Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

चंद्राचा पाढा

ब — बेसनलाडू, गुरुवार, 10/05/2017 - 10:11
चंद्र एके तुझा चेहरा चंद्र दुणे अन डोळे दोन चंद्र त्रिक डोळ्यांतिल काजळ, भिवयांची वर चंद्रकोर चंद्र चोक वेणीत केवडा, चंद्र पाचा चपलाहार, चंद्र सक ओठावरचा तिळ, साता चंद्र हसू मधाळ निरीनिरीतुन लगबगणारी चंद्र आठा बोटे आठ खांद्यावरती पदर विसावे नव्वे चंद्र चोळीगाठ भांगेतिल कुंकू लावण्याने मुसमुसलेला चंद्रोदय गालावरच्या खळीत लाली चंद्र दाहे ज्योतिर्मय सर्वाना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4745 views

💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 10/05/2017 - 11:05 नवीन
लैच दिवसांनी लिहीते झालात. पुनरागमन दणक्यात झाले आहे आता लिहीते रहा. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
श
शेखर गुरुवार, 10/05/2017 - 11:27 नवीन
बेलाशेठ वेलकम बॅक. तुम्ही लिहिते झाल्याचा आंनद जास्त आहे.
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 10/05/2017 - 12:52 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा गुरुवार, 10/05/2017 - 22:09 नवीन
चंद्रकळा! अत्त्युत्तम लाडूशेट.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Fri, 10/06/2017 - 08:56 नवीन
अहाहा!! फार आवडली..
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 10/06/2017 - 14:57 नवीन
व्वाह रे व्वाह!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 10/07/2017 - 01:57 नवीन
बेला, किती सुंदर लिहितोस!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 10/07/2017 - 08:21 नवीन
सुंदर... जाता जाता :- सध्या आमचा आवडता चंद्र म्हणजे कपाळी "चंद्रकोर" असणार्‍या पाठकबाई ! ;) Image removed.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- प्रियकर: प्रियकरौ प्रियकरा: प्रथमा, प्रियकरं प्रियकरौ प्रियकरां अद्वितीया... :- YZ
  • Log in or register to post comments
त
तृप्ति २३ Sun, 10/08/2017 - 17:54 नवीन
खुपच छान लिहीता तुम्ही ! मस्त. छान ..!! आवडली कविता... Marathi Kavita Aai
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Mon, 10/09/2017 - 10:42 नवीन
मस्तं!
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sun, 10/15/2017 - 15:58 नवीन
हे भारीये बेलाशेठ
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sun, 10/15/2017 - 17:21 नवीन
हे भारीये बेलाशेठ
  • Log in or register to post comments
र
राघव Sun, 12/03/2017 - 07:32 नवीन
मस्तच!! गालावरच्या खळीत लाली चंद्र दाहे ज्योतिर्मय खास! लिहीते झालात.. खूप आनंद झाला! :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 1 hour ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 2 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 2 hours ago
  • सुंदर !!
    3 days 2 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 2 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा