Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • संस्कृती..
  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न (वाविप्र)
  • गणेशचतुर्थीला शुभारंभ!
  • «
  • ‹
  • 4773
  • 4774
  • 4775
  • 4776
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

पुरंदराचं तेजस्वी पातं!

दिवाळी अंक Wed, 10/18/2017 - 20:30

Header2

मुरारबाजींचं व त्यांच्यासमवेतच्या सर्व मावळ्यांचं अतुलनीय शौर्य म्हणजे एक दीप्तीमान तुरा आहे स्वराज्यगाथेतला!
त्यातून प्रेरणा न मिळालेला मराठी माणूस विरळाच. त्याच शौर्याचं वर्णन करायचा एक अल्प प्रयत्न. त्यांना शत-शत नमन. _/\_

कफन बांधुनी आलेला.. कफनातच गेला..
शत्रूचा आवेशही गळला.. कफनातच मेला..
संख्येची ना तमा तयाला..आता वज्राघात!
हट्टानं अन् पेटून उठलं तलवारीचं पातं!

असंख्य शस्त्रं जेथे थकली.. ते शब्दांनी झालं
खानाच्या बोलांनी काळीज अंगारून आलं..
उफाळला तो त्वेष पुरंदरी.. अवघा निमिषांत..
हट्टानं अन् पेटून उठलं तलवारीचं पातं!

कडाडून जणू वीज उमटली शस्त्राघातातुनी..
प्रलयभयंकर शब्द उतरला गडमाथ्यावरुनी..
अगणित शत्रूंमध्ये घुसला जळता प्रपात!!
हट्टानं ते पेटून उठलं तलवारीचं पातं!

तलवारींचं रुद्रभैरवी तांडव गरजत रणी..
चिरफाळला जो उभा राहिला त्यांच्या अंगेजणी..
खानाच्या वेधानं सुटला तो लोळ रोरावत!!
हट्टानं ते पेटून उठलं तलवारीचं पातं!

वेगाचा तो नाद गूंजला.. गरजूनच गेला!
खान वाचला जरी.. आसुरी माज शांत झाला!
"नरडीचा त्या घोट गिळाया [उरले] अंतर चार हात!"
नि:श्वासातून जणू म्हणालं हट्टाचं पातं!

तेजस्वी तो प्रताप केवळ.. त्याला उपमा नाही..
संक्षेपानं बचावल्याच्या पराभवाची ग्वाही!
त्या हट्टानं धडकी भरली शत्रू काळजांत!!
स्वराज्याच्या शिरपेचातील तेजस्वी पातं!!

Footer

प
पाषाणभेद गुरुवार, 10/19/2017 - 05:05 नवीन
सुंदर रचना. कुसूमाग्रजांच्या 'सात' (वेडात मराठे वीर) या कवितेची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 10/23/2017 - 08:44 नवीन
आवेशपूर्ण !
  • Log in or register to post comments
प
पद्मावति गुरुवार, 10/19/2017 - 13:30 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 10/19/2017 - 13:54 नवीन
सुरेख काव्य!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 10/19/2017 - 15:10 नवीन
वीररसातलं सुंदर काव्य! स्वाती
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 10/26/2017 - 09:07 नवीन
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
M
Mahesh Bhalerao Sat, 10/28/2017 - 12:59 नवीन
प्रेरणादायी काव्य ! छानच !
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 10/28/2017 - 16:58 नवीन
वीररसातलं काव्य आवडलं.
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 10/30/2017 - 13:52 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 10/30/2017 - 13:59 नवीन
छान.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 5162 views
  • Log in or register to post comments
  • 5162 views

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 19 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 31 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 33 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 35 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 38 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: देवराजश्री
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:08
  • सदस्य: गबाळा
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:01
  • सदस्य: सन्केतनिमकर
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 05:46
  • सदस्य: सअप
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 23:36
  • सदस्य: Anuja
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 19:58
  • «
  • ‹
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781
  • 4782
  • 4783
  • 4784
  • 4785
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा