प्राध्यापक रिचर्ड थेलर यांना नोबेल पारितोषिक आणि बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स
अर्थशास्त्रातील सर्वोच्च मानाच्या नोबेल पारितोषिकासाठी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचेही नाव विचारात घेतले जात आहे असे क्लॅरीव्हेट अॅनॅलिटिक्स या कंपनीने म्हटल्याची बातमी शनीवारी ७ ऑक्टोबरला आली आणि अर्थशास्त्रातील हे मानाचे पारितोषिक नक्की कोणाला मिळणार याची उत्सुकता चाळावली गेली. त्यानंतर काही मिपाकरांशी ई-मेलवर चर्चा करताना रघुराम राजन यांना नोबेल पारितोषिक मिळायची शक्यता बरीच कमी आहे असे मी म्हटले होते. त्याचवेळी अर्थशास्त्रातील युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगोच्या बूथ स्कूल ऑफ बिझनेसचे प्राध्यापक रिचर्ड थेलर आणि जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक डॉनल्ड बोडरॉक्स यांना कधीतरी नोबेल मिळावे असे मला फार वाटते असे म्हटले होते. आज दुपारी रिचर्ड थेलर यांना नोबेल पारितोषिक जाहिर झाले आणि मला जी गोष्ट व्हावी असे वाटत होते त्यासाठी फार वर्षे थांबावे लागले नाही या विचाराने खरोखरच आनंद झाला.
या लेखातून प्राध्यापक रिचर्ड थेलर यांचे काम आणि त्यांचा विषय बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स याचा आढावा घेऊ.
प्राध्यापक रिचर्ड थेलर
क्लासिकल इकॉनॉमिक्स
मानवी समाजाची रचना कशी असावी, मनुष्यप्राणी विचार करताना नक्की कोणत्या गोष्टीचा विचार करतो याचे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. हा विषय मानवी स्वभाव आणि मानवी समाजाशी निगडीत असल्यामुळे मानवी संस्कृतीची सुरवात झाली आणि माणूस समाजात राहायला लागला तिथपासूनच सुरू झाला. अगदी प्लेटो आणि अॅरिस्टॉटल यांनीही विचार मांडले आहेत त्यातले अनेक अर्थशास्त्राशीच निगडीत आहेत असे म्हणायला हरकत नसावी. पण मध्ययुगाचा अंत आणि आधुनिक जगाची सुरवात यांच्या संधीकाळात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली तेव्हा आधुनिक अर्थशास्त्राचा पाया रचला गेला असे म्हणतात. तो पाया रचला अॅडम स्मिथ या स्कॉटिश तत्वज्ञाने. त्याने १७७६ मध्ये लिहिलेले An Inquiry into the Nature and Causes of the Wealth of Nations (थोडक्यात The Wealth of Nations) या पुस्तकातून तो पाया रचला गेला असे समजले जाते. हे पुस्तक म्हणजे एका अर्थी स्मिथने युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो मध्ये दिलेल्या व्याख्यानांवर आधारीत आहे. या पुस्तकात अॅडम स्मिथने ज्याला मार्केट इकॉनॉमी म्हणता येईल त्या पध्दतीचा पुरस्कार केला होता. त्या पुस्तकातील पुढील वाक्य बरेच प्रसिध्द आहे:
"Every individual... neither intends to promote the public interest, nor knows how much he is promoting it... he intends only his own security; and by directing that industry in such a manner as its produce may be of the greatest value, he intends only his own gain, and he is in this, as in many other cases, led by an invisible hand to promote an end which was no part of his intention."
या वाक्याचा असा अर्थ लावला जातो की माणूस हा मुळात स्वार्थी आहे असे अॅडम स्मिथला म्हणायचे आहे. प्रत्यक्षात अॅडम स्मिथला अभिप्रेत असलेला "own interest" चा अर्थ नक्की कोणता हे त्याने वेल्थ ऑफ नेशन्स या पुस्तकापूर्वी १७ वर्षे लिहिलेल्या "The Theory of Moral Sentiments" या पुस्तकात सापडेल. या पुस्तकात स्मिथ म्हणतो की प्रत्येक माणसात एक 'इनर सेल्फ' (ज्याला सद्सदविवेकबुध्दी म्हणता येईल) असतो आणि आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर या 'इनर सेल्फ' चे लक्ष असते. हा इनर सेल्फ एखाद्या निष्पक्ष पंचाप्रमाणे असतो. बहुतांश वेळी या इनर सेल्फला न आवडणारी कृती टाळण्याकडे माणसाचा कल असतो. तसेच माणसाची 'पॅशन्स' आणि हा निष्पक्ष इनर सेल्फ यांच्यात झगडा चालू असतो. कधी कधी पॅशन्सचा विजय होतो आणि इनर सेल्फ पराभूत होतो. तरीही आपल्याच कृतीकडे त्या इनर सेल्फचे लक्ष असते हे अॅडम स्मिथने अधोरेखित केले आहे. तेव्हा या इनर सेल्फला मान्य होईल अशी कृती म्हणजे "own interest" असा अर्थ अॅडम स्मिथला अभिप्रेत होता असे काही लोक म्हणतात.तरीही अॅडम स्मिथ म्हटले की तो अदृश्य हात आणि स्वार्थी माणूस हे चित्र उभे राहिलेच.
स्मिथने हे पुस्तक लिहायच्या ३८ वर्षे आधी म्हणजे १७३८ मध्ये गणितज्ञ डॅनिएल बरनॉली याने ज्या प्रकारच्या खेळांमध्ये नक्की निकाल काय लागणार हे माहित नसते (उदाहरणार्थ रॉलेट व्हिल, फासे इत्यादी) अशा खेळांमध्ये नक्की कोणत्या आधारावर माणसे निर्णय घेतात याविषयीची एक थिअरी मांडली. त्या थिअरीमध्ये 'युटीलिटी' (एका अर्थी समाधान) या एका संकल्पनेचा उल्लेख केला. विस्तारभयास्तव याविषयी अधिक लिहित नाही. पण थोडक्यात सांगायचे म्हणजे आपल्याकडील पैशातून आपण समजा काही संत्री आणि काही मोसंबी घेऊ शकतो. आपल्याला वाटल्यास आपण नुसती संत्रीच किंवा नुसती मोसंबीच किंवा काही संत्री आणि काही मोसंबी घेऊ शकतो. आता माणसे नक्की किती संत्री आणि किती मोसंबी विकत घेणार हे ठरवायचे कसे? तर त्यासाठी त्याने 'युटिलिटी' या संकल्पनेचा उल्लेख केला. संत्रे खाल्यावर समजा 'क्ष' एकक समाधान मिळते आणि मोसंबे खाल्ल्यावर 'य' एकक समाधान मिळते. (यातही जितकी जास्त संत्री/मोसंबी खाऊ त्याप्रमाणे जास्तीच्या खाल्लेल्य संत्र्या/मोसंब्यांची युटिलिटी कमी असते). तर माणूस अशा पध्दतीने संत्री आणि मोसंबी निवडेल ज्यातून त्याला मिळणारी एकूण युटिलिटी सर्वात जास्त असेल.
या संकल्पनेचा अर्थशास्त्रासाठी पुढे विलिअम स्टॅनले जेवोन्सने विस्तार केला. त्यानंतर आल्फ्रेड मार्शलने १८९० मध्ये लिहिलेल्या प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या पुस्तकात या संकल्पनेला आधार धरून आणखी अनेक मुद्द्यांचा उल्लेख केला. आल्फ्रेड मार्शलचे हे पुस्तक त्यानंतर किमान २०-२५ वर्षे अर्थशास्त्रावरील प्रमाण मानले जात होते आणि विद्यापीठांमध्येही ते पाठ्यपुस्तक म्हणून वापरले जात असे.
वरकरणी दिसायला हे साधेसरळ गणित वाटते. पण प्रत्यक्षात परिस्थिती तितकी साधी नाही. एक तर हे 'मॅक्झिमम युटीलीटी' चे गणित सोडवायचे तर संत्री आणि मोसंबी खाऊन नक्की किती युटिलिटी मिळेल हे त्या माणसाला माहित पाहिजे. आता एखाद्या गोष्टीपासून नक्की किती युटीलिटी मिळते या प्रश्नाचे उत्तर आकड्यात कसे देणार? आणि प्रत्यक्षात निर्णय घेताना संत्री आणि मोसंबी असा साधासरळ हिशेब नसतो तर इतरही अनेक घटक असतात. ते सगळे घटक माहित हवेत. आणि त्यातून विलक्षण गुंतागुंतीची युटिलिटीची गणिते करून माणूस निर्णय घेतो असे या सगळ्या मॉडेलचे सार होते. आणि अर्थातच या सगळ्या गोष्टी करता येण्यासाठी प्रत्येक माणूस 'रॅशनल' आहे हे गृहितक धरावेच लागेल. अन्यथा हे मॉडेल कोलमडेल. या रॅशनल माणसाची लक्षणे कोणती? तर ती व्हॉन न्यूमान आणि मॉर्गन्स्टिन या दोन प्राध्यापकांनी १९४७ मध्ये लिहिलेल्या एका पेपरमध्ये सापडतील. हा पेपर बर्यापैकी गुंतागुंतीचा आहे. तो पेपर वाचताना माझे तरी डोके आऊट झाले होते.
तेव्हा प्रत्यक्षात आपल्यापैकी कोणीही ही युटिलिटीची गणिते करून निर्णय घेत नाही त्यामुळे हे मॉडेल मनुष्यस्वभावाचे अचूक निर्देशक नाही हे तर नक्कीच. तरीही हे मॉडेल आणि त्या मॉडेलवर आधारीत इतर मॉडेल्स अर्थशास्त्रात अनेक वर्षे बर्यापैकी लोकप्रिय होती, अजूनही आहेत. ज्याला निओक्लासिकल इकॉनॉमिक्स म्हणतात त्याचा आधार या मॉडेलमध्ये आहे.
हर्बर्ट सायमन आणि जॉर्ज कॅटोना
आता मिपाकर मला विचारायच्या बेतात असतील की प्राध्यापक रिचर्ड थेलरचे काम नक्की कोणते हे लिहायचे सोडून भलतेच कुठले चर्हाट लावले आहे. पण हे सगळे लिहिले नाही तर त्यांचे काम नक्की कोणते होते हे समजणार नाही त्यामुळे हे सगळे रामायण लिहिणे गरजेचे आहे.
तेव्हा माणूस नक्की कसा विचार करतो म्हणजेच माणसाचे मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र याची सांगड घालायची गरज काही अभ्यासकांना वाटू लागली. यातूनच बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स पुढे आले. १९६० च्या दशकात पिट्सबर्गच्या कार्नेगी टेक विद्यापीठात (सध्याचे कार्नेगी मेलॉन) हर्बर्ट सायमन या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांनी आणि अॅन आर्बरच्या युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनमध्ये जॉर्ज कॅटोना या मानसशास्त्राच्या प्राध्यापकांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी हे काम सुरू केले. अर्थात १९६० च्या दशकात 'बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स' हा शब्दप्रयोग वापरला गेला नव्हता. माझ्या माहितीप्रमाणे तो शब्दप्रयोग सर्वप्रथम केला जॉर्ज कॅटोनांनी १९८० मध्ये. १९६० च्या दशकात कार्नेगी टेकमध्ये निओक्लासिकल इकॉनॉमिक्सने भारावलेले फ्रॅन्को मोडिग्लिआनीसारखे प्राध्यापक होतेच तर भविष्यात ज्याला बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स म्हटले गेले त्याने भारावलेले हर्बर्ट सायमन सारखेही प्राध्यापक होते. या दोन्ही प्राध्यापकांना भविष्यात अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. आणि हे दोघेही एकाच वेळी एकाच विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यावेळी कार्नेगी टेकमध्ये ज्यांना शिकायला मिळाले असेल त्यांचा हेवा वाटल्याशिवाय राहत नाही.
हर्बर्ट सायमन आणि जॉर्ज कॅटोनांच्या प्रयत्नांना त्यामानाने मर्यादित यश आले. त्याचे कारण त्यांच्या कामात काही कमी होती का? तर तसे नक्कीच नाही. माझ्या मते त्याचे कारण म्हणजे काळाचा महिमा. दुसर्या महायुद्धाच्या काळात आपली युध्दसामग्री, दारूगोळा इत्यादींचा सर्वात जास्त परिणामकारक वापर व्हावा यासाठी अनेक आघाडीच्या प्राध्यापकांची मदत अमेरिकन लष्कराने घेतली होती. मी माझा मिपा आय.डी ज्यांच्या नावावरून घेतला आहे ते मिल्टन फ्रिडमन सर्वात परिणामकारक ठरण्यासाठी दारूगोळ्यातील बॉम्बचा आकार नक्की किती असावा हे ठरवायच्या मॉडेलिंगमध्ये सहभागी होते. म्हणजे मोठा गोळा असेल तर अधिक भागावर तो परिणाम घडवेल पण त्यामानाने त्याची परिणामकारकता 'डिफ्युज्ड' असेल आणि लहान गोळा असेल तर तो कमी भागावर परिणाम घडवेल पण अधिक 'कॉन्सन्ट्रेटेड' असेल. अशाप्रकारे अनेक गोष्टींसाठी गणित आणि संख्याशास्त्राचा वापर केला आणि गरज ही शोधांची जननी असते या न्यायाने ऑपरेशनल रिसर्च, संख्याशास्त्र यातील अनेक नव्यानव्या गोष्टींचा उगम त्यातून झाला. त्यातूनच तो काळ आकडे, समीकरणे यांचा होता. त्या काहीशा रूक्ष वाटणार्या वातावरणात बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स तितकेसे परिणामकारक ठरले नाही.
बिहेविअरल इकॉनॉमिक्सची लोकप्रियता: डॅनिएल कॅनेमन आणि अॅमोस Tversky यांचे योगदान
पण १९७० च्या दशकात प्रिन्सटन विद्यापीठाचे प्राध्यापक डॅनिएल कॅनेमन आणि स्टॅनफर्डचे अॅमॉस Tversky या दोन मानसशास्त्राच्या प्राध्यापकांनी अनेक प्रयोग केले आणि त्यातून क्लासिकल इकॉनॉमिक्सच्या महत्वाच्या गाभ्यालाच (माणसे रॅशनल असतात) धक्का लावला. माणसे खरोखरच रॅशनल नसतात हे 'गट फिलिंग' कोणाला नसेल असे वाटत नाही. पण संशोधनाच्या जगतात नुसते 'गट फिलिंग' कामाचे नाही. तर आपले म्हणणे एका मॉडेलच्या स्वरूपात मांडता आले पाहिजे. कॅनेमन आणि Tversky यांनी अनेक प्रयोग केले, आकडेवारी गोळा केली आणि आपले मॉडेल मांडले. त्यांनी हे खूपच महत्वाचे काम केले. या सर्व प्रयोगांविषयी प्राध्यापक कॅनेमन यांनी Thinking, Fast and Slow या पुस्तकात विस्ताराने लिहिले आहे. जर एखादे पुस्तक वाचून आंतर्बाह्य हादरून जाणे म्हणजे काय हा अनुभव घ्यायचा असेल तर हे पुस्तक जरूर वाचावे ही विनंती. आपण फार रॅशनल आहोत असा आपल्या सगळ्यांचाच (विशेषतः आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांचा) समज असतो तो किती मोठा गैरसमज आहे याचा अनुभव ते पुस्तक वाचताना अगदी पदोपदी येतो.
ज्या गृहितकावर पूर्ण क्लासिकल इकॉनॉमिक्सचा डोलारा अवलंबून होता त्यालाच धक्का लावणे ही गोष्ट साधीसुधी नव्हती. या महत्वाच्या कामाबद्दल प्राध्यापक डॅनिअल कॅनेमनना २००२ मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. प्राध्यापक अॅमॉस Tversky यांचे त्यापूर्वीच निधन झाले होते म्हणून त्यांना नोबेल मिळू शकले नाही.
रिचर्ड थेलर आणि बिहेव्हिअरल फायनान्स
प्राध्यापक डॅनिअल कॅनेमन यांचे कार्य अफलातून होते यात तीळमात्र शंका नाही. पण ते मानसशास्त्रज्ञ असल्यामुळे त्यांचे काम जास्त मानसशास्त्राच्या अंगाकडे झुकणारे होते. निओक्लासिकल इकॉनॉमिक्सच्या पायालाच हादरवायचे काम त्यांनी केले. पण त्या बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्सच्या तत्वांचा अर्थशास्त्रात अधिक उपयोग कसा करता येईल याविषयी काम केले रिचर्ड थेलर यांनी.
अमेरिकेत विद्यापीठांमध्ये 'फ्रेशवॉटर स्कूल' आणि 'सॉल्टवॉटर स्कूल' हा प्रकार आहे.फ्रेशवॉटर स्कूल म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगो, कार्नेगी मेलॉन आणि युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टर यासारखी गोड्या पाण्याच्या ग्रेट लेक्सजवळ वसलेली विद्यापीठे तर सॉल्टवॉटर म्हणजे हार्वर्ड, प्रिन्सटन, कोलंबिया, बर्केले, यु.सी.एल.ए इत्यादी समुद्राजवळ वसलेली विद्यापीठे. फ्रेशवॉटर स्कूलमध्ये निओक्लासिकल इकॉनॉमिक्स, फ्री मार्केट आणि एकंदरीत उजव्या विचारांचे तर सॉल्टवॉटर स्कूलमध्ये समाजवादी, डाव्या विचारांचे प्राबल्य. आता हा फरक बराच कमी झाला तरी आहे पण प्राध्यापक थेलर पी.एच.डी झाले तेव्हा (१९७५ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टर या फ्रेशवॉटर विद्यापीठातून) फ्रेशवॉटरमधून पी.एच.डी झाल्यास सॉल्टवॉटरमध्ये (आणि व्हाईस-व्हर्सा) प्राध्यापक म्हणून घेतले जायचे प्रमाण बरेच नगण्य होते. त्यातून थेलर पी.एच.डी झाल्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगोच्या बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक म्हणून लागले (जिथे रघुराम राजन सध्या प्राध्यापक आहेत).
युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगोचा उल्लेख मुद्दामून करत आहे. कारण याच विद्यापीठात मिल्टन फ्रिडमन हे उत्युंग व्यक्तीमत्व एकेकाळी अर्थशास्त्राचे (बूथ स्कूलमध्ये नव्हे) प्राध्यापक म्हणून होते.) तसेच ज्यांना 'फादर ऑफ मॉडर्न फायनान्स' म्हटले जाते ते प्राध्यापक युजीन फामा हे पण बूथ स्कूलमध्येच प्राध्यापक होते. मिल्टन फ्रिडमन यांनी १९५० च्या दशकात फायनान्शिअल मार्केटमधील किंमती कशा ठरविल्या जातात याविषयी सुरवातीचे काम केले. त्यावेळी फ्रिडमनने म्हटले की सर्व फायनान्शिअल सेक्युरीटी (शेअर/बॉन्ड इत्यादी) त्यांच्या योग्य त्या किंमतीला (म्हणजे भविष्यात येणार्या सर्व कॅश-फ्लो ला डिसकाऊंट करून आलेल्या प्रेझेन्ट व्हॅल्यूला) विकल्या जातात. जर का काही काळ ही किंमत त्यापेक्षा वेगळी असेल तर 'आर्बिट्रेजर' त्याचा फायदा उठवतात आणि सर्व फायनान्शिअल सेक्युरीटींची किंमत त्यांच्या 'फंडामेन्टल किंमतीला' विकली जातील अशी परिस्थिती निर्माण करतात. १९७० मध्ये प्राध्यापक युजिन फामा (२०१३ चे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते) यांनी त्यात आणखी भर टाकून 'एफिशिएन्ट मार्केट हायपोथिसिस' मांडले.
प्राध्यापक रिचर्ड थेलर यांनी सुरवातीला एफिशिएन्ट मार्केट हायपोथिसिस वर बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स (किंबहुना बिहेव्हिअरल फायनान्स) च्या अंगाने काम केले. या हायपोथिसिससाठीही माणसे रॅशनल असतात हे गृहितक होते. थेलर आणि इतर प्राध्यापकांच्या कामातून फायनान्शिअल मार्केटमध्ये सर्व भाग घेणारे रॅशनल असू शकत नाहीत हे दाखवून दिले.
युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगोमध्ये राहून मिल्टन फ्रिडमन आणि युजीन फामा यांच्यासारख्या stalwarts चे काम पूर्णपणे बरोबर नव्हते हे दाखवून देणे ही खूप मोठी गोष्ट होती.
नज
इंग्लिशमध्ये नज (nudge) या शब्दाचा अर्थ आहे: "prod (someone) gently with one's elbow in order to attract attention.". रिचर्ड थेलर आणि हार्वर्ड विद्यापीठाचे कायद्याचे प्राध्यापक कॅस सनस्टीन यांनी अधिक चांगल्या पॉलिसी मेकिंग साठी 'नज' चा वापर कसा करता येईल याविषयी नज हे पुस्तक लिहिले आहे.
अर्थशास्त्रात नजचा अर्थ हा की जर समोरचा माणूस योग्य ते निर्णय घेण्यास सक्षम नसेल तर आपण अशी परिस्थिती निर्माण करायची ज्यातून तो माणूस योग्य तो निर्णय घेण्याकडे एका अर्थाने 'ढकलला' जाईल. म्हणजे आपण त्याला 'नज' करायचे. हे उदाहरणे देऊनच अधिक स्पष्ट करता येईल.
१. शाळेतील विद्यार्थ्यांना 'तुम्ही जंक फूड' न खाता फळे आणि सॅलड खा असे कितीही सांगितले तरी ते त्यांना पाहिजे तेच पिझ्झा बर्गर इत्यादी खाणार. म्हणून शाळेच्या कॅफेट एरिआमध्ये विद्यार्थ्यांचे लक्ष जाईल या उंचीवर पुढे फळे, सॅलड इत्यादी सकस खाणे ठेवायचे आणि जंक फूड मागे ठेवायचे.
२. अमेरिकेत अनेक कंपन्यांमध्ये रिटायरमेन्ट फंडांमध्ये इच्छा असल्यास तुम्ही सबस्क्राईब करा असा पर्याय असतो. त्यातून होते असे की सबस्क्राईब करायचे असेल तर त्यासाठी नव्या नोकरीच्या ठिकाणी जॉईनिंग फॉरमॅलिटी करताना मुद्दामून एक टिक करावा लागायचा. आपल्याला वाटेल की एका टिकमध्ये काय मोठेसे. पण प्रत्यक्षात तसे नसते. लोक बहुतांश वेळा जो काही 'डिफॉल्ट ऑप्शन' असेल तोच चालू ठेवतात. मग कल्पना अशी की डिफॉल्टच 'ऑप्ट-इन' ठेवला तर? म्हणजे कर एखाद्याला रि टायरमेन्ट फंडात पैसे गुंतवायचे नसतील तर त्याने/तिने बाहेर पडायच्या ऑप्शनवर टिक करावे. तसे न केल्यास 'बाय डिफॉल्ट' तो कर्मचारी आपोआप रिटायरमेन्ट फंडात गणला जाणार!!
म्हणजे डिफॉल्ट ऑप्शन समोरच्या माणसाच्या हिताचा ठेवायचा. याचा सर्वात नाट्यमय फायदा बघायला मिळाला युरोपात. ड्रायव्हर्स लायसेन्स काढताना 'अपघाती मृत्यू झाल्यास तुमचे अवयव इतरांना दान करावेत का' हा प्रश्न होता. ज्या देशांमध्ये 'बाय डिफॉल्ट' दान करावेत (आणि अवयव दान करू नयेत अशी इच्छा असेल तर टिक करून त्या माणसाने 'ऑप्ट आऊट' करायचे) हा पर्याय होता त्या देशांमध्ये ९०% पेक्षा जास्त लोकांनी तोच पर्याय निवडला. तर ज्या देशांमध्ये 'बाय डिफॉल्ट' अवयवदान करू नये हा पर्याय होता (आणि अवयव दान करावे अशी इच्छा असेल तर टिक करून 'ऑप्ट इन' करायचे) त्या देशांमध्ये १०% लोकांनीच अवयवदानाचा पर्याय स्विकारला होता.
नज या पुस्तकात अशी अनेक उदाहरणे आहेत. हा लेख आधीच प्रचंड मोठा झाला आहे म्हणून विस्तारभयास्तव ती टाळतो. एकूणच काय की कोणावरही कसलीही सक्ती न करता त्या माणसाच्या हिताचा निर्णय घ्यायला तो आपण होऊन उद्युक्त होईल अशी परिस्थिती निर्माण करणे म्हणजे 'नज'. इंग्लंडच्या सरकारने पब्लिक पॉलिसीमध्ये नज कसे अंमलात आणता येतील यासाठी रिचर्ड थेलर यांचा सल्लाही घेतला होता.
इफिशिएन्ट मार्केट हायपोथिसिस आणि नज याव्यतिरिक्त प्राध्यापक थेलर यांचे इतरही काम आहे. पण त्याविषयी लिहायचे झाले तर आणखी एक लेख लागेल. तेव्हा ते टाळतो. या लेखातून बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स या माझ्या अत्यंत आवडत्या विषयावर थोडेफार लिहायला मिळाले याचे समाधान वाटते.
लेख संपविण्यापूर्वी एक गोष्ट लिहितो. टोरोंटोमधील रॉटमन स्कूल ऑफ बिझनेसमधील प्राध्यापक दिलीप सोमण यांनी शिकॅगोमधील बूथ स्कूल ऑफ बिझनेसमधून पी.एच.डी केली आणि त्यांच्या डिफेन्स कमिटीमध्ये प्राध्यापक रिचर्ड थेलरही होते. आज रिचर्ड थेलरना नोबेल पारितोषिक मिळालेच आहे. त्यानंतर त्यांच्या दिलीप सोमण या विद्यार्थ्याकडूनही असेच काम व्हावे आणि आणखी १५-२० वर्षांनंतर त्यांच्यावरही असाच लेख लिहायची संधी मिळावी ही इच्छा.
रिचर्ड थेलरना नोबेल मिळाल्यानंतर खरं सांगायचं तर मला खूपच आनंद झाला आहे. त्यांच्यावर आणि बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्सवर एखादा छोटेखानी लेख आजच मिपावर लिहावा असे त्यांना नोबेल मिळाल्याची बातमी दुपारी वाचल्यापासून फार वाटत होते. (हा लेख छोटेखानी न राहता मोठेखानी झाला आहे ही गोष्ट वेगळी :) ) तसे करता आले याचे समाधान आहे.

माणूस रॅशनल नाही हे बर्याच अंशी मान्य करायला तरी काहीच हरकत नसावी.यावर जरासे... आधुनिक शास्त्रिय संशोधनासारखे कडक नियमांनी बांधलेले काही विशिष्ट विषय सोडले तर, सर्वसाधारण व्यवहारांत माणूस रॅशनल कधीच नव्हता. सर्वप्रथम, एखाद्या गोष्टीबद्दल रॅशनल निर्णय घ्यायला त्यासंबंधीची सर्व तथ्ये आणि आकडे उपलब्ध असायला हवे, जे सर्वसामान्यपणे उपलब्ध असणे शक्य नाही *. त्यानंतर, त्यांचा कार्यकारण संबंध लावायला योग्य ती व योग्य तेवढी बौद्धीक संपत्ती असायला हवी, जी सगळ्या सर्वसामान्य लोकांत असत नाही. वादाकरिता एखाद्या आदर्श व्यवस्थेत हे सगळे शक्य झाले आहे असे समजूया. तरीही... १. इतक्या सर्व प्रक्रियेतून जायला लागणारी चिकाटी सर्वसामान्य माणसात नसते आणि / किंवा तो सहजपणे गोंधळून जातो; आणि २. एवढे करून मिळणार्या खरोखरच्या रॅशनल निर्णयाचे फलीत सुखकारक असेलच असेही नाही ! अर्थात, ते सर्वसामान्य माणसांच्या गळी उतरणे / उतरवणे ही कठीण गोष्ट असते. सर्वसाधारणपणे, माणूसाची मूळ प्रवृत्ती, तत्कालिक परिस्थिती जमेल तसे "सेल्फप्रिझर्वेशन (स्व-जतन)" करणे आणि ते जमल्यानंतर "सेल्फ ग्लोरिफिकेशन (स्व-गौरव)" साधण्याकडे, केंद्रित असते. ते करण्याची प्रक्रिया आणि मिळणारे फलित, दोन्ही शक्य तेवढे सुखकारक व्हावे ही त्याची धडपड असते. शिवाय, हे करताना समान परिस्थितीतही प्रत्येक माणूस तोच निर्णय घेईल असे नाही कारण, प्रत्येकाच्या सुखाच्या अपेक्षा, फलिताच्या अपेक्षा आणि ते मिळविण्यासाठी 'प्रयत्न करण्याची, वेळ द्यायची व धोका पत्करण्याची' क्षमता वेगवेगळी असते. वरचे सगळे पाहता, सर्वसाधारण माणसाचे वागणे-बोलणे-निर्णय हे, त्याला उपलब्ध असलेली तथ्ये व आकड्यांपेक्षा जास्त; त्याच्या अपेक्षा, वैयक्तिक "भीती आणि लोभ (fear and greed) व (असलेच तर) भूतकालातील तत्सम अनुभव यांच्यावर शक्य असलेल्या फलिताच्या कल्पनेवर अवलंबून असतात. भूतकालातील तत्सम अनुभव नसले तर त्यात चिंतेची (अज्ञाताची भीती) भर पडते. या प्रकारे घेतलेले निर्णय रॅशनल (तर्कप्रामाण्याधिष्ठीत) कसे असू शकतील ? मानवंशशास्त्राच्या दृष्टीने हे तसे वाईटही नाही... माणूस मुळात जर स्वजतन करण्यात अयशस्वी झाला नसता तर (माणूसच नाही म्हटल्यावर) आता अभिमान वाटणार्या त्याच्या इतर गमज्यासुद्धा आस्तित्वात आल्या नसत्या... हे कितीही बरे-वाईट वाटले तरी, निर्विवाद सत्य आहे ! सर्वच जीवन (आणि म्हणून इकॉनॉमीही) बहुतांश याच तत्वांवर चालते. याच, स्व-जतन आणि स्व-गौरव तत्वांवर माणूस दोन लाख वर्षे टिकून राहिला आहे आणि (संस्कृती, अर्थ, शास्त्र, इत्यादींच्या दृष्टीने) समृद्ध झाला आहे. ================ * : नेहमीच्या सत्य व्यवहारात, व्यापार-राजकारण-जीवनासकट कोणत्याही बाबतीतले अगदी तज्ज्ञांनी घेतलेले व शास्त्रिय प्रक्रियेतून जाणारे निर्णयसुद्धा तात्कालील उपलब्ध असलेल्या अपूर्ण माहितीवर आणि तात्कालील उपलब्ध असलेल्या तुटपुंज्या साधनसंपत्तीच्या व भूतकालातील तत्सम अनुभवांच्या पार्श्वभूमीवरच घेतलेले "बेस्ट आऊटकम सिनॅरिओज" असतात, आणि तेवढ्याच भांडवलावर कारवाई करावी लागते. नाहीतर, तुमचा प्रतिस्पर्धी तशा प्रकारे घेतलेल्या निर्णयांवर आधारीत कारवाई करून तुमच्यावर कुरघोडी करण्याची दाट शक्यता असते. सर्व खरी तथ्ये आणि आकडे, फक्त भूतकालात झालेल्या (पक्षी : संपलेल्या) गोष्टींबद्दलच उपलब्ध होतात ! :) ***************नज ही थिअरीही टाकाऊ नक्कीच नाही. कधी आणि कोणत्या परिस्थितीत नज वापरावे हे त्या परिस्थितीवर अवलंबून राहिल.'नजिंग' हे तर माणुस 'विचारी' प्राणी झाला तेव्हापासून व्यवहारात आहे. माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळे करणारी ही एक कळीची गोष्ट आहे... इतर बहुतेक फरक तिचे परिणाम आहेत. 'नजिंग हे संकल्पना बनवण्याच्या (गोष्ट सांगण्याची उर्फ स्टोरी टेलिंग) क्षमतेचा एक भाग आहे. देव, जात, धर्म, राज्य, देश, संस्था, नैतिकता, कायदा, इत्यादी सर्व मनात असलेल्या (व नंतर कागदावर उतरवलेल्या संकल्पनाच आहेत). माणसांनी माणसांना या जीवनातली सुरक्षा, समृद्धी, सामाजिक, आर्थिक, इत्यादी फायदा आणि पारमार्थिक फायद्याच्या गोष्टी (संकल्पना) गळी उतरवून माणसांचे प्रचंड मोठे समुदाय बनविण्यासाठी 'नज' केले... येथेही "फियर आणि ग्रीड" यांचा उपयोगच कामी येतो. इतर प्राण्यांना हे शक्य झाले नाही / होत नाही. 'नज' करताना आपल्या हेतूला सकारात्मक असलेल्या गोष्टीला जास्त महत्व देणे आणि नकारात्मक गोष्टीला कमी महत्व देणे /लपवून ठेवणे; हे काही रॅशनल म्हणता येणार नाही, पण, ते अनेक कारणे सांगून/न सांगून माणसांच्या व्यवहारात सतत दिसते. :) 'नज'चे नेहमीच्या व्यवहारातले एक उत्तम उदाहरण म्हणजे सुपरमार्केटमध्ये बिल चुकते करण्याच्या जागांच्या (कॅशियर पॉइंट्स) जवळपास दिसणारी चॉकलेट्स (पिल्लू मंडळीना शेवटचा नज, उर्फ, 'मम्मा/पप्पा, हे हवंच्च मला' क्षण, उर्फ, ती वस्तू सरळ उचलून पैसे चुकते होईपर्यंत हातात घट्ट धरून ठेवणे); दाढीची आयुधे (पुरुषांचा 'आयला, हे संपलंय/संपत आलंय की' क्षण); आणि टिकल्या व तत्सम नेहमीच्या वापरातल्या प्रसाधन वस्तू ('अय्या, कित्ती छान आहे' क्षण)... :) सुपरमार्केटमध्ये कोणती वस्तू कोठे ठेवावी यावर "एमबीए (रिटेल)" मध्ये अख्खे मोड्युल असते, ते याच (कस्टमर) बिहेवियरल एकॉनॉमिक्सचे ऑफशूट आहे. जाहिरातबाजीतला (आम्ही हे विकतो यापेक्षा, "काय म्हणता, हे तुमच्याकडे नाही ?!", असा संदेश देणारा (पक्षी : ग्राहकाच्या मनात असा कमतरतेचा संदेह उत्पन्न करणारा) उपयोग तर नेहमीचा झाला आहे. *************** व्यवस्थापनशास्त्राचे मानवी स्वभावावर आधारित दोन मूलभूत नियम आहेत; ते मानवी जीवनात सर्वत्र लागू होतात : १. "(दुसर्यांचे) मन बदला, (त्यांचे) शरीर अनुसरण करेल (चेंज द माईंड, बॉडी विल फॉलो)." २. "त्यात माझा काय फायदा ? (व्हॉट इज इन इट फॉर मी ?)" याचे सकारात्मक उत्तर देऊ शकलात तर लोकांची समजूत घालायला इतर कोणत्याही पुराव्याची जरूर पडत नाही. माणूस सारासार विवेकापेक्षा (तर्कप्रामाण्यापेक्षा) जास्त हितसंबंधांवर अवलंबून वागतो, याची चपखल उदाहरणे पावलो-पावली दिसतात, हे काय फार मोठे गुपित आहे काय ? ;) :)रिचर्ड थेलर यांना अभिप्रेत असलेल्या "नज" यापेक्षा देव, जात, धर्म इत्यादी गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे चांगले वागल्यास कसलेतरी प्रलोभन आणि वाईट वागल्यास शिक्षेची भिती या दोन्ही गोष्टी त्यात नाहीत.मी वर 'नज' बाबत केवळ रिचर्ड थेलर यांना अभिप्रेत असलेल्या वित्तव्यवस्थेतील सकारात्मक उपयोगात बद्दल लिहित नव्हतो. तर 'नज' आदीम कालापासून मानवी जीवनातल्या सर्व अंगांना स्पर्श करून आहे, असे मला म्हणायचे आहे. नजिंग ही, आदिम कालापासून सर्वसाधारण माणसाच्या जीवनात एक सर्वसाधारणपणे वापरली जाणारी पद्धत आहे... आणि त्यात इतरांनी आपले म्हणणे मानावे यासाठी "भीती आणि लोभ (फियर आणि ग्रीड)" या मानवाच्या मूळ प्रवृत्तींचा उघड-छुपा उपयोग केला जातो. ही दुधारी तलवार आहे... ती कधी इतरांनी योग्य निर्णय घ्यावा यासाठी वापरली जाते (उपकारक), तर इतर वेळेस स्वार्थ साधण्यासाठी. हे जेवढे गुप्त ठेवता येईल तितका तिचा परिणामकारकपणा जास्त. यासंबंधिचे एक विनोदी (पण सत्य) वचन असे, "Expert motivator is the one, who will ask you to go to hell, in such a way that, you start looking forward to the journey !" *************** "बेस्ट आऊटकम सिनॅरिओज" : हे बनवतानाही 'माणूस / संस्था' यांच्या "मिशन-व्हिजन" यांच्या संबंधात सद्य परिस्थितीत असणारे "भीती आणि लोभ (फियर आणि ग्रीड)" हे मुद्दे लक्षात घेणे आवश्यक असतेच. थोडक्यात, "भीती आणि लोभ" यांच्याविना मानवी निर्णय केवळ सैद्धांतिक जगातच (theoretical world) शक्य आहे. :)पैसा हे समाधान नसेल तर दुसरं काय आहे? किंवा असू शकतं?पैसा आणि समाधान यांचा तडक (डायरेक्टली प्रपोर्शनल) संबंध (असलाच तर) अत्यंत कमी वेळा असतो. मानवी जीवनात पैशाचे एकदिशा नकारात्मक महत्व नक्की आहे... पुरेसा पैसा नसला तर दु:ख/असमाधान बहुदा असतेच, मात्र, भरपूर पैसा असला तर सुख/समाधान असतेच असे नाही... या दुसर्या मनःस्थितीचे कारण माणसाची मुलभूत मानसिकता आहे, जिच्यामुळे जसजसा पैसा वाढत जातो तसतसे त्याच्या सुख-समाधानाच्या अपेक्षा क्षितिजाप्रमाणे विस्तारत (दूरदूर जात) राहतात. :)