Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

पालक राईस

स
सविता००१
Sat, 06/17/2017 - 04:11
. वाढणी - ४ व्यक्तींसाठी साहित्यः २ वाट्या तांदूळ, ३ वाट्या पाणी (तांदळाच्या प्रतीनुसार कमी- जास्त लागू शकते) - मी साधा कोलम र्तांदूळ वापरला आहे. १ चक्रीफूल, १ तमालपत्र, २ हिरव्या वेलच्या, मीठ चवीनुसार, १ मध्यम जुडी पालक, ४-५ हिरव्या मिरच्या, मूठभर पुदिना पाने, १ टीस्पून आलं लसूण पेस्ट, २ मोठे कांदे, १ टोमॅटो, १ चमचा जिरे, १/२ टीस्पून तिखट१/चिमूटभर हिंग, १/२ चमचा गरम मसाला, ३ टीस्पून तेल कृती: तांदूळ धुवून अर्धा तास निथळत ठेवा. एकीकडे पालकाची पाने धुवून ब्लांच करून घ्या. एका पॅन मध्ये १ टीस्पून तेल घालून त्यात एक मोठा कांदा पातळ लांब चिरून परतायला ठेवा. अगदी मंदाग्नीवर. तळणार नाही त्यामुळे १५-२० मिनिटे लागतात याला कुरकुरीत व्हायला. दुसर्‍या एका पातेल्यात एक टीस्पून तेल घालून ते तापलं की त्यात जिरे, तमालपत्र, चक्रीफूल आणि वेलच्या घाला. तांदूळ घालून थोडेसे परता. त्यात पाणी आणि चवीनुसार मीठ घालून झाकण न ठेवता शिजत ठेवा. आता मिक्सरच्या भांड्यात कांदा बारीक करून घ्या. नंतर टोमॅटो ची प्युरी करून घ्या. पालक पेस्ट करा. एका भांड्यात उरलेले एक टीस्पून तेल घेउन त्यात आधी थोडे जिरे, हिंग, आलं लसूण पेस्ट, कांद्याची पेस्ट आणि टोमॅटो प्युरी क्रमाक्रमाने घालून परता. पालक पेस्ट त्यात घालून गरम मसाला, तिखट आणि चवीनुसार मीठ, घाला. एवढं होईतो भात जवळजवळ शिजत आलेला असेल. त्यात ही पालक पेस्ट घालून नीट ढवळा. या पेस्ट मध्येही पाण्याचा अंश असतोच. त्यामुळे भात नीट शिजतो. तरीही एकदा पाहून हवे वाटल्यास थोडे पाणी घालावे. पालक राईस तयार. कुरकुरीत केलेला कांदा त्यावर घाला. टोमॅटो सार, पापड, लोणचं नाहीतर एखादी कोशिंबीर असा मस्त बेत करता येतो.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6831 views

💬 प्रतिसाद
प
पद्मावति Sun, 06/18/2017 - 21:31 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments
र
रुपी Tue, 06/20/2017 - 01:08 नवीन
मस्त.. नक्की करुन बघेन
  • Log in or register to post comments
ज
जुइ Tue, 06/20/2017 - 21:18 नवीन
नक्कीच करून बघेन!
  • Log in or register to post comments
प
पुंबा गुरुवार, 06/29/2017 - 14:37 नवीन
उत्तम.. ब्लांच करून म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
प
पुंबा गुरुवार, 06/29/2017 - 14:39 नवीन
अक्षरश: तोंपासु.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ गुरुवार, 06/29/2017 - 17:55 नवीन
करायचं म्हणजे उकळत्या पाण्यात किंचित मीठ घालून पालकची धुतलेली पाने २ मिनिटे ठेवायची. आणि लगेच ती पाने एका चाळणीवर ओतून त्यावर थंड पाणी घालायचे. किंवा गरम पाण्यातून ती पाने ताबडतोब बर्फाच्या पाण्यात घालायची. यामुळे त्या पालकचा हिरवा रंग टिकतो. कारण या भाज्या शिजल्या की त्यांचा रंग बदलतो.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Fri, 06/30/2017 - 08:46 नवीन
ओहके.. धन्यवाद ताई.. हे जरूर करून बघणार आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/30/2017 - 05:07 नवीन
भारी. अजुन येऊ दे...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 07/02/2017 - 14:10 नवीन
मस्त !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राकासी राकासी... ;) :- Rabhasa
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 43 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    16 hours 56 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    16 hours 57 minutes ago
  • सुंदर !!
    16 hours 59 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 3 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा