Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • संस्कृती..
  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न (वाविप्र)
  • गणेशचतुर्थीला शुभारंभ!
  • «
  • ‹
  • 4773
  • 4774
  • 4775
  • 4776
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

गाणे

दिवाळी अंक Fri, 10/20/2017 - 20:30


गाणे

ओलांडून कितीकदा प्रकटले मी या जगाच्या मिती
येतानाच कळेल काय इथला मुक्काम माझा किती?
श्वासांची गणिते करून क्षणही जन्मांतरी मोजले
केव्हा या घरट्यामधून उडणे भाळी असे कोरले?

'आता येथुन एक पाउल पुढे आहे तुला जायचे
त्या ठायीच तुझे नवे घर असे, तेथेच थांबायचे'
कोणी सांगत राहते हर क्षणी कानी असे काहिसे
जाते मोजत पाउले किति तरी मुक्काम तो ना दिसे

पाकोळी घुमटात एकटी झुरे देहात आत्मा तसा
इच्छेवाचुन देहही वसतसे कोणी दिलेला वसा
होते निर्मम चित्त मात्र सुटका सोपी कुठे एवढी?
मुक्तीची अडवून वाट बसली दारी भुते केवढी

जन्माशी जुळला असे तरि कुठे मृत्यू कुणाला कळे?
त्याचा काढत माग जीव जळतो, आयुष्यही काजळे
आरंभातच अंत पाहत कसे नाट्यांश रंगायचे?
आरोही अवरोह गात कुठले गाणे पुरे व्हायचे?

क्रांति

य
यशोधरा Sat, 10/21/2017 - 18:31 नवीन
सुर्रेख!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sun, 10/22/2017 - 10:41 नवीन
अप्रतिम!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Tue, 10/24/2017 - 06:52 नवीन
इतकी अचूक वृत्तबद्ध आणि (तरीही) तरल, अर्थपूर्ण कविता वाचली!
  • Log in or register to post comments
M
Mahesh Bhalerao Sat, 10/28/2017 - 13:09 नवीन
एक वास्तव सत्य !........ छान मांडलाय !
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 10/30/2017 - 13:57 नवीन
वा!
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 10/30/2017 - 14:27 नवीन
होते निर्मम चित्त मात्र सुटका सोपी कुठे एवढी? मुक्तीची अडवून वाट बसली दारी भुते केवढी
__/\__
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3431 views
  • Log in or register to post comments
  • 3431 views

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 33 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 45 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 47 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 49 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 53 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: देवराजश्री
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:08
  • सदस्य: गबाळा
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:01
  • सदस्य: सन्केतनिमकर
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 05:46
  • सदस्य: सअप
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 23:36
  • सदस्य: Anuja
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 19:58
  • «
  • ‹
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781
  • 4782
  • 4783
  • 4784
  • 4785
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा