पुणे ते कन्याकुमारी बाईकवरून
नमस्कार, मी आत्ताच यामाहा FZ नवी गाडी घेतली आहे, आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पुणे-रामेश्वरम-कन्याकुमारी असा फिरण्याचा मानस आहे,, पण मी एकटाच आहे, त्यामुळे मला काय काय खबरदारी घ्यायला लागेल? काय अडचणी येऊ शकतात? आपल्यापैकी जर कुणी जाऊन आले असेल तर सांगा...
मला चांगला प्लॅन करता येईल..
वारंवार पर्यटन म्हणून प्रवास करायचा तर एकटे जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. मग ते बाइक/साइकल/ट्रेकिंग माध्यम काहीही असो.एकटे जाणे / कंपनी नसणे हा एक तोटा असतो.. यातला फायदा म्हणजे आपण आपल्या मनाचे राजे असतो. आपल्या मनानुसार प्लॅन बनवायचा आणि भटकायचे. (मी नवीन ठिकाणी भटकताना त्या त्या गावात पुस्तके आणि कुंभारवाडे शोधत फिरतो.. सोबत कोणी असले तर हे शक्य होत नाही)बाइकवर जाणारे कॅम्रा,पैसेसहित कपडे वगैरेची बॅग कुठे ठेवतात?सॅडल बॅग असते.. गाडीच्या मागच्या सीटच्या दोन्ही बाजूंना ही बॅग बांधलेली असते. पैसे, कॅमेरा आणि अत्यंत महत्वाच्या वस्तूंसाठी एक छोटी सॅक पाठीवर ठेवायची.