Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

शुक्रवारची कढी

म
माम्लेदारचा पन्खा
Tue, 06/13/2017 - 09:36
नमस्कार . . . . . या विभागात पहिल्यांदा काही तरी लिहितो आहे . . . . एक अप्रतिम पाककृती सापडली आहे ती आज तुम्हा सगळ्यांना सांगावीशी वाटतेय . . . . साहित्य - दही, बेसन,तूप किंवा तेल हळद,हिंग,मीठ,कढीपत्ता, आलं, मिरच्या,पाणी ,साखर कृती - पहिल्यांदा दह्याला थोडं बेसन लावून ठेवावं. काही भागाचं ताक करुन घ्यावं. एका भांड्यात फोडणी करुन घेऊन त्यात बेसन लावलेलं ताक टाकावं. मग साधं ताकही टाकावं. चवीप्रमाणे मीठ साखर टाकून त्याला झकास उकळी आणणे आणि घरच्यांना पेश करणे. टिपणी- आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की ही साध्या ताकाच्या कढीची कृती आहे पण मग शुक्रवारची कढी असं नाव का बरं ? ह्याचं कारण म्हणजे ती शुक्रवारी भरमसाठ आणि पळीवाढ प्रमाणात केली होती आणि ती खातो आहे अजूनही ! कढी भात, कढी पोळी असं सगळं खाऊनही ती उरते. अशाच प्रकारे मंगळवारची डाळ, बुधवारचा भात वगैरे चविष्ट पदार्थ करता येतात . . सो आज शुक्रवारची कढी आणि बुधवारचा भात आहे . . . मग काय . . येताय ना जेवायला ??

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8839 views

💬 प्रतिसाद
क
किसन शिंदे Tue, 06/13/2017 - 10:54 नवीन
फोटो कुठाय शुक्रवारच्या उरलेल्या कढीचा?
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 06/13/2017 - 10:55 नवीन
फोटोशिवाय कढी उरली आहे हे मान्य करता येणार नाही.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 06/13/2017 - 12:09 नवीन
प्लस वण टू किसनदेव.
  • Log in or register to post comments
स
सानझरी Wed, 06/14/2017 - 08:20 नवीन
+1
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 06/13/2017 - 10:59 नवीन
शुक्रवारी रात्री कढी पिणा-यांचा निषेध. बाकी चालू दे.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Tue, 06/13/2017 - 11:14 नवीन
त्यादिवशीच प्यायली असती तर उरली कशाला असती?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 06/13/2017 - 11:17 नवीन
मंगळवारी शुक्रवारची कढी टाकणे म्हणजे 'शिळ्या कढीला उत आणणे' असे म्हणता येईल का ? ;) :)
  • Log in or register to post comments
प
पिंगू Tue, 06/13/2017 - 19:11 नवीन
+१ हेच टंकाया आलो होतो..
  • Log in or register to post comments
र
रातराणी Tue, 06/13/2017 - 19:25 नवीन
=)) नन्तर त्या उरलेल्या कढीत टाकायला भजी करा. ते शिल्लक राहिले की सकाळचा नाश्ता भजी पाव ;)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 06/13/2017 - 20:26 नवीन
पाव शिल्लक राहयले की त्याची फोडनी देऊन उसळ.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 06/14/2017 - 03:46 नवीन
मापंची रसिकता आटली आपलं पातळ झालीय याचा नमुना.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 06/14/2017 - 09:13 नवीन
दू दू कं काका! =)))))
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 06/14/2017 - 16:07 नवीन
मापंकडे चांगले मासलेवाइक अनुभव गाठीशी असताना अशा पावसाच्या तोंडावर मिळमिळीत कढी पाजत आहेत याचा अर्थ झणझणीत कट्ट्याच्या आवतणाची वाट पाहात आहेत.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 06/14/2017 - 12:41 नवीन
आपल्याला, 'मापंची कढी पातळ झालीय ' असे म्हणायचे आहे का ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 06/14/2017 - 13:57 नवीन
आम्हाला चालेल. इथे तसेही बर्‍याचदा शिळ्या कढीला उत आलेला वाचलेला आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 54 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 6 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 10 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 13 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा