Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

धरणीचे मनोगत

व — वैभवदातार, Wed, 10/11/2017 - 15:45
हे गगनराजा , थांबव तव उष्ण किरण शरा तव ऊर्जेने मज दाह होतो विनविते तुजला आज धरा उष्ण वात वाहती भवती तप्त ऊन पडे निष्पर्ण त्या वृक्ष लताना पाहुनी धरणी रडे शुष्क होती नद्या जलाशय तडफडती त्यात जलचरे एकमात्र ह्या थेंबासाठी शांत विहग चहूकडे विचरे वासरमणी, तुझिया योगे जलचक्र फिरते ज्ञात आहे मला परी तल्खली होई जीवाची कशी समजावू मी तुला? तव अनलशरे तनूसी भेगा आता किती मी साहू? हे दिनमणी न कळे मजला तुजवीण कोणा मी पाहू? करद्वय जोडुनी नमिते तुजला थांबव हे तप्त आप वरुणराजा बरसआता शमवि मम शरीर ताप ---- शब्दांकित वैभव दातार

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 838 views

💬 प्रतिसाद
ह
हरवलेला Fri, 10/13/2017 - 16:22 नवीन
खूप छान ! "वासरमणी, तुझिया योगे जलचक्र फिरते ज्ञात आहे मला परी तल्खली होई जीवाची कशी समजावू मी तुला?" या ओळी मस्तच . धरणीची होणारी तल्खली अगदी अचूक शब्दात पकडली आहे. एक विनंती : तुम्ही हिवाळ्याच्या सुरवातीला पडणाऱ्या गुलाबी थंडीवर कविता करा ना.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 1 hour ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 2 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 2 hours ago
  • सुंदर !!
    3 days 2 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 2 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा