Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

मुंबईकर . . . . .

म — माम्लेदारचा पन्खा, Sat, 09/30/2017 - 20:24
मृत्यूचे दूत आले कुठून हे प्रत्यक्ष मृत्यूलाही सांगता नाही आलं . . अशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं ? रोजची सकाळ तुझ्यासाठी एक नवीन युध्द . . . काल तुला चिलखतही घालता नाही आलं . . . अशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं ? घड्याळाचे काटे तसे रोजच बोचतात नजरेत . . . अजून एक दिवस त्यांना नजरेआड का नाही करता आलं ? अशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं ? भिजला असतास पावसात तर सुकवता आलं असतं स्वतःला . . पण भिजण्यापेक्षा मरण कधी आणि कसं जवळचं झालं ? अशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं ? तुझ्या पाच मिनिटांच्या घाईने तुझ्या आप्तांचं सर्वस्व हिरावून नेलं . . . उघडे पडले संसार ,मूलबाळ पोरकं झालं ! अशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं ? मुंबईकर म्हणवून घेतलेस आयुष्यभर पण आयुष्य तुला कुठे जगता आलं . . . . . अशी घाई काय कामाची मुंबईकरा जिच्यामुळे तुला हवं तिथं कधीच पोचता नाही आलं ?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1746 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 1 hour ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 2 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 2 hours ago
  • सुंदर !!
    3 days 2 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 2 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा