Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

हरा-भरा पराठा

र
रुपी
Fri, 09/22/2017 - 06:46
p1 साहित्यः पारीसाठी: १ जुडी पालकाची पाने, गव्हाचे पीठ, बेसन पीठ, १/२ चमचा ओवा, हिरवी मिरची/ लाल तिखट, मीठ, तेल, पाणी सारणासाठी: ३-४ उकडलेले बटाटे, आले-लसूण पेस्ट, ४-५ पुदिन्याची पाने बारीक चिरुन (ऐच्छिक), मीठ, हळद (ऐच्छिक), लाल तिखट/ हिरवी मिरची, जीरे पूड कृती: १. पालकाची पाने खुडून, धुवून घ्या. एका भांड्यात थोड्याश्या पाण्यात ती पाने घालून आचेवर ठेवा. पाच-सात मिनिटांनी आच बंद करा. हिरवी मिरची घालून आणि पाण्यासहीत ती पाने मिक्सरमधून प्युरी करुन घ्या. २. त्यात मावेल तेवढे गव्हाचे पीठ घाला. मी एक मोठा चमचा बेसनपीठही घातले. चवीप्रमाणे मीठ, गरज वाटल्यास आणखी तिखट, ओवा घाला. तेलाचा हात लावून चांगले मळून घ्या. हे पीठ थोडेसे ओलसरच राहू द्या आणि झाकून ठेवा. ३. सारणासाठी बटाटे सोलून घ्या आणि मॅश करा. उरलेले सर्व साहित्य घालून एकत्र करा. ४. पराठे बनवण्यासाठी पिठाचा लिंबाएवढा गोळा घ्या. पुरीएवढा लाटून त्यात मावेल तेवढे सारण घाला. कडा उचलून सर्व बाजूंनी व्यवस्थित बंद करा. सारण बाहेर येणार नाही याची काळजी घेत पराठा लाटा. ५. गरम तव्यावर पराठ्याला तूप/ तेल/ बटर लावून खरपूस भाजा. दही/ चिंच-खजूराची चटणी/ केचप याबरोबर गरम गरम खायला द्या. p2 टीपः १. सारणासाठी तुम्ही ज्या आवडतील त्या भाज्या घालू शकता. मी एकदा बटाट्याच्या सारणाबरोबरच बारीक चिरलेला कोबीही घातला होता. मुळा कीसून, त्यातले पाणी काढून तोही घालू शकता. २. याच पराठ्यावर चटणी लावून काकडी, टोमॅटो, कांदा इ. घालून त्याची गुंडाळी करुनही खाता येईल. (हा प्रकार आमच्याकडे एके ठिकाणी 'हरा-भरा व्रॅप' म्हणून मिळतो).

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 12127 views

💬 प्रतिसाद
प
प्रीत-मोहर Fri, 09/22/2017 - 06:57 नवीन
मस्त दिसतय हे प्रकरण
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 09/22/2017 - 12:23 नवीन
टेस्टी लागत असणार नक्कीच ! पण खटपट भारी.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 09/22/2017 - 13:05 नवीन
सॉरी, पांचट जोक मारायला आलो आहे. एस्पीडीपीच्या चालीवर या पाकृचं नावः ह भ प.
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 09/22/2017 - 21:33 नवीन
हे एसपीडीपी म्हणजे नक्की काय असतं? मला फक्त पाणीपुरी माहीत आहे, जी मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्या चाट-फिटच्या गाड्यांपासून मी चार हात लांबच राहतो. रुपीताई, पराठा चांगला दिसतो आहे.
  • Log in or register to post comments
र
रुपी Fri, 09/22/2017 - 21:37 नवीन
धन्यवाद :) अवांतर : अरे, ये एसपीडीपी नही जानते! तुम्ही पुणेकर आहात ना? ;)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 09/22/2017 - 13:11 नवीन
भन्नाट मस्त दिसते आहे!
  • Log in or register to post comments
म
मंजूताई Fri, 09/22/2017 - 15:59 नवीन
करून बघण्यात येईल...
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 09/22/2017 - 16:33 नवीन
खूपच छान पाकृ!
  • Log in or register to post comments
ग
गम्मत-जम्मत Fri, 09/22/2017 - 17:30 नवीन
एक चमचा भाजाणीच पीठ घालून अजून भारी लागेल.
  • Log in or register to post comments
र
रुपी Fri, 09/22/2017 - 21:41 नवीन
धन्यवाद. हो खरंय. भाजणीचे पीठ सध्या घरात नाही, असेल तर मी पराठे, धिरडी यांतही नेहमीच घालते.
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 09/22/2017 - 20:52 नवीन
छान दिसतोय पराठा. गरम गरम चविष्ट लागणार.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Sat, 09/23/2017 - 10:03 नवीन
छान .
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 09/23/2017 - 17:06 नवीन
मस्त दिसतो आहे पराठा. स्वाती
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Sun, 09/24/2017 - 16:13 नवीन
मस्त दिसतोय ह.भ.प. :) छानच ग
  • Log in or register to post comments
प
पुंबा Mon, 09/25/2017 - 15:19 नवीन
अरे!! काय झकास दिसतोय प्राठा.. तात्काळ खावासा वाटतोय. पण सारण भरून पराठा लाटणे आणी मग तो न फुटता भाजणे आवाक्याबाहेरचे वाटतेय.
  • Log in or register to post comments
र
रुपी Mon, 09/25/2017 - 20:09 नवीन
धन्यवाद सर्वांना! @सौरा, पराठा लाटताना जरासा फुटला तर हरकत नाही.. न फुटण्यासाठी ती कणीक जरा मऊ असायला हवी. शिवाय सारण भरल्यावर मी पराठा थोडासा हातांवरच थापते (भाकरीसारखाच), त्यामुळे फार फुटत नाही असा माझा तरी अनुभव आहे. नक्की करुन बघा :) @स्नेहांकिता ताई, खरंय.. खटपट आहे जरा.. त्यामुळे २ वेळा पराठे खाता येतील एवढे सारण आणि कणिक बनवून ठेवते मी ;)
  • Log in or register to post comments
ज
जुइ Tue, 09/26/2017 - 20:45 नवीन
उत्तम पाकृ. सवडीने करून बघेन.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Tue, 09/26/2017 - 21:43 नवीन
वाह, मस्तच.
  • Log in or register to post comments
I
II श्रीमंत पेशवे II Fri, 09/29/2017 - 09:13 नवीन
छान दिसतोय पराठा
  • Log in or register to post comments
इ
इडली डोसा Sat, 09/30/2017 - 00:25 नवीन
मी पण असच करते फक्त बटाटा एकच घालायचे, आता जास्त घालुन करुन बघते.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 19 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 21 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 23 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 26 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा