Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

का केली पेट्रोल व डिझेलची दरकपात ?

म
मार्मिक गोडसे
गुरुवार, 10/05/2017 - 09:59
🗣 60 प्रतिसाद
२०१४ पासून जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव सतत घसरत असताना सरकारने वेळोवेळी एक्साईज ड्युटी वाढवून देशातील पेट्रोल व डिझेलचे भाव चढेच ठेवले. देशाच्या विकास कामासाठी हा ज्यादा महसूल वापरला जाईल असं जनतेला सांगितलं गेलं, समजदार जनता सरकारच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. गेल्या तीन वर्षात कधीही पेट्रोल डिझेल भाववाढीच्या विरोधात देशात कुठेही मोर्चे निघाले नाहीत, किंवा कोणाचेही बजेट कोसळले नाही. पूर्वी पेट्रोलचे ५० पैसे जरी वाढले की लगेच महागाईचा भडका होत असे, तसा महागाईचा भडका गेल्या तीन वर्षात झाला नाही. हां, देशाचा GDP थोडासा घटला, पण तसा तो अनेकवेळा मागील सरकारच्या काळातही घटला होता. सगळं काही आलबेल असताना अचानक दोन दिवसापूर्वी कच्च्या तेलावरील एक्साईज ड्युटी २ रुपयांनी कमी करून सरकारने जनतेला संभ्रमात टाकले. काय अर्थ काढायचा जनतेने ह्या दरकपातीचा ? अशी दरकपातीची मागणी कोणत्याही 'देशप्रेमी'जनतेने केली नव्हती. गेल्या तीन वर्षात कोणीच गरीब राहिले नव्हते, त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या दरकपातीची मागणी कोणी करेल अशीही शक्यता नव्हती. विकासकामे जोरात चालू होती, त्यामुळे बेरोजगारीही शून्यावर आली होती. भविष्यात अजून मोठे प्रकल्प राबविण्यासाठी पैसे लागणार , ८ नोव्हेंबरला एका मोठ्या योजनेच्या वर्धापनदिन साजरा करण्यासाठी पैसे लागणार आहेत. कुठून आणणार सरकार ह्यासाठी पैसा?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 15317 views

🗣 चर्चा (60)
ट
ट्रेड मार्क Fri, 10/13/2017 - 18:26 नवीन
वेलकम बॅक. अमेरिकेत कसं चालू आहे याची बातमी भारतात राहणाऱ्यांनाच जास्त असते. आणि कसं का असेना, आम्ही रडत तरी नाही बसलेलो. बाकी तुमची रेल्वेच्या जमिनीवर अतिक्रमण करून बांधलेली १२०० वर्गफूटांची आणि बाहेर भरपूर मोकळी जागा असणारी झोपडी व्यवस्थित जागेवर आहे ना? बुलेट ट्रेन च्या मार्गात नाही येत ना? या फॅसिस्ट सरकारने जप्त तर नाही ना केली? फुकट मिळणारी वीज आणि पाणी विकायचा धंदा बरा चालला आहे ना? तुम्हालाही पोटभर जेवायला मिळत असेल अशी आशा करतो. सबसिडी वगैरे बंद झाल्याने काही अडचण झाली का?
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Fri, 10/13/2017 - 21:10 नवीन
अहो इथे प्रतिसाद देताय पण त्या गरिबी निर्देशांकावर बोलला नाहीत परत काही. काय मग वाचलीत का pdf , कि त्यात सोयीचं काही दिसत नाही? असाही "आवाज दाबू नका" हा धागा टीका वाढू लागली की "वाचनमात्र" होऊन गेला. आणि म्हणे कोण रोखतंय टीका करायला? :D
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Fri, 10/13/2017 - 22:03 नवीन
मला बाकी पण कामं असतात. पण मुद्दा तुमच्या लक्षातच येत नाहीये तर काय करणार? उगाच वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही. असाही "आवाज दाबू नका" हा धागा टीका वाढू लागली की "वाचनमात्र" होऊन गेला. आणि म्हणे कोण रोखतंय टीका करायला मोदींवरची टीका वाढू लागली म्हणून म्हणताय? करा की टीका... ना मोदी तुम्हाला विचारत ना बाकी कोणी. बसा ओरडत. बादवे... तजो आणि आमचा जुना ऋणानुबंध आहे म्हणून त्यांचा नंबर पयला.
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Fri, 10/13/2017 - 22:45 नवीन
टीकेला कोणी विचारत नाही तर मग इतका त्रास का होतो म्हणे मग? :P मला कोणी कशाला विचारायला हवंय, तुम्हीच इतके निबंध लिहीत होतात तुमची काम बाजूला ठेऊन म्हणून प्रतिसाद दिलेले! असो!
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 10/12/2017 - 19:01 नवीन
उगी उगी, इतकं फ्रस्ट्रेशन बरं नव्हे. होते कधी कधी आपल्या लाडक्या व्यक्तीकडून चुक.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Fri, 10/13/2017 - 08:50 नवीन
साहेब वेळ जात नाहीए का ?
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Fri, 10/13/2017 - 09:00 नवीन
हो. सादर करायचे का तुम्हाला तुमचे विदुषकी चाळे? करा चालू.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Fri, 10/13/2017 - 09:13 नवीन
कोण तुम्ही ? मधे का उड्या मारताय. तुमचा पण वेळ जात नाहीए का ?
  • Log in or register to post comments
थ
थॉर माणूस Fri, 10/13/2017 - 20:14 नवीन
कोण तुम्ही ? मधे का उड्या मारताय.
अं, बहुतेक धागा त्यांनीच काढलाय आणि तुमचा प्रतिसाद थेट धाग्याला असल्यामुळे?
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Sat, 11/11/2017 - 11:15 नवीन
कोणतेच सरकार १००% बरबाद असू शकत नाही. या लोकांनीही काही चांगली काम केली आहेत पण आम्हीच चांगली काम करतोय आणि मागच्या सरकारांनी घाणच केली होती हे फेकणाऱ्यांचा राग येतो!
अमूक सरकार चांगलं मग त्यांचं सगळंच उत्तम आणि अमूक सरकार वाईट आणि त्यांनी घेतलेले प्रत्येकच निर्णय चुकीचे असं काही नसतं हेच अनेकांना समजत नाही. ह्या एक प्रकारच्या अंधश्रद्धेतून बाहेर पडून कोणत्याही निर्णयाकडे / अंमलबजावणीकडे स्वतंत्रपणे बघता आलं पाहिजे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 8 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 9 hours ago
  • सुंदर !!
    3 days 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा