Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

ये कलरफुल ऐक ना

प
पवन तिकटे
Wed, 10/04/2017 - 16:31
💬 31 प्रतिसाद

ये कलरफुल ऐक ना !

आज खूप दिवसांनी तिचा फोन आला.
ती : काय करतोय
मी : हॅलो कोण ? (मी हळूच विचारलं)
ती : अरे मी तुझी पिल्लू
विसरलास की काय इतक्या लवकर.
मी : नाही ग, इतक्या लवकर कसे विसरेल तुला.
खूप स्वप्न बघितली आहे ना तुझ्यासोबत.
अन ते साक्ष करण्याचं ध्येय देखील ठरवलं आहे
मग सहजासहजी कसे विसरेल मी तुला
शक्यच नाही .
ती : हो का ?
मी : का बरं, म्हणजे काही संशय.
ती: नाही रे वेड्या
मी: मग
ती : असच
मी : बर ऐकना,
तुझा कॉल आल्याशिवाय मी जेवण कधीच करणार नाही.
ती : ठीक आहे रे पिल्लू,
मी रोज करत जाईल तुला कॉल, नको tension घेऊस.
चल बाय भेटू कॉलेज मध्ये
मी : बाय
बाय म्हणालो अन सकाळी कॉलेजला लवकर गेलो.
वेडीच्या भेटीसाठी आनंदातच तिच्या येण्याची वेड्यागत वाट पाहू
लागलो. कॉलेज च्या गेटवर एकटाच उभा राहत.
पाहता पाहता कॉलेज भरायला शेवटची पाच मिनिटे बाकी होती.
तरी तिची वाट पाहणं मी सोडत नव्हतो. अस वाटायच आता येईल
नंतर येईल पण नाही कॉलेजची घनटा वाजली.
वर्गामध्ये जाऊन बसलो तिच्या मैत्रनिना विचारणा केली,
की माझी पिल्लू आज का नाही आली.
उलट माझीच थट्टा करत " तुला माहिती तुझी पिल्लू का नाही आली ती"
तिची मैत्रिन बोलली...

जसाजसा वेळ जात होता, सैरावैरा जीव होत होता. की अजूनही का नाही आली.
तिच्याविना एकांत असा भासू लागला की जणु कुणीतरी हृदयाच्या
आरपार थेट काळजावर जोरदार घाव केला असावा....
कॉलेज सुटणायची वेळ झाली, मी जोरात धापा टाकत टाकत घरी आलो
कपाटातुन मोबाईल काढला , अन missed call चेक केले ... एकही नाही.
मेसेज चेक केलं तेही नाही..
स्वतःला दोष देऊ लागलो, की काय झालं असावं तिला.
"किती दुःख मनात माझ्या
मी स्वतःच झेलतो, दुःख माझे
किती घाव हृदयात माझ्या
मी स्वतःच पेलतो, घाव माझे"

संध्याकाळ झाली तिच्या फोनची वाट पाहू लागलो,
वाट पाहता पाहता कधी ती रात्र सरली कळलच नाही.
सकाळी जाग आली तसाच ताडकन उठलो अन मोबाईल घेतला
पाहतो तर काय सकाळचे पाच वाजलेले .
अन एकही मिसकॉल नाही...
पहिला दिवस सरला, दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजला जाण्यासाठी निघालो
चहा आटोपला अन कोलेजकडे धाव घेतली.
तिची वाट नेहमी रोजच्या सारखी पाहत होतो , ती नाही आली.

वर्गामध्ये बसलो अन माझे डोळे अचानक फिरू लागले,
अशक्तपणा जाणवू लागला कारण ठरवलं होतं ना की, तिचा कॉल
आल्याशिवाय जेवण करायचं नाही.
तो दुसरा दिवसही कसाबसा काढला. तिच्याविना,
कॉलेजमधून आल्यावर डोकं जड पडलं . काहीच सुचत नव्हते
अन सलग दोन दिवस जेवण न केल्याने अशक्तपणा जाणवणे साहजिकच
होते.
घरी आल्यावर जशी बॅग फेकून दिली अन रडत रडत कॉटवर तसाच पडलो
तिच्या आठवणीत, आई म्हणाली की दोन दिवसापासून जेवण करत नाहीये
काय झालंय.?
मी तिच्या रागाच्या भरात बिचाऱ्या आईवर ओरडलो, की " मला भूक
नाहीये, मनात आल्यावर करेल जेवण"
तीही बिचारी ऐकून शांतपणे काहीही नाही बोलली.
तिसऱ्या दिवशीही कॉलेजमध्ये नाही आली,
त्या दिवशी मित्राचा वाढदिवस होता. वर्षातून एकदाच येणारा
आनंदाचा क्षण म्हणजे वाढदिवस..
मित्राचा मोठा हट्ट होता म्हणून थोडंफार केक खाल्ला.
सलग तीन दिवस जेवण नाही , तब्बेतीमध्ये कमतरता भासू लागली
अन हे घरच्यांच्या पण लक्षात आले.

सरता सरता एक आठवडा सरला.सलग सात दिवस ती कॉलेजला आली नाही.
मग आठव्या दिवशी तिचे आगमन झाले.
तिला पाहिल्यावर एकदम भारावून गेलो. काय करावे काहीच सुचत नव्हते.
तिच्यावर रागवाव की प्रेमाने समजूत घालावी, की, तुला या प्रेमवेड्याची आठवण
नाही आली का ग.?
मला तिला बोलायचं होत पण माझी एक अट होती,की सुरुवात तिने करावी.
कॉलेज भरल्यावर ती आली वर्गामध्ये बसली. मी सारखा तिच्याकडे पहात होतो.
रडूही येत होतं. की माझी पिल्लू एकवेळ माझ्याकडे वळून बघेल. पण नाही
ती तिच्या मैत्रनिना बोलण्यात, हसण्यात इतकी व्यस्त होती की एकक्षण तिची
मान माझ्याकडे नाही वळाली..

तासांवर तास निघून गेले. कॉलेज सुटण्याची देखील वेळ झाली.
तरी तिची मान काही वळाली नाही.
कदाचित माझयाहीपेक्षा जास्त ती तिच्या मैत्रनिवर प्रेम करत असेल, या कारणास्तव
तिने पाहिले नसेल.....

कहते हे,अगर किसीं चीझ को दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने
की कोशीष मे लग जाती हे.........
पण माझ्या आयुष्यात उलटंच....

तिला पाहिल्यावर माझ्या आतील कवी जागा व्हायचा त्याक्षणी तसच,

अफाट होती तुझी समरणशक्ती
मलाच कसे काय विसरलीस
कुणास ठाऊक
अबोल होते तुझे बोल
मग मला बोलण्यासाठी का नाही निघाले
कुणास ठाऊक.......

निराश होऊन घरी आलो,
तिच्या कॉल ची वाट पाहू लागलो कॉल आलंच नाही
ये कलरफुल ऐक ना!
मला बोलायचं आहे तुझ्याशी,
एकतरी कॅल कर ना मला...जिवंत राहण्यासाठी..

:- पवन बालाराम तिकटे
राहेरी ,
ता. सिंदखेड राजा
जि. बुलडाणा
7350942506

<strong></strong>


वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6942 views

💬 प्रतिसाद (31)
प
पवन तिकटे Wed, 10/04/2017 - 16:32 नवीन
काळजाला फातिमा फासनरा माझा हाहृदय चिरून काढणारा लेख
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 10/04/2017 - 16:34 नवीन
फातिमा फासणारा म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Wed, 10/04/2017 - 22:00 नवीन
काळिमाची बहीण असावी बहुतेक. लेख वाचून एक अंदाज. काळजाला काळिमा फासणारा म्हणण्याऐवजी 'फासळ्यांना फातिमा फासणारा' हा अनुप्रास जास्त चांगला दिसतो. शिवाय इतके दिवस उपवास करून नायकाच्या फासळ्या दिसत असतीलच.
  • Log in or register to post comments
प
पुंबा गुरुवार, 10/05/2017 - 08:49 नवीन
हाहाहा.. 'फासळ्यांना फातिमा फासणारा' हहपुवा
  • Log in or register to post comments
च
चिनार गुरुवार, 10/05/2017 - 13:59 नवीन
तसं नाय ते... "पुन्हा ती जांभळी पाहात फफफ्फफफ्फफफ्फ फेसाळते...." ह्यातला फ वापरलाय त्यांनी. -- 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' फेम नानू सरंजामे
  • Log in or register to post comments
च
चिनार गुरुवार, 10/05/2017 - 14:00 नवीन
*पहाट
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sat, 10/07/2017 - 19:57 नवीन
कधी कधी तुमच्याही मनाचा पारवा नागवा होतो का म्हणे ? :D:D:D:D
  • Log in or register to post comments
थ
थॉर माणूस Wed, 10/04/2017 - 19:41 नवीन
हृदय चिरण्याचं माहिती नाही, पण थेट आयक्यूवर आघात करणारा लेख किंवा डोक्यावरचे केस कमी करणारा लेख असे काहीतरी नक्की म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 10/04/2017 - 17:26 नवीन
वाटलंच च्यायला, केकच्या तुकड्यावर तीन तीन दिवसं काढणार्‍या पिल्लू, शोना, जानू, स्वीटूचेच गुणगान असणार. . शोनाची पानपट्टीची उधारी झालीय पाच हजार. द्यायची कुणी? शाना बन सोनू.....काय नसतंय हे
  • Log in or register to post comments
R
Rahul D Sun, 10/08/2017 - 04:42 नवीन
अहो कॉलेजच्या मागे हॉटेल होते, त्याचे मिसळ आणि चहा कॉफीची उधारी देताना नाकीनऊ यायचे.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Wed, 10/04/2017 - 18:22 नवीन
तुझा कॉल आल्याशिवाय मी जेवण कधीच करणार नाही.
प्रेम वगैरे ठीक आहे. पण असलंं काही कशाला? जेवायला सुरवात केलात का आता?
अगर किसीं चीझ को दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशीष मे लग जाती हे.........
हे फक्त शाहरुख खानच्या रीळ लाईफ मधे होते. रिअल लाईफ मधे (कुणाच्याही) होत असेल असे तुम्हाला वाटते का?
  • Log in or register to post comments
स
सतिश म्हेत्रे Wed, 10/04/2017 - 19:17 नवीन
सांगा बरं...
  • Log in or register to post comments
प
पुंबा गुरुवार, 10/05/2017 - 08:50 नवीन
कदाचित माझयाहीपेक्षा जास्त ती तिच्या मैत्रनिवर प्रेम करत असेल, या कारणास्तव तिने पाहिले नसेल.....
हम्म्म्म..
  • Log in or register to post comments
प
पी. के. गुरुवार, 10/05/2017 - 11:56 नवीन
तुझा कॉल आल्याशिवाय मी जेवण कधीच करणार नाही. जेवणात चिकन असेल तरी?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 10/05/2017 - 16:04 नवीन
बहुतेक तीने आणखी दोन चार जणांना त्याच दिवशी काँल केले असतील. आता ती बिचारी कोणाकोणाला लक्षात ठेवेल. तुम्ही इतकं लावून नव्हतं घ्यायचं.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 10/05/2017 - 17:58 नवीन
तुमची पिल्लू उडाली भूर तुम्ही फातिमा फासला
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 10/06/2017 - 06:22 नवीन
मागच्या दहा हजार वर्षात उभ्या महाराष्ट्रात अशी लवष्टोरी कोणी लिहिली नव्हती. अवांतर: YZ चित्रपटातील काका गाण्याचे शब्द मनू पिल्लू बाबू म्हणवता, ही तर बोक्याची नावं सारी. हे कायम म्हणतात डिअर, पण स्टेटस नसतं कधीच क्लिअर. हे कामं घेतात करून, पण प्रेम बरोबर दुसऱ्यावर. ठरते लग्न, हातात नुसतंच..... . . . बघणं!
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Fri, 10/06/2017 - 06:25 नवीन
.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 10/06/2017 - 18:37 नवीन
कथा/संवाद अतिशय आवड्ले. मिपावर असं साहित्य क्वचितच येतं, अजून भरभरून येऊ द्यात!! (अवांतरः आज बायकोला, "ये कलरफुल, ऐक ना!" अशी हाक मारायचा विचार आहे. बघू काय प्रतिक्रिया येतेय ती!) कलरप्रेमी, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 10/07/2017 - 20:21 नवीन
काकीक मारल्यात काय कलरफुल हाक? काय झाला मगे? =)))
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 10/07/2017 - 08:34 नवीन
बा ब्बो ...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- प्रियकर: प्रियकरौ प्रियकरा: प्रथमा, प्रियकरं प्रियकरौ प्रियकरां अद्वितीया... :- YZ
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sat, 10/07/2017 - 19:47 नवीन
जंगी
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 10/07/2017 - 20:22 नवीन
भयानक करमणूक झाली प्रतिसाद वाचूनच! =)))
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sun, 10/08/2017 - 03:44 नवीन
मी तर बसमधे इतकी हसले की मागचे पुढचे लोक्स वाकून वाकून बघायला लागले. =))
  • Log in or register to post comments
त
तिमा Sun, 10/08/2017 - 09:06 नवीन
इतकी हृदयद्रावक लव-स्टोरी आजपर्यंत वाचली नव्हती. माझं ऐका. तुमच्या पिल्लुला गोव्यात डोना पावला ला घेऊन जा. पुढचं सगळं काळ बघून घेईल.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sun, 10/08/2017 - 12:14 नवीन
हृदय द्रावक नाही हो, हृदय चीरून काढणारी !
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 10/08/2017 - 15:00 नवीन
कवीता वारंवार येवोत,भले लोक डँमफुल होउन, ब्युटिफुल गोष्टी विसरतील असं आमचे हे म्हणतात. मिपा सार्वकालिन माई
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 10/08/2017 - 15:25 नवीन
मी : नाही ग, इतक्या लवकर कसे विसरेल तुला.
म्हणजे इतक्या लवकर नाही विसरणार, पण हळूहळू विसरणार, असंच ना??
  • Log in or register to post comments
ह
हरवलेला Sun, 10/08/2017 - 15:59 नवीन
अजून थोडा प्रयत्न केला तर जीवन मोहित्यांसारखे अजरामर व्हाल.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 10/08/2017 - 17:03 नवीन
एका नवकवीची भ्रूणहत्या केली मिपाकरांनी :(
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sun, 10/08/2017 - 17:06 नवीन
आईवर ओरडणाऱ्याला खरंच कानफाटायची इच्छा होते राव.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    4 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    4 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    4 days ago
  • सुंदर !!
    4 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    4 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा