ब्रह्मगिरी - भांडारदुर्ग मोहीम
ब्रह्मगिरी-भांडारदुर्ग मोहीम
१. धुके दाटलेले...
रविवारला जोडून सोमवारची ईदची सुट्टी होती. जून महिन्याचा शेवटचा रविवार, पावसाला सूर गवसू लागलेला. खरं तर शनिवारी रात्रीच ट्रेकसाठी निघायचे होते. पण १८ जूनला कळसूबाईला जाऊन आले होते, बच्चे कंपनी स्पेशल ट्रेक करुन. त्यामुळे आत्ता घरुन रजा नव्हती. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे नाशिकला जाऊन अपघात झालेल्या माझ्या भाचीला भेटायचे होते. मग नाशिक आणि ब्रह्मगिरी-भांङारदुर्ग असा कार्यक्रम आखला. सहा गडी तयार झाले. पण ऐन वेळी पावसात वाट निसरडी असेल म्हणून तिघांनी येण्याचे रद्द केले. लेकिन हमारे हौसले बुलंद थे; शनिवारी रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत होता, त्यामुळे रविवारी पहाटे मन जरा साशंक झाले. पण डॉक्टरांच्या संदेशानी दिलासा दिला. ठीक सात वाजता ठाण्याहून निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी साचले होते. त्यामुळे गाडी अगदी हळू चालवणे भाग होते. तरीही मधे-मधे पुलाखाली वगैरे काचेवर धबधबे कोसळत होते. दुसऱ्या दिवशी सुट्टी होती, त्यामुळे पावसामुळे अडकून पडायला लागले तरी चिंता नव्हती. वाटेतले हिरवे डोँगर मन तृप्त करत होते. आता धबधबेही कोसळू लागले होते. बाहेर पाऊस रंगात तर गाडीत एकमेकांची थट्टा-मस्करी रंगात आली होती. वातावरणच तसे प्रसन्न आणि आनंदाने चिंब करणारे होते. बाबा दा ढाब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी होती. मग फक्त डिझेल भरुन आणि चाकांतली हवा तपासून लगेच पुढे निघालो. बरोबर आणलेला डबा काढून खमंग तिखट पु-यांचा आस्वाद घेतला आणि थेट नाशिक गाठले. तिथे सगळ्यांच्या भेटी, थोड्या गप्पा झाल्या. त्र्यंबकेश्वरच्या रस्त्यात अनेक डोंगर, धुके आणि ढग खुळावत होते.
२. ब्रह्मगिरी चढताना सभोवार दिसणारे दृश्य
घाट चढून आल्यावर पावसानीही जरा उसंत घेतली होती. मग कॕमेरा बाहेर निघाला आणि निसर्गरम्य दृश्य त्यात बंदिस्त होऊ लागली. अशा मनस्वीपणामुळे त्र्यंबकेश्वर गाठून ब्रह्मगिरीची चढाई सुरु करायला दुपारचे दोन वाजले.
ब्रह्माद्री हे ब्रह्मगिरीचे मूळ नाव. परंतु अशी आख्यायिका आहे की भगवान शंकर ब्रह्मदेवांवर प्रसन्न झाले आणि त्यांचे नाव ब्रह्मदेवांच्या नावाला जोडले जाऊन या पर्वताचे नाव ब्रह्मगिरी झाले. ब्रह्मगिरीवर गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी अहिल्या यांचे वास्तव्य होते. गौतम ऋषींनी येथे गंगा अवतीर्ण करण्यासाठी श्रीमहादेवांची तपश्चर्या केली.
३. मूळगंगा मंदिर
म्हणूनच येथे ही नदी 'गौतमी' या नावानी ओळखली जाते. सड्योजटा, वामदेव, अघोरा, ईशान आणि तट पुरुष अशी या पर्वताची पाच शिखरेअसून ती शिवाच्या पाच मुखांची प्रतीके आहेत.
४. ब्रह्मगिरीच्या पायऱ्यांवरुन एक वर्तुळाकार दृष्टिक्षेप
अठराशे फूट उंच उठावलेल्या ब्रह्मगिरीची समुद्रसपाटीपासूनची उंची ४२४८ फूट आहे. आजच्या दिवस जेवणाला सुट्टी देऊन चढाईला सुरुवात केली. कराचीचे सेठ लालचंद यांनी १९०८ साली या पर्वतावर ५०० पायऱ्यांचे बांधकाम केले. सरकारने आता दुतर्फा रेलिंगही घातले आहे, त्यामुळे भक्तगणांना त्याचा आधार मिळतो. ऊनही नाही आणि पाऊसही नाही अशी मस्त हवा होती. दूरवर अंजनेरी पर्वत व त्र्यंबकेश्वर व परिसरातील डोंगरमाथे दिसत होते.
५. ब्रह्मगिरीच्या वाटेवरुन अंजनेरी पर्वत
रविवारचा दिवस असल्यामुळे भाविकांची बरीच वर्दळ व देवदर्शनाची लगबग होती. आपल्या पूर्वजांचा इथे मुक्त संचार असल्याने कॕमेरा, पाउच इ. ची काळजी घ्यायला खबरदारी म्हणून ट्रेकिंग स्टिक बरोबर ठेवली होती.
६. भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती
वाटेत गंगाद्वाराकडे जाणारी वाट उजवीकडे ठेवून आम्ही सरळ चालत राहिलो. पहिला चढ संपल्यावर एका टपरीवर आलं घातलेलं मधुर चवीचं लिंबू सरबत पिऊन तरतरी आली. तिथे भांडारदुर्ग कोणत्या बाजूला, जायला किती वेळ लागतो इ. चौकशी करुन सुसाट ब्रह्मगिरीच्या माथ्याकडे झेपावू लागलो. बरीच उत्साही मंडळी वर-वर जाऊन फोटो काढत होती. समोर हर्षगड व भास्करगड स्पष्ट ओळखू येत होते.
७. डावीकडे हर्षगड व उजवीकडे भास्करगड
त्यामागच्या डोंगररांगा मात्र अंधुक होत्या. नाहीतर रतनगड, कळसूबाई, अलंग-मदन-कुलंग या ओळखीच्या किल्ल्यांचीही दृष्टिभेट घडली असती.
८. दूरवर दिसणाऱ्या पर्वतरांगा
किल्ला नजरेच्या टप्प्यात आला; पण वाट मात्र बिकट भासत होती. तरीही दोन-तीन टप्पे खाली उतरलो. त्यानंतर मात्र वाट अशक्य दिसत होती. तेवढ्यात डावीकडे नजर गेली तर शिवजटा मंदिराच्या मागच्या बाजूनी एक अरुंद पायवाट दुर्गभांडाराच्या दिशेने चाललेली दिसली. मग तिथून काळजीपूर्वक परत फिरुन वीस मिनिटांत शिवजटा मंदिर गाठले आणि त्या पायवाटेला लागलो. डावीकडे खोल दरी आणि उजवीकडे डोंगर अशी पायवाट पाच मिनिटांत पार झाली. पाऊस पडत नसल्यामुळे निसरडी वाट, चिखल, तुफानी वारा यांचा सामना करण्याच्या साहसाला मुकावे लागले. पायवाट संपली;
९. अंजनीपुत्र श्रीहनुमान
शिवकालीन गडांप्रमाणे वाटेच्या उजवीकडे हनुमानाचे छोटेखानी शिल्प दिसले आणि मग आत्तापर्यंत अदृश्य असलेल्या कातळात खोदून काढलेल्या पायऱ्या खोल घेऊन जाऊ लागल्या.
१०. अजोड वास्तुकलेचा नमुना असलेल्या पोटात खोदलेल्या पायऱ्या
क्षणभर सांधण दरीची आठवण झाली. एकेका पायरीची उंची जवळपास दीड फूट अशा ५०-६० पाय-या उतरताना मध्ये एक सौम्य वळण होते. ही वाट एका जेमतेम अडीच-तीन फूट उंची असलेल्या दरवाजापाशी घेऊन आली.
११. अरुंद पुलावर सोडणारा गुप्त दरवाजा
हा दरवाजा बुजून याची उंची कमी झाली आहे का अशी शंका आली; पण नाही गडाच्या सुरक्षिततेसाठीच ही गुप्त वाट अशी मुद्दाम निर्मिलेली असावी. इथे डोके खाली नमवून भूमातेचा आधार घेतच जावे लागते. यानंतर येतो दोन किल्ल्यांमधला अरुंद पूल. दोन्ही बाजूला हजार फूट खोल दरी, समोरच्या डोंगरात खोदलेल्या गंगाद्वाराकडे जाणाऱ्या पायऱ्या, सभोवार दिसणारे डोंगर-किल्ले हे सारे दृश्य, नजरेत भरत व मनःपटलावर रेखाटत हा चिंचोळा पूल पार केला. आणि पुनश्च अडीच-तीन फूट उंचीचा मूल होऊन रांगत जा म्हणणारा दरवाजा आला. तो ओलांडल्यावर भांडारदुर्गाच्या बाजूच्या कातळात खोदलेल्या, दीड फुटी ५०-५५ पायऱ्या मध्ये एक सौम्य वळण घेत चढून दुर्ग भांडारवर घेऊन गेल्या. इथे काळं कुत्रं सुध्दा फिरकत नाही असं म्हणायला जागा नको म्हणून काळू आमच्याबरोबर वर पर्यंत आला होता. मी पाठीवरची सॕक खाली ठेवली आणि फोटो काढायला पाउचमधून मोबाइल काढला आणि सॕक आणि पाउच तिथेच ठेवून परिसराचे व दुर्गाचे फोटो घेऊ लागले. इतक्यात इतर दोघेही वर पोहोचले आणि आता इथे योग्य जागा बघून थोडी पोट पूजा करावी असा विचार करतोय तोच मागे वळून बघत्येय तर वानरांची टोळी रांगेत उभी होती. जवळची काठीही खालीच ठेवली होती. पण तिची गरज पडली नाही; कारणआमच्याबरोबर आलेल्या काळूनी सगळ्या माकडांना भुंकून-भुंकून अंगावर धावून जात हाकलून दिले.
१२. आमचा सोबती काळू
आता आकाशात ढगांनी गर्दी केली होती. थोड्या वेळापूर्वी स्वच्छ दिसणारे भास्करगड आणि हर्षगड धुक्याची पटले लेवून सजले होते. आकाशात मध्येच कुठे सोनेरी महिरप लेवून सजलेला निळ्या रंगाचा तुकडा दिसत होता तर कुठे ढगांचे रथ चालत होते. त्र्यंबकेश्वरचे डोंगरही मध्येच धुक्यातून मान वर काढत होते. या सा-या पार्श्वभूमीवर हिरवाईने नटलेली पाचूंची शिखरे उठून दिसत होती.
१३. हिरवा निसर्ग हा भवतीने..
हा सारा निसर्ग कॕमेरॕमध्ये किती टिपू आणि काय सोडू अशी तिघांचीही तारांबळ उडाली. मग शांत दगडावर बसून खाऊचे डबे उघङले आणि काळू व त्याच्या मित्रांना नैवेद्य दाखवल्यावर आम्हीही थोडे खाऊन घेतले. आता मात्र परतीचा प्रवास सुरु करणे आवश्यक होते. दोन तासांपूर्वी माणसांनी फुलून गेलेल्या या जागेवर आता फक्त वाट चुकलेली किंवा उशीर झालेली दोन-चार डोकी दिसत होती. आम्हालाही शक्यतो उजेडात खाली उतरुन मुक्कामी पोहोचायचे होते. रात्री ७.३० पर्यत खाली उतरून घोटीच्या रस्त्याला लागलो. रात्री आठला हा रस्ता मध्यरात्र झालेली वाटावी इतका सुनसान होता. घोटी आल्यावर चहा आणि नाश्त्यासाठी मनाजोगतं हॉटेल शोधण्यात बराच वेळ मोडला. पण नवा दिवस सुरु होण्याच्या आत पावणेबारा वाजता ठाण्याला पोहोचलो. मनात विचार घोळत होते, या दुर्ग भांडाराचे असे अद्भुत बांधकाम कोणी बरे केले असेल? आजही त्र्यंबकेश्वर व ब्रह्मगिरी परिसरात भाविकांची एवढी गर्दी असते पण भांडारदुर्ग हे अप्रतिम वास्तुरचना असलेले स्थळ अज्ञात आणि गूढ कसे? एक अविस्मरणीय अनुभव देणाऱ्या या किल्ल्याच्या इतिहासाचा मागोवा घ्यायलाच पाहिजे.
१४. किल्ले भांडारदुर्ग

भांडारदुर्ग काय रौद्रसुंदर दिसतोय! अफलातून रचना आहे ही!!फोटो बघितल्यावरच जायची इच्छा व्हावी असे ठिकाण ! तुमच्या वर्णनाने अजून मजा आली !