Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

वॉशिंग्टन डीसी मेट्रो एरिया सहल - भाग ३

ज
जुइ
Sun, 07/02/2017 - 21:54
💬 10

Book traversal links for वॉशिंग्टन डीसी मेट्रो एरिया सहल - भाग ३

  • ‹ वॉशिंग्टन डीसी मेट्रो एरिया सहल - भाग २
  • Up
  • वॉशिंग्टन डीसी मेट्रो एरिया सहल - भाग ४ ›
भाग १, भाग २, भाग ४ ओल्ड पोस्ट ऑफिस पाहून झाल्यावर वॉशिंग्टन मॉन्युमेंटच्या दिशेनं चालू लागलो. खरेतर युनियन मेट्रो स्टेशनच्या समोरून सुटणार्‍या बसेस नॅशनल मॉलचा भाग फिरवून आणतात. इथेच सर्व मॉन्युमेंट्स आहेत. तसेच हॉप ऑन हॉप ऑफ टूर्सचा लाभ घेतला जाऊ शकतो. आम्ही मात्र ऐनवेळेवर काहीतरी घोळ घालून या सुविधा वापरल्या नाही आणि खूप पायपीट केली :-( . तर मग रमत गमत डी सीतील थोडी बोचरी गार हवा झेलत वॉशिंग्टन मॉन्युमेंटच्या दिशेने चालत राहिलो. रस्त्यात नॅशनल म्युझियम ऑफ आफ्रिकन अमेरिकन हिस्टरी अ‍ॅन्ड कल्चर लागले. या इमारतीचे उद्घाटन गेल्या वर्षी २४ सप्टेंबरला तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते झाले होते. या नेहमीपेक्षा खूपच वेगळ्या वाटणाऱ्या इमारतीचे बाहेरून निरिक्षण करून आम्ही शेजारीच असणाऱ्या वॉशिंग्टन मॉन्युमेंटला पोचलो. आता वातावरण एकदम झाकाळून आले होते.

वॉशिंग्टन मॉन्युमेंटचे निरीक्षण चालू असताना अचानक वर काही हेलिकॉप्टर्स भिरभिरू लागली. एकसारखे दिसणारे असे ते तीन हेलिकॉप्टर्स होते. ते कमी उंचीवरून उडत असल्यामुळे त्यावर काय लिहिले आहे स्पष्ट दिसत होते. त्यावर लिहिले होते 'UNITED STATES OF AMERICA'. हे हेलिकॉप्टर्स कोणत्या दिशेने चालले होते हे पाहू लागलो. आमच्या बरोबर इतरही अनेक पर्यटक एकटक पाहू लागले. लवकरच त्यापैकी एक हेलिकॉप्टर चांगलेच खाली आले आणि अलगदपणे व्हाइट हाउसच्या हिरवळीवर उतरले!! बाकीचे २ हेलिकॉप्टर बर्‍याच उंचीवरून घिरट्या घालत होते. या हेलिकॉप्टर्सपैकी ज्यामध्ये राष्ट्राध्यक्ष बसतात त्याला मरीन वन असे संबोधले जाते. असाच प्रकार एअर फोर्स वन या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत विमानाबाबतही असतो.
आम्ही लांबून थोड्या वेळ निरीक्षण केले. अजूनही काही हेलिकॉप्टर परत निघायची चिन्ह दिसेनात. मग व्हाइट हाउस जवळील पर्यटकांची गर्दी वाढू लागली होती. आम्ही असे ठरवले की वॉशिंग्टन मॉन्युमेंट पाहायला पुन्हा नंतर यावे आता मोर्चा व्हाइट हाउसकडे न्यावा ;-) . व्हाइट हाउसला लागून असे मोठे मोकळे मैदान आहे तिथे बरीच गर्दी जमली होती. आम्हीही त्या बघ्यांच्या गर्दीत सामील झालो ;-) . मग लक्षात आले की आज तर शुक्रवारची संध्याकाळ आहे राष्ट्राध्यक्ष आणि प्रथम कुटुंब त्यांच्या मार ए लागो च्या रिसॉर्टवर विकांताला राहायला निघाले होते. सुज्ञांना व्हाइट हाउस पाहायला कधी जावे हे वेगळे सांगायला नको ;-) . लवकरच प्रथम कुटुंब हेलिकॉप्टर मध्ये विराजमान झाले आणि जॉइंट बेस अ‍ॅन्ड्रुजला रवाना झाले जेथून ते फ्लोरिडाच्या वेस्ट पाम बीच येथे एअर फोर्स वन विमानाने जाणार होते. हेलिकॉप्टर साऊथ लॉनवर उतरताना आकाशातून काढलेला हा फोटो विकीवरून साभार. तसेच टचडाऊनपूर्वीचा हा फोटो जालावरून साभार. जिथे हेलिकॉप्टर उतरले होते व्हाइट हाउसच्या त्या मागील भागाला साऊथ लॉन असे म्हणतात. लांबून जरी हा भाग लहान वाटत असला तरी प्रत्यक्षात मात्र साऊथ लॉन्स अतिशय भव्य आणि तितकेच आखीव रेखीव आहे. मग आम्ही तिथे असलेल्या कुंपणाजवळ फोटो काढायला गेलो. इथे व्हाइट हाउसकडे पाठ करून अनेक फोटो काढले. समोरच वॉशिंग्टन मॉन्युमेंट दिसत होते. व्हाइट हाउस अनेकदा टीव्ही आणि फोटोंमधून पाहिले होते. मात्र इतक्या जवळून प्रथमच पाहिले असल्याने खूप छान वाटले. आमची मुलगी त्या कुंपणाला धरून उभी होती. ते तिला इतके आवडले की ते सोडायला तयार नव्हती :-) . खालचे दोन फोटोज जालावरून साभार. साउथ लॉनकडून व्हाइट हाउसला वळसा घालून जाताना जे उद्यान लागतं तिथला एक फोटो
आता जाणून घेऊया थोडे व्हाइट हाउसच्या स्थापत्या विषयी. व्हाइट हाउस चे डिझाइन आयरिश आर्किटेक्ट जेम्स होबान यांचे आहे. सन १७९२ ते १८०० सालापर्यंत याची मूळ वास्तू बांधली गेली. सन १८०० साली पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडम्स हे व्हाइट हाउस मध्ये राहिले. तेव्हापासून आजवरच्या सर्व राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान व्हाइट हाउसच आहे. मूळ वास्तू बांधून पूर्ण झाल्यावर त्यात नंतर वेळोवेळी यात भर घालण्यात आली. १८१२ साली सुरू झालेल्या ब्रिटिश अमेरिकन युद्धादरम्यान १८१४ साली ब्रिटिश सैनिकांनी लावलेल्या आगीत व्हाइट हाउसचा आतील भाग जळून गेला. तसेच या आगीत बाहेरील भागाचेही नुकसान झाले. पुन्हा बांधणीचे काम अगदी लगेच चालू झाले होते.राष्ट्राध्यक्ष विल्यम हॉवर्ड टाफ्ट यांनी वेस्ट विंग वाढवून प्रथमतः ओवल ऑफिस निर्माण केले. हा काळ होता १९०९ सालचा. १८१४ साली लागलेल्या आगी नंतर व्हाइट हाउस असे दिसत होते. हा फोटो विकीवरून साभार. व्हॉइट हाउसचा सगळ्यात पहिला ज्ञात फोटो १८४६ साली John Plumbe यांनी काढला आहे. हा फोटो विकीवरून साभार. राष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडम्स हे जेव्हां राहायला लागले व्हाइट हाउस मध्ये त्यावेळी त्यांनी आपल्या पत्नीस एका पत्रात लिहिले की: "I pray Heaven to bestow the best of blessings on this House, and all that shall hereafter inhabit it. May none but honest and wise men ever rule under this roof." या ओळी राष्ट्राध्यक्ष फ्रँकलीन डी. रुझवेल्ट यांनी स्टेट डायनिंग रूम मध्ये एका मॅन्टलवर(हर्थवरील आधाराचा बीम) कोरून ठेवली आहेत. माजी फर्स्ट लेडी जॅक्लीन केनेडी यांनी काही महत्त्वपूर्ण सजावट त्यांच्या कार्यकाळात व्हाईट हाउस मध्ये केली. यात अनेक धनिकांनी मौल्यवान चित्रे तसेच फर्निचर इत्यादी वस्तू व्हाईट हाउस सजवण्यासाठी दान दिले. आश्चर्याची बाब अशी की यात एक अँटीक वॉलपेपर देखिल डिप्लोमॅटिक रूम सजवण्यासाठी वापरला गेला. हा वॉलपेपर एका आलिशान महालात वापरला होता १९६१ सालापर्यंत. हा महाल जमीनदोस्त केला गेला एका दुकानाच्या बांधकामासाठी. मात्र अगदी महाल पाडण्या आधी हा वॉलपेपर व्हाइट हाउसला विकला.कालांतरात अनेक सुविधा व्हाइट हाउस मध्ये भर टाकत गेल्या. जसे की अपंगासाठी सुलभ प्रवेशद्वार. तसेच पहिले संगणक आणि प्रिंटर इत्यादी.व्हाइट हाउसच्या वेस्ट विंग मध्ये ओवल ऑफिस आहे. जिथे राष्ट्राध्यक्षांचे ऑफिस आणि त्यांच्या सीनियर ऑफिसर्सचे कार्यालय आहेत. तसेच ईस्ट विंग मध्ये प्रामुख्याने फर्स्ट लेडीचे ऑफिस आहे. पुढे आम्ही चालत व्हाइट हाउसच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराच्या दिशेने जाऊ लागलो. काही वर्षांपूर्वीपर्यंत पेनसिल्वेनिया ऍव्हेन्युवर व्हाइट हाउस समोर पर्यटकांना उभे राहू दिले जात होते. आता पर्यटकांसाठी तिथे मुक्त प्रवेश नाहीये. त्याऐवजी व्हाइट हाउससमोरच्या उद्यानाजवळ (लाफेयट स्क्वेअर) गेल्यास तिथून व्हाइट हाउसची समोरची बाजू दिसू शकते. आम्हीही तिथे पोचलो. इथेही अनेक पर्यटकांची बरीच गर्दी होती. बरेच लोक फोटो काढत होते. तर काही लोक तेथील सुरक्षा कर्मचार्‍याना विचारत होते की "राष्ट्राध्यक्ष परत कधी येणार व्हाइट हाउस मध्ये?" ते कर्मचारी देखील न कंटाळता प्रत्येक वेळी नम्रपणे "आम्हाला काही त्याची कल्पना नाही" असे सांगत होते! इथेही काही भव्य पुतळे तसेच कारंजी आहेत. इथली हिरवळ अतिशय आखीव रेखीव आहे. इथे जाणवलेली आश्चर्याची बाब म्हणजे व्हाइट हाउसचा हा भाग डी सी शहरात गर्दीने गजबजलेल्या ठिकाणी आहे. व्हाइट हाउसच्या अगदी जवळच लागून अनेक मोठ्या बँकांची कार्यालये तसेच इतर अनेक व्यावसायिक कार्यालये आहेत. शिवाय एक बस थांबाही आहे. जिथे अनेक सिटी बसेस रांगा लावून उभ्या होत्या. संध्याकाळच्या वेळी इथे कुठल्याही शहराच्या मध्यवर्ती भागात असते तशीच वर्दळ होती. या ठिकाणी आम्ही लांबून काढलेले काही फोटोज. या परिसराची कल्पना येण्यासाठी गूगल अर्थवरून घेतलेला हा स्क्रीनशॉट अमेरिकेचे नागरिक असाल तर पूर्वनियोजित वेळ घेऊन व्हाइट हाउस आतूनही पाहता येते. तसेच अमेरिकेचे नागरिक नसाल तर आपल्या देशाच्या दूतावासाशी संपर्क साधून पाहता येते (हे मात्र किती सहजतेने होऊ शकते याची कल्पना नाही). या दिवसाच्या भटकंतीचा शेवट आम्ही इस्ट कोस्टमधल्या एका कॅफे चेनच्या (प्रेट) कॅफे मध्ये कॉफी व Croissant चा आस्वाद घेऊन केला. बोचरी हवा आणि अपुरा सूर्यप्रकाश यामुळे थोडे नाउमेद वाटत होते. मात्र ऐतिहासिक डी सी शहर पाहायला लागल्यावर मात्र ही उणीव भासली नाही. आजचा दिवस अनपेक्षित गोष्टी पाहायचा होता. त्यात क्लॉक टॉवर आणि प्रथम कुटुंबाला घेऊन जाणारे हेलिकॉप्टरचे उड्डाण पाहायला मिळाले. एकंदरीतच डीसीच्या पहिल्या दिवसाच्या भटकंती मध्ये ही स्थळे प्रत्यक्षात पाहून आनंद वाटला. उर्वरित सहल अशीच चांगली पार पडेल याची खात्री वाटली. व्हाइट हाउसचा नॉर्थ लॉनवरुन काढलेला हा फोटो जालावरून साभार. माहितीचा स्रोत: विकी क्रमश:

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 10410 views

💬 प्रतिसाद
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 07/03/2017 - 20:55 नवीन
मस्त चालली आहे सफर ! पुभाप्र.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Mon, 07/03/2017 - 21:22 नवीन
वाह! मस्तच.
  • Log in or register to post comments
ज
जुइ गुरुवार, 07/06/2017 - 04:23 नवीन
सर्व वाचकांचे व प्रतिसादकांचे मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
उ
उपाशी बोका गुरुवार, 07/06/2017 - 05:14 नवीन
पुढच्या वेळी जमले तर व्हाइट हाउस आतून बघण्याची टूर करा. पण त्याच्यासाठी आधीच परवानगी घ्यावी लागते आणि आत फोटो काढता येत नाहीत.
  • Log in or register to post comments
ज
जुइ Fri, 07/07/2017 - 15:03 नवीन
भविष्यात व्हाइट हाउस आतून बघायचा प्रयत्न अवश्य करु.
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 07/07/2017 - 18:01 नवीन
छान प्रवास सुरू आहे :)
  • Log in or register to post comments
म
मिहिर Sat, 07/08/2017 - 00:33 नवीन
छान लेख. छिद्रान्वेषीपणाबद्दल आधीच माफी मागतो.
अमेरिकेच्या स्वातंत्र्य लढ्याची झळ अर्थातच नव्याने बांधलेल्या व्हाइट हाउसला देखिल बसली. सन १८१४ साली ब्रिटिश सैनिकांनी लावलेल्या आगीत व्हाइट हाउसचा आतील भाग जळून गेला.
हा स्वांत्र्यलढ्याचा भाग नव्हता. १८१२-१८१५ मध्ये अमेरिका व इंग्लंडमध्ये जे युद्ध झाले त्याचा भाग होता. ह्या युद्धाला १८१२चे युद्ध म्हणून ओळखले जाते. इथे बघा. अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध १७८३ मध्ये संपले.
  • Log in or register to post comments
ज
जुइ Sat, 07/08/2017 - 15:44 नवीन
ही मोठी चूक लक्षात आणून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. यापुढे अशा ऐतिहासिक संदर्भांचा उल्लेख करताना अधिक काळजी घेईन. लेखात दुरुस्ती केली आहे.
  • Log in or register to post comments
अ
अजया Sun, 07/09/2017 - 17:47 नवीन
आज वाचले नीट सर्व भाग. सुरेख फोटो आणि छान वर्णन.
  • Log in or register to post comments
र
रुपी Sun, 07/09/2017 - 23:06 नवीन
छान लेखन! फोटो आवडले, आणि अभ्यासपूर्ण लेखन मस्तच.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 59 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 11 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 13 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 15 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 18 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा