक्त माधुरी दिक्षीत अ‍ॅडवा, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 10/13/2017 - 03:29 नवीन
:):)
  • Log in or register to post comments
त
तिमा Fri, 10/13/2017 - 07:06 नवीन
वरच्या यादीत फक्त माधुरी दिक्षीत अ‍ॅडवा, नाही हो, ती आमच्या स्पेसिफिकेशनमधे बसत नाही. आम्हाला ती कायमच 'हिरड्याकुमारी' वाटत राहिली.
  • Log in or register to post comments
ज
जागु गुरुवार, 10/12/2017 - 07:01 नवीन
कालच्या अमिताबच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लिहीलेली दिसते.
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला गुरुवार, 10/12/2017 - 08:36 नवीन
सासं ना एक विनंती आहे . शेवटच्या ओळीत 'जया' च्या ऐवजी 'जाया' करता येईल का?
  • Log in or register to post comments
प
पुंबा गुरुवार, 10/12/2017 - 08:44 नवीन
नक्की? :प
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 10/12/2017 - 12:57 नवीन
<<<वाचताना कविता तुमच्या ओठी हसू फुललं.>>> ==>> खरोखर हसू फुलले..!!
  • Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ Fri, 10/13/2017 - 07:31 नवीन
मस्त कविता...!
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Fri, 10/13/2017 - 08:27 नवीन
हा हा हा ! अफलातुन कविता. नर हा निसर्गानेच पॉलिगॅमस केला आहे ( आल्या आता अनाहिता ) त्यामुळे रेखा काय बरीच मोठी लिस्ट असु शकते. ;-) बाकी आमच्या मनात ते स्थान पंजाब दा पुत्तरी 'प्रियांकाने' पटकावले आहे. ;-)
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Fri, 10/13/2017 - 09:28 नवीन
कोणाची तरी रेखा असू शकते !!!!!! लैच भारी वाक्य . आमच्याकडून एक पार्टी लागू तुम्हाला ...
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 10/13/2017 - 09:42 नवीन
आपली जया कोणाची तरी रेखा असू शकते !!
यासाठी टाळ्या !!
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 12/02/2017 - 08:06 नवीन
कसं सुटलं होतं वाचनातून शेवटचं वाक्य बुंगाट
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 12/04/2017 - 02:51 नवीन
आपलातुपला अमिताभ अन् आपलीतुपली रेखा.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 1 hour ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 2 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 2 hours ago
  • सुंदर !!
    3 days 2 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 2 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा