Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

आणि दानव बाहेर येतो..

ह
हेमंत ववले
गुरुवार, 07/27/2017 - 15:16
💬 12
Not the way to be happy काल मढे घाटात जाण्याचा योग आला. व मढे घाटाची लागलेली वाट पाहुन त्वरीत घरची वाट पकडली... अंदाजे ७-८ वर्षापुर्वी पहिल्यांदा तिकडे गेलो असीन , तेव्हाचा मढे घाट व आत्ताचा यात जमीन आस्मानाचा फरक आहे. माहीती तंत्रज्ञान, सोशल मीडीया मुळे माहीती लवकर प्रसारीत होत आहे. त्या काळी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच पर्यटक तिथे येत, सध्या वीकयेंड ला किमान ४०० मोटारगाड्या, ५०० ते ६०० मोटारसायकली येत आहेत. म्हणजे दिड ते दोन हजाराच्या आसपास पर्यटक येत आहेत. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळाला हे खरे पण ज्या सुंदर निसर्गाच्या पर्यटनाचा आनंद घ्यायला लोक येतात, त्या निसर्गाचे इतके नुकसान करीत आहेत की येत्या ५-१० वर्षात, मढे घाट दारुच्या, बीयरच्या, प्लास्टीक बाटल्या, प्लास्टीक पिशव्यांचा खच असलेला कचरा डेपो होईल की काय अशी भीती वाटते आहे. किती घाणेरडे प्रकार पर्यटनाच्या नावाखाली होत आहेत की ते पाहुन तळपायाची आग मस्तकात जाते. मोटारसायकल स्वार, तरुण अतिउत्साही इतके निसर्गाच्या प्रेमात पडतात की त्यांनी दिलेल्या आरोळ्या, किंचाळ्या, आरडणे ओरडणे यामुळे बाकीचे पर्यटकच नाही तर पशु, पक्षी दगड धोंडे सुध्दा क्रुध्द होतील.. दुसरा प्रकार पाहायला मिलतो तो म्हणजे, मढे घाटात येऊन दारु पार्टी करणा-यांचा..यांचा सरंजाम एवढा भारी की हे लोक्स एखादा टेंपो घेऊन, त्यात गॅस सिलींडर, मटण, भाज्या, भांडी आणी सर्वात म्हहत्वाचे म्हणजे अमर्याद दारु, घेऊनच येतात. मग हे लोक्स घाटमाथ्यावर कुठ तरी राहुटी लावुन साग्र संगीत पार्टी करतात. तिसरा प्रकार कार मधुन येणारे पण थोडे शिकलेले लोक्स, गाडी मधील मुझ्यिक सिस्टम मोटःया आवाजात लावुन रस्त्यात मधोमध , लाज सोडुन हिडीस नाच गाणे करणारा हा प्रकार... आणि एक प्रकार आहे, तो म्हणजे पावसाने भिजलेल्या माता भगिनींकडे वासनांध नजरेने पाहणारा, मध्येच बीभत्स कॉमेम्टस पास करणारा...... व सर्वात केविलवाणी पर्यटकांचा प्रकार म्हणजे वरील सर्व प्रकारच्या लांडग्यांपासुन स्वतःची व स्वःतसोबत असलेल्या स्त्रियांची काळजी वाहत, दबुन दबुन, हळु हळु, जमले तर निसर्गाचा आनंद घेणारा सामान्य पर्यटक.. माणसांनी खरच का स्वतःच्या उरात एवढ्या भावंनांना दाबुन ठेवलेले असते की संधी मिळताच, किंवा आपल्या ओळखणारे इथे कोणी ही नाही असे दिसताच, पोलीस नाही असे दिसताच ह्या भावनांच उद्रेक असा व्हावा की मानवाच्या आत दडलेला दानव च बाहेर यावा? टिप - मढे घाटाचे अप्रतिम फोटो पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. http://nisargshala.in/madhe-ghat-camping-near-pune/

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5654 views

💬 प्रतिसाद
द
दुर्गविहारी गुरुवार, 07/27/2017 - 17:18 नवीन
खरे आहे तुमचे! बहुतेक ऑफबीट जागांचे असेच झाले आहे. मी २००२ ते २०१० पर्यंत कासला दरवर्षी जायचो. आता तिकडे जावेसे वाटत नाही. काही नवीन जागा शोधल्यात, पण अर्थात त्यावर कधीही लिहीणार नाही. खुध्द कास परीसरात काही धबधबे आहेत, पण लोकांची वॄत्ती पहाता त्यांचीही वाट लागायला वेळ लागणार नाही. कधी कधी अनवट किल्ले हि मालिका लिहावी कि नको असे मला वाटु लागलय. लवकरच माझ्या निसर्गसंपन्न सह्याद्रीची वाट लागणार याची खंत आहे. अर्थात सारेच काही वाईट चाललेले नाही. सह्याद्री प्रतिष्टाण, दुर्गवीर सारखे वाहुन घेतलेले गट उत्तम कार्य करित आहेत. त्यांना शक्य ती मदत करणे ईतके तरी आपण करु शकतो. बाकी दारू पिणारे आणि ईतर अनिष्ट बाबी करणार्‍यांसाठी पोलिस अपुरे पडतात, बर काही स्वंयसेवी संस्थानी हे कार्य करावे तर संस्कृतीरक्षकांच्या नावाने बोंब सुरु होते. लोकांना वाटेल तो धुड्घूस घालायचा आहे मात्र नियंत्रण कोणतेच नको. अवघड आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंत ववले Fri, 07/28/2017 - 09:41 नवीन
मी देखील प्रयत्न केले मढे घाट परीसरात स्थानिकांच्या मदतीने. पण अपुरे पडताहेत. दुर्दैव.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 08/07/2017 - 08:55 नवीन
<<<<काही नवीन जागा शोधल्यात, पण अर्थात त्यावर कधीही लिहीणार नाही. खुध्द कास परीसरात काही धबधबे आहेत, पण लोकांची वॄत्ती पहाता त्यांचीही वाट लागायला वेळ लागणार नाही.>>> +111
  • Log in or register to post comments
इ
इरसाल कार्टं गुरुवार, 07/27/2017 - 18:49 नवीन
आणि बघवतही नाही.
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा गुरुवार, 07/27/2017 - 18:51 नवीन
सगळ्या पर्यटनस्थळांचं हेच झालं आहे . . . . . जायचं तरी कुठे असा प्रश्न पडतो . . . निसर्गाची अपरिमित हानी तर होतेच आहे . . . माणूस पशूच्याही खाली घसरलेला आहे . . . . . अशी हुल्लडबाजी करणारे जेव्हा एकेकटे असतात तेव्हा मुकाट मान खाली घालून असतात . . . . जथ्थ्याने बाहेर पडले की झालंच जनावर जागं . . .
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा गुरुवार, 07/27/2017 - 18:51 नवीन
सगळ्या पर्यटनस्थळांचं हेच झालं आहे . . . . . जायचं तरी कुठे असा प्रश्न पडतो . . . निसर्गाची अपरिमित हानी तर होतेच आहे . . . माणूस पशूच्याही खाली घसरलेला आहे . . . . . अशी हुल्लडबाजी करणारे जेव्हा एकेकटे असतात तेव्हा मुकाट मान खाली घालून असतात . . . . जथ्थ्याने बाहेर पडले की झालंच जनावर जागं . . .
  • Log in or register to post comments
ल
लोनली प्लॅनेट Fri, 07/28/2017 - 08:15 नवीन
या जगात खरे सुशिक्षित लोक किती असतील..माझ्या मते 1% पेक्षाही कमी..यावरून एक अप्रतिम आणि 100% खरा विचार आठवला.. " मानव हा सुशिक्षित प्राणी आहे हा त्याने केलेला दावा तोपर्यंतच खरा आहे जोपर्यंत अन्य कुण्या प्राण्याने तो केलेला नाही"
  • Log in or register to post comments
प
पिनाक Sun, 08/06/2017 - 20:53 नवीन
पीपल गेट द गव्हर्नमेंट दॅट दे डिझर्व. पीपल गेट द फॅसिलिटीज दॅट दे डिझर्व. पीपल गेट द कल्चर दॅट दे डिझर्व. इंडियन्स डिझर्व धिस.
  • Log in or register to post comments
व
विनटूविन Mon, 08/07/2017 - 08:40 नवीन
अधिकच वाईट वाटले. आधीच सज्जनांना सदैव दुय्यम नागरिकत्व मिळतेय आणि प्रारब्ध आहे हे असे वाटतानाच तुम्ही असेही म्हणताय की आपली लायकीच मुळी ती आहे....
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 08/07/2017 - 16:24 नवीन
सगळीकडेच हे प्रकार चालू आहेत.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 08/07/2017 - 18:18 नवीन
बहुतेक अनाहिता तर टुरिस्ट प्लेस ला अर्धा वेळ गॉड कणसे खायला आणि उरलेला वेळ दातात अडकलेले काढण्यात घालवतात.
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 08/07/2017 - 19:38 नवीन
त्या कधी आणि कुठे भेटल्या तुम्हाला?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा