Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

सख्या, कसे? कुठून रोज, आणतोस चांदणे?

स — सत्यजित..., Wed, 10/04/2017 - 12:06
हळूच सोडतोस केस..माळतोस चांदणे... सख्या, कसे? कुठून रोज, आणतोस चांदणे? अधीर ओठ साधतात मौनही कसे तुझे? किती अरे, उरात खोल पेरतोस चांदणे! बनून स्वप्न चोरतोस झोप रोजचीच तू... विचारताच, चोर कोण? सांगतोस..चांदणे! उनाड चंद्रमा बनून हिंडतोस रात्रभर पहाट-वेळचे, टिपूर मागतोस चांदणे! नभात लक्ष तारका उधाणतात कैकदा मिठीत केवढे कसून घुसळतोस चांदणे! मधाळ चांद, वितळतो..रसाळ रात वाहते... असे कुण्या सुरांत रे! पुकारतोस चांदणे! —सत्यजित

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 17151 views

💬 प्रतिसाद
व
विशुमित Wed, 10/04/2017 - 12:43 नवीन
छान ..!! आवडली कविता...
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 10/04/2017 - 12:43 नवीन
लाजवाब!
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Wed, 10/04/2017 - 14:08 नवीन
तत्काळ प्रतिसादाबद्दल आभार...विशुमित,एस!
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Wed, 10/04/2017 - 14:30 नवीन
आवडली गझल.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 10/04/2017 - 15:40 नवीन
व्वाह. ! लाजव्वाब!
  • Log in or register to post comments
N
Naval Wed, 10/04/2017 - 16:05 नवीन
वाह... क्या बात है!
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Wed, 10/04/2017 - 16:09 नवीन
खुपच छान लिहीता तुम्ही ! मस्त. प्रत्येकवेळी दाद देणे जमत नाही. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 10/04/2017 - 16:26 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... गुरुवार, 10/05/2017 - 08:17 नवीन
अभिजीत अवलिया,अत्रुप्त आत्मा,Naval...खूप खूप धन्यवाद! दुर्गविहारी ,आपली दाद मिळाली,अनेक धन्यवाद! प्रचेतस धन्यवाद!
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Fri, 10/06/2017 - 22:25 नवीन
सुंदर कविता.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sat, 10/07/2017 - 12:09 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
र
रुपी Sat, 10/07/2017 - 17:43 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Sat, 10/07/2017 - 18:28 नवीन
अबब, एव्हढे चांदणे? छान छान ! आम्हाला फक्त संदीप चांदणे म्हाईतीये :)
  • Log in or register to post comments
आ
आगाऊ म्हादया...... Sun, 10/08/2017 - 03:33 नवीन
नेहमीच वाचतो तुमच्या गझला. "स्वप्नपरीच्या वाटेवरती,तारांगण अंथरले होते..." ही तर अगदी पाठ झालीय आता. तुमचे शब्द एक लय घेऊन येतात, ते फार आवडतं मला.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 10/08/2017 - 11:52 नवीन
जबरदस्त लिहिताय तुम्ही. एकेक ओळ अन साधलेली गेयता. अप्रतिम.
  • Log in or register to post comments
त
तृप्ति २३ Sun, 10/08/2017 - 17:53 नवीन
खुपच छान लिहीता तुम्ही ! मस्त. छान ..!! आवडली कविता... Marathi Kavita Aai
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Mon, 10/09/2017 - 19:42 नवीन
कवितानागेश,अनन्तयात्रीजी,रुपी,चामुंडराय,आगाऊ म्हाद्या,अभ्या,तृप्ति...आपणासारख्या रसिकांकडून भरभरुन मिळालेली दाद अत्यंत अल्हाद-दायक,प्रोत्साहनीय आहे! आपणा सर्वांचे मनापासून खूप-खूप धन्यवाद!
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Mon, 10/09/2017 - 20:03 नवीन
'कविता' विभागातील रचना,त्यातही माझी रचना,रसिकांकरीता 'शिफारस' सदरांतर्गत नोंदविल्याबद्दल,तत्संबंधी कार्यरत टीम तसेच मिपा संपादक,सा.सं.मंडळाचे खूप-खूप आभार!'मिपा'वर लिहिणाऱ्या अनेक उत्तम कवींसाठी ही बाब नक्कीच प्रोत्साहनीय असेल,तसेच रसिक-वाचकांसाठी ही एक उत्तम काव्यपर्वणी ठरावी! नव-नवीन उपक्रम तथा सकारात्मक बदल राबविण्याबाबत,'मिपा'च्या तत्पर भूमिकेचे,त्यासाठी वेळात वेळ काढून सतत कार्यशील टीम्सचे कौतुक,तसेच आभार,जाहिर मांडणे,केवळ ईष्टच नव्हे, तर अगत्याचे वाटते! पुनःश्च एकवार, सर्वांचे हार्दिक आभार!
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 10/10/2017 - 12:42 नवीन
क्या बात!!
  • Log in or register to post comments
प
पिंट्याराव Tue, 10/10/2017 - 15:20 नवीन
सुंदर रचना... आवडल्या गेली आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 10/11/2017 - 03:52 नवीन
कविता छान आहे, पहिली दोन कडवी तरल आहेत. या कवितेचे दृक्श्राव्य सादरीकरण उदाहरणार्थ सचिन खेडेकरने केले तर ऐकायला अतिशय आवडेल.
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 10/12/2017 - 18:28 नवीन
तुमच्या गझल नेहमीच आखीव रेखीव असतात हि देखील अपवाद नाही! आवडली! :)
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Sat, 10/14/2017 - 06:43 नवीन
खूप-खूप धन्यवाद... सूड,पिंट्याराव,आनंदयात्रीजी,शब्दबंबाळ!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Sun, 10/15/2017 - 17:24 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao Mon, 10/16/2017 - 06:39 नवीन
क्या बात !
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Mon, 10/16/2017 - 11:57 नवीन
सुदर कविता
  • Log in or register to post comments
S
Swapnaa Mon, 10/16/2017 - 19:15 नवीन
छान च , लिहित रहा ....
  • Log in or register to post comments
M
mr.pandit Tue, 10/17/2017 - 16:38 नवीन
अप्रतिम लाजवाब मस्तच खुप आवडली
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Tue, 10/31/2017 - 20:39 नवीन
मिसळलेला काव्यप्रेमी,सुनील सर,अविनाशजी,स्वप्नाजी,पंडितजी...सर्वांचे मनापासून धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 1 hour ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 2 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 2 hours ago
  • सुंदर !!
    3 days 2 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 2 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा