Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

Cheesy Hashbrown अर्थात बटाट्याचे थालीपीठ

ग
गम्मत-जम्मत
गुरुवार, 09/21/2017 - 16:11
माझ्या बाबतीत नेहमी घडणारी गोष्ट म्हणजे नाले साठी घोडा खरेदी... कुणी तरी घरी येणार म्हणून कोणत्या तरी सँडविच साठी घरी cheese इटालियन हर्ब्स, चिली फ्लेक्स अशा आणलेलं होत, अर्थात सँडविच न बनवता बुर्जी पाव खाल्ल्याने हे सर्व फ्रिज मध्ये शोभिवंत होऊन पडलं. त्याचा सदुपयोग करण्या साठी हि पाकृ केली. (मी ऋजुता दिवेकर ची पंखी असल्याने ब्रेड, बिस्कीट घरी दुर्मिळ!! त्यामुळे ब्रेड का नाही आणला हा प्रश्न बाद!! ) पाकृ येणेप्रमाणे - साहित्य - २ मोठे बटाटे लांब-लांब किसून, कांदा बारीक चिरलेला, कांद्याची पात बारीक चिरून, इटालियन हर्ब्स, चिली फ्लेक्स, मोझरेला किंवा प्रॉसिस्ज्ड चीझ किसून, (मी प्रोसिस्ज्ड चीझ वापरलं ), १ अंडे फेटून,किंवा - १ चमचा डाळीचे पीठ, शिमला मिरची उभी चिरून. कृती- १. बटाटे लांब किसून घ्यावे, मग थंड पाण्यात बुडवून घट्ट पिळून घ्यायचे. किसामध्ये पाणी राहता कामा नये. २. बारीक चिरलेला कांदा, कांद्याची पात,किसलेला बटाटा, शिमला मिरची, हर्ब्स, चिली फ्लेक्स (भरपूर)हे सर्व एकत्र करून घ्यावे. फेटलेले अंडे किंवा बेसन या मिश्रणात टाकावे. सर्वात शेवटी चवी नुसार मीठ घालायचे. ३. हे मिश्रण आता साधारण थालीपीठाच्या पिठा सारखे दिसेल. निर्लेप तव्यावर किंचित तेल पसरून, बटाट्याची थालीपीठे लावावीत. थोडीशी जाडसर थापली तर छान लागतात. ४. खालील बाजू भाजली गेली कि थालीपीठ उलटायचे आणि किसलेले चीझ कमी/भरपूर घालायचे. मग ४-५ मिनिटे मंद आचेवर शिजवून खायचे. ५. चीझ मस्त वितळायला लागेल तशी आपण लाळ गाळायला लागतो आणि सोबत कोणता सॉस नसला तरी चवीने खातो. तरीही हवा असल्यास टोमॅटो सॉस घ्यावा. माहिती स्रोत - आंतरजाल/ तू-नळी

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9756 views

💬 प्रतिसाद
र
राघवेंद्र गुरुवार, 09/21/2017 - 19:49 नवीन
फोटू कुठाय ?? तरीही पाककृती मस्तच. ते Dunkin Donuts मधील दोन-तीन पाकिटे एकदम खाण्यापेक्षा घरीच करण्यात येईल. खूप धन्यवाद !!!
  • Log in or register to post comments
ग
गम्मत-जम्मत Fri, 09/22/2017 - 14:00 नवीन
धन्यवाद!! फोटो लावले आहेत आता..
  • Log in or register to post comments
ग
गम्मत-जम्मत Fri, 09/22/2017 - 13:50 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गम्मत-जम्मत Fri, 09/22/2017 - 13:58 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Sat, 09/23/2017 - 07:35 नवीन
एक्/दोन कच्चे बटाटे सालासकट किसुन एका पॅन मधे थोडे बटर टाकुन त्यावर पसरुन ठेवतो, त्यात पुन्हा किसलेले चीज टाकुन व चवीपुरते मीठ टाकुन झाकण ठेवुन दोन्ही बाजुने गोल्डन ब्राउन होईपर्यंत खरपुस भाजतो..........(फक्त आणी फक्त माझ्या लेकीसाठी) कं दिसत माहितीय !!!!!!आनी कं भारी लागत पन !!!!!
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 09/23/2017 - 10:59 नवीन
व्वा! यम्मी! इरसाल यांची सोप्पी पाककृतीही मस्त. करून बघणेत येईल. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
ग
गम्मत-जम्मत Sat, 09/23/2017 - 11:46 नवीन
Dhanyawad!!
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Sun, 09/24/2017 - 04:44 नवीन
बटाटा +चीज = विषय संपला!
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Sun, 09/24/2017 - 16:15 नवीन
मस्तच. इरसाल यांची पाकृपण खूप मस्तच. आईग्ग. खूप छान लागत असणार.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 09/24/2017 - 17:24 नवीन
खाताना किती गिल्टी वाटेल या विचाराने हुडहुडी भरलीय! =))
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 10/02/2017 - 20:33 नवीन
डोळे बंद करून खायचं.
  • Log in or register to post comments
ग
गम्मत-जम्मत Wed, 09/27/2017 - 17:43 नवीन
गिल्टी नाही वाटुन घ्यायचं, खाण्यासाठी जन्म आपुला :D
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 53 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 5 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 9 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 12 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा