सतीश पिंपळे - एक ऋषिरंग
३१ डिसेंबरचा दिवस होता. आम्ही सगळे न्यू इयर सेलिब्रेशनच्या तयारीत होतो. खाण्याचा एखादा मस्त बेत आणि टीव्हीवरचे कार्यक्रम बघत बसणं असा नेहमीचा प्लॅन. आज आमच्याकडे एक चित्रकार येणार होते. आजवर मी आमच्या घरी खूप लेखक, कवी मंडळी आलेली पाहिली होती, पण एका चित्रकाराला पहिल्यांदाच पाहणार होते. मला चित्रं काढण्याचं फार वेड, त्यामुळे मी फार खूश होते. वर्तमानपत्रात आणि टी.व्ही.मध्ये पाहून चित्रकारांविषयी काही कल्पना तयार झालेल्या होत्या - लांब केस, दाढी, झब्बा असं काहीतरी... संध्याकाळच्या सुमारास ते आमच्या घरी आले. माझ्या या कल्पनांपेक्षा एकदम वेगळे अगदी साधे. सतीश पिंपळे त्यांचं नाव.










💬 प्रतिसाद
(15)
N
Naval
Sat, 10/21/2017 - 12:35
नवीन
दिपावलीच्या खूप शुभेच्छा!! दिवाळी अंकात हा लेख आल्याचा फार आनंद होतोय...
- Log in or register to post comments
D
Duishen
Sun, 10/22/2017 - 00:10
नवीन
आपली ओघवती शैली आवडली.
"माझ्या मनाच्या विस्तीर्ण अंगणात असंख्य रंग एकमेकांचा हात धरून नाचतच असतात. बाहेर पडण्याची प्रत्येकाला घाई झालेली... हा त्यांचा बालिशपणा की समजूतदारपणा... माहीत नाही. पण मी ते होऊ देतो... त्यांचं ते कागदावर किंवा कॅनव्हासवर उतरणं तटस्थतेने पाहणं खूपच इंटरेस्टिंग असतं....!"
सृजनाची आणि सर्जनशीलतेची खूपच छान व्याख्या केली आहे.
"नुकतेच पंख फुटलेलं एक पिल्लू आपल्या आईला विचारतं, "आई, या आकाशाचा अर्थ काय?" .....आकाश निरर्थक असलं तरी ते शोधण्याचा प्रवास मोठा सुंदर आणि अर्थपूर्ण आहे."
...ही रूपककथा तर खूपच छान आहे!!!
- Log in or register to post comments
र
रेवती
Sun, 10/22/2017 - 01:19
नवीन
लेखन प्रभावी झालेय. एखादे महान व्यक्तिमत्व ताकदवान शब्दांनी चितारणे सोपे नाही. तुम्ही तर मुक्तहस्ते सुरेख शब्द वापरून लेखन केले आहेत.
श्री पिंपळे यांची ओळख आवडली. त्यांनी केलेलं घराचं स्केचिंग आवडलं. बाकी चित्रेही छान आहेत.
- Log in or register to post comments
श
शलभ
Sun, 10/22/2017 - 05:27
नवीन
खूपच मस्त व्यक्तिमत्त्व आहे.. छान लिहिलंय तुम्ही..
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Sun, 10/22/2017 - 10:47
नवीन
एका महान कलाकाराची खूप सुंदर ओळख करून दिलीत.
तुमची सहज सुंदर लेखनशैली आवडते मला खूप.
- Log in or register to post comments
ब
बाजीप्रभू
Sun, 10/22/2017 - 14:23
नवीन
अनुक्रमणिकेत जेव्हा नवल ताईंचं नाव वाचलं तेव्हा खूप आनंद झाला होता. शब्दांचे कुंचले वापरून केलेले एक उत्तम व्यक्तीचित्रण वाचायला मिळणार ह्याची खात्री होती... काही लेखक नो बॉल टाकतच नाहीत... नवलताई त्यांपैकी एक... तुमचे प्रत्येक लेख एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातात.. समृद्ध करतात...
आकाश, पणती ... या उपमा केवळ अप्रतिम..
अतिशय सुंदर लेख... खूप आवडला.. लिहीत रहा ताई.
- Log in or register to post comments
N
Naval
Mon, 10/23/2017 - 15:09
नवीन
इतकी मनातून दाद दिल्याबद्दल धन्यवाद !!
- Log in or register to post comments
ए
एस
Sun, 10/22/2017 - 14:44
नवीन
अतिशय आवडला लेख. तुम्हीही चित्रकार आहात हे कळल्यावर आनंद झाला. चित्रे फार आवडली. विशेषतः ते संगमरवराच्या पोताचा भास निर्माण करणारं अमूर्त चित्र खूप आवडलं.
- Log in or register to post comments
प
पैसा
Sun, 10/22/2017 - 17:22
नवीन
आवडले
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 10/22/2017 - 17:28
नवीन
+१
- Log in or register to post comments
न
नाखु
Sun, 10/22/2017 - 19:42
नवीन
परिचय
पुलेशु
- Log in or register to post comments
N
Naval
Mon, 10/23/2017 - 15:11
नवीन
सर्वांचे खूप खूप आभार !!
- Log in or register to post comments
म
मित्रहो
Mon, 10/23/2017 - 17:00
नवीन
सुंदर ओळख करुन दिली
- Log in or register to post comments
आ
आनंदयात्री
Mon, 10/23/2017 - 17:36
नवीन
हा परिच्छेद खूप आवडला. पुढे वाचतांना लेखातली किती वाक्यं क्वोट करू असे झाले म्हणून वाक्यावाक्याला दाद द्यायचा मोह आवरला. तुमचा हा लेख वाचणे हा अतिशय सॅटीस्फाईन्ग अनुभव होता. अजून लिहा, आम्ही वाचायला उत्सुक आहोत.
- Log in or register to post comments
N
Naval
गुरुवार, 10/26/2017 - 15:58
नवीन
हा परिच्छेद खूप आवडला. पुढे वाचतांना लेखातली किती वाक्यं क्वोट करू असे झाले म्हणून वाक्यावाक्याला दाद द्यायचा मोह आवरला. तुमचा हा लेख वाचणे हा अतिशय सॅटीस्फाईन्ग अनुभव होता. अजून लिहा, आम्ही वाचायला उत्सुक आहोत.
धन्यवाद ! नक्की लिहीत राहीन.
- Log in or register to post comments