Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

पाहिले मी जेव्हा तुला ( भाग २ )

अ
अनाहूत
गुरुवार, 10/05/2017 - 06:06
जितकं दूर राहण्याचा प्रयत्न करतेय तेव्हढीच ओढली जातेय मी त्याच्याकडे काय होतंय मला कळत नाहीये , का आणि कस होऊ शकत असं माझ्या बाबतीत , आणि सरळ बोललेही नाही त्याच्याशी इतके दिवस . काय होतंय दुसरं काही नाही पण friend म्हणून बोलायला काय हरकत आहे , आणि इतके दिवस बोलत होतोच कि आपण , त्याला काय होतंय , बस जे वेगळं वाटत होत त्याचा विचार नको करायला . एक friend म्हणून बोलूया ना . " Hi, कसा आहेस ? " " अरे तुझ्याशीच बोलतेय मी , इकडे तिकडे काय बघतोय . " " तू ... आपलं आपण माझ्याशी बोलताय ? या पामरावर फारच उपकार झाले . " ए असं बोलणार असशील तर मी नाही बोलणार तुझ्याशी , तू असा बोलतोस म्हणूनच राग आला होता मला तुझा आणि म्हणूनच बोलत नव्हते मी तुझ्याशी . " " खरच राग आला होता तुला ? " " हो . " " मग मी असं कधी पुन्हा करणार नाही . " " नक्की ना ? " " अगदी नक्की " तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी smile आली " पण तुला असं वाटतंय का मी असं काही बोलेन , आला राग तर आला मला काय फरक पडत नाही मी असाच आहे आणि असच बोलणार . " " बघ परत तेच " " का काय करणार आहेस " " बोलणार नाही मी तुझ्याशी " " ए नाही बोललीस तर नाही . " " ठीक आहे जाते मी . " " ए चाललीस कुठे एव्हढ्यात भांडणाचा कोटा अजून कुठं पुरा झालाय . " " चल वेळ नाही मला " " अग थांब ना त्याने पुढं होऊन तिचा हात पकडला . " तिला परत थोडं अवघडल्यासारखं झालं पण तरीही स्वतःला शक्य तितकं normal ठेवत ती बोलली " जाऊदे मला माझा mood नाही आता भांडायचा . " " अग अशी काय करतेय गं माझी मैत्रीण ना तू तुझ्यावर इतकाही हक्क नाही का माझा ? " " हो friends आहोत आपण पण दर वेळेस भांडायला हवच का ? " " अग तस नाही पण आपण त्याच्याशीच भांडतो ज्याच्यावर आपला हक्क आहे आणि तुझ्यावर आहे ना माझा हक्क . " " तो आहे रे पण दर वेळेस भांडावच असं आहे का ? " " बर ठीक आहे मग काय करायचं आपण सांग तू . " " एक सांग मला आपल्याला छान अस नाही का बोलता येणार ? " " ठीक आहे बोलूया ना आपण तू सांग कोणत्या topic वर बोलायचं आपण ? " " ummm नाही सुचत मला . तुला काय सुचतंय का ? " " बघ असं ठरवून बोलायचं म्हटलं तर काही सुचत नाही बोलायला . " " खर आहे तुझं . " " पण मग काय करूया ? " " भांडूया का ? " " काय रे परत तेच . " " अग ऐक ना , प्रत्येक नात्याला त्याची त्याची space असते , त्याच त्याच विश्व असत . तुझ्यामाझ्यात छान understanding आहे एकमेकांना काय बोलायच आहे हे आपण न बोलताही समजू शकतो ना .. " खरंच असं असत तर किती बर झालं असत . आज जे मला वाटतंय ते तुला न बोलता कळलं असत तर किती बर झालं असत . हा विचार करता करता हलकंसं smile आलं तिच्या चेहऱ्यावर . " अग काय ? एकटीच का हसतेय ? " " आपल्यात छान understanding आहे ना तुला मी न बोलताही समजतं ना ? मग सांग ना मी का हसतेय ते ? " क्रमशः

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1743 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    4 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    4 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    4 days ago
  • सुंदर !!
    4 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    4 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा