Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

कुरकुरीत्/क्रिस्पी भेंडी:

स
सविता००१
Sun, 06/11/2017 - 14:55
वाढणी: ३ व्यक्तींसाठी साहित्य: अर्धा किलो कोवळी भेंडी, १ टीस्पून तिखट, १ टी स्पून गरम मसाला, १/२ टीस्पून आमचूर पावडर, १/२ टीस्पून धने - जिरे पावडर, १/२ टीस्पून चाट मसाला, १/२ ते पाउण वाटी बेसन, चवीनुसार मीठ, शॅलो फ्राय करण्यासाठी तेल. कृती: पहिल्यांदा भेंडी धुवून टॉवेल वर कोरडी करून घ्यावी. नंतर दोन्ही बाजूंची टोके कापून प्रत्येक भेंडीला एक एक उभी चीर द्यावी. जर भेंडी खूप मोठी असेल तरच तिचे दोन-तीन तुकडे करावेत. नाहीतर अख्खीच ठेवा. एका ताटात हे सारे तुकडे ठेवून द्या. एका बाउल मध्ये तिखट, मीठ, धने-जिरे पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर, चाट मसाला, बेसन आणि मीठ हे सगळं नीट एकत्र करावं. कोरडंच. हा मसाला चिरलेल्या भेंडीवर व्यवस्थित पसरावा आणि हलक्या हाता ने भेंडीमध्ये मिक्स करावा. हे मिश्रण अर्धा तास तसेच मुरत ठेवून द्यावे. . नंतर एका पॅन मध्ये जरा जास्त तेल घ्यावे. आपण भेंडी तळणार नाही. त्याची काही आवश्यकता नाही. तेल तापले की त्यात भेंडीचे तुकडे घालून मंदाग्नीवर सावकाश परतावी. भाजी झाली की मात्र ती गरम गरमच भात-आमटी किंवा पोळी-रस्सा भाजी याबरोबर वाढावी. . टीपः- भेंडी तळली तर ती नंतर लगेच मऊ पडते. शिवाय तेलात बेसन आणि इतर मसाले खाली बसतात. ते तेल नंतर वापरता येत नाही नीट. त्यापेक्षा शॅलो फ्राय भेंडी जास्त वेळ कुरकुरीत रहाते, तेल खराब होत नाही आणि भाजीही जास्त तेलकट होत नाही.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 11211 views

💬 प्रतिसाद
ए
एस Sun, 06/11/2017 - 15:38 नवीन
हम्म. बादवे, दही घालून सरबरीत अशी भेंडी बनवता येईल का असा विचार मनात आला. मी खूप पूर्वी कुठेतरी अशी भेंडी खाल्ली होती. त्याची आठवण आली. सविताताई, तुम्हांला जर येत असेल तर त्याची पाकृ टाका प्लीज.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Sun, 06/11/2017 - 15:46 नवीन
नक्की नक्की. थोडासा वेळ द्या फक्त.
  • Log in or register to post comments
स
सानझरी Sun, 06/11/2017 - 18:00 नवीन
मलाही हविये ही रेसिपी. नक्की टाका. वाट बघतेय..
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Sun, 06/11/2017 - 18:33 नवीन
बरं बरं नक्की लवकरात लवकर. परत लगेच भेंडी केली तर मारच खाईन मी घरी :)
  • Log in or register to post comments
द
दशानन Sun, 06/11/2017 - 19:17 नवीन
भेंडीसारखी देखणी आणि चविष्ट भाजी नाही, फक्त हातात कला हवी! भरलेली भेंडी हा माझा आवडता पदार्थ आहे, पण माझ्या माहितीमध्ये खूप कमी लोक आहेत जे हवेतसे तयार करू शकतील.. :)
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sun, 06/11/2017 - 16:59 नवीन
भेंडीत दही, मसाला घालून घातलेले सांडगे हे सांगली जिल्ह्यात तरी घरोघरी सापडणाऱ्या ऐवजापैकी एक प्रकरण आहे सरजी, असे कुरकुरीत तळलेले सांडगे, मुगाच्या खिचडीसोबत बाहेर धो धो पाऊस पडत असताना ओरपायची मजाच वेगळी.
  • Log in or register to post comments
र
रुपी Mon, 06/12/2017 - 19:56 नवीन
माझी आजी अशी दही घालून भेंडी बनवायची. अगदी शेवटी दही घालायची आणि मग लगेच खायला वाढायची.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sun, 06/11/2017 - 17:01 नवीन
एरवी चकण्यात खाल्लेल्या 'कुरकुरी भिंडी' चे हे घरगुती साधे व्हर्जन सुद्धा आवडलेलं आहे, साधी पण उत्तम अन चविष्ट पाककृती वाटली ही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 06/11/2017 - 17:29 नवीन
तोंपासू चला आता आमच्या ३-१३ ग्रहावर भेंडी शोधणे आले....
  • Log in or register to post comments
म
मनिमौ Mon, 06/12/2017 - 08:37 नवीन
करून बघते नायतर तुझ्या कडे येते
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Mon, 06/12/2017 - 09:33 नवीन
सवे मस्त!!! आधीच भेंडी फेवरिट आहे. हे नक्की करुन बघेन.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Mon, 06/12/2017 - 10:01 नवीन
मस्तच सवि.
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 06/12/2017 - 10:10 नवीन
मेसमधल्या काकू भेंडी आडवी चिरुन असाच मसाला लावून तळून घेतात. अप्रतिम लागतात.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 06/12/2017 - 20:53 नवीन
नशीबवान आहात, मेसमध्ये भरलेली भेंडी खायला मिळतेय! पाकृ मस्त, तुम्ही जरा २ महिने सुट्टीवर जा बघू. सारख्या छान छान फोटो टाकून छळत असता ;)
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 06/12/2017 - 20:55 नवीन
"सविताताई" पाकृ मस्त, तुम्ही जरा २ महिने सुट्टीवर जा बघू. सारख्या छान छान फोटो टाकून छळत असता. =))
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Mon, 06/12/2017 - 11:54 नवीन
जोरदार सुरूये की पाककृती सदर
  • Log in or register to post comments
ज
जागु Mon, 06/12/2017 - 12:50 नवीन
कुरकुरीत आणि चमचमीतही. मस्त.
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Mon, 06/12/2017 - 18:28 नवीन
मस्त,मस्त,करणे मस्ट आहे.
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Fri, 06/16/2017 - 14:27 नवीन
मस्त सवे!माझ्याकडेही अशी भेंडी आवडते.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 06/16/2017 - 16:14 नवीन
>>भेंडीत दही, मसाला घालून घातलेले सांडगे हे सांगली जिल्ह्यात तरी~~~ बरोबर. गवारसुद्धा छान लागते. भेंडी पाकृ झकास.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा