Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

टोमॅटो पुरी

र
रुपी
Sat, 06/03/2017 - 02:17
p घरच्या सेंद्रीय बागेत भाजीपाला उगवून खाण्याची मजा वेगळीच. वेलीवर पिकलेले टोमॅटो तर बाजारात मिळणार्‍या कृत्रिमरित्या पिकवलेल्या टोमॅटोपेक्षा कितीतरी लज्जतदार! आमच्या शेजारच्या आजी दर वर्षी त्यांच्या बागेतले खोकेभर टोमॅटो न्युयॉर्कला दिराच्या घरी पाठवतात. त्यांच्याकडून बागकामाचे धडे घेऊन आणि सुरुवातीला काही अवजारे उधार घेऊन आम्हीही जरा सोप्या आणि खारी-पक्षी या मंडळींना फार आवड नसलेल्या अश्या टोमॅटोनेच शेतीकाम सुरु केले. रोपे लावल्यावर काही दिवसांनंतर एक-एक, दोन-दोन असे टोमॅटो मिळायला लागल्यावर ते असेच खाऊन संपत. पण हळूहळू वेली वाढायला लागल्या आणि त्यावरच्या टोमॅटोची संख्याही. नवर्‍याचं काम फक्त ते फक्त घरात आणण्यापुरतं. t2 पण एवढे टोमॅटो कसे वापरावे आणि कसे संपवावे? मग नेटवर शोधाशोध केल्यावर प्युरे बनवून ठेवायचे ठरवले. ती बनवण्यासाठी - टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले. धारदार सुरीने खालच्या बाजूने '+' चिन्हासारखे दोन काप दिले. खूप आत चीर देण्याची गरज नाही, फक्त सोलायला सोपे जावे म्हणून द्यायचे. पातेल्यात टोमॅटो मावतील इतपत पाणी घेऊन उकळायला ठेवले. पाणी उकळू लागल्यावर त्यात अलगदपणे टोमॅटो सोडले. ४-५ मिनिटे आणखी उकळू दिल्यावर आच बंद केली. टोमॅटो आता २-३ मिनिटे गार पाण्यात ठेवले. पाण्यातून काढून हाताने साल काढून घेऊन मिक्सरमध्ये पेस्ट करुन घेतली. छोट्या-छोट्या डब्ब्यांमध्ये भरुन फ्रीझरमध्ये ठेवले. अशी प्युरे नंतर सूप, ग्रेव्ही असलेल्या भाज्या यांसाठी वापरता येते. तर ही 'प्युरे' बनवता बनवता मला टोमॅटो 'पुरी' आठवली. (आम्हांलाही शाब्दिक कोट्या करता येतात म्हटलं!) मग ती बनवून बघायची खुमखुमी आली, आणि लगेच अंमलातही आणली. मग यातलीच वाटीभर प्युरे घेतली. त्यात मावेल तेवढी पीठे घातली - मी गव्हाचे, थोडे ज्वारीचे आणि थोडे (केप्र) भाजणीचे आणि त्याहून थोडे बेसन पीठ घेतले. तुम्ही आपापल्या अंदाजाने घ्या! ४-५ लसूण पाकळ्या ठेचून, कोथिंबीर बारीक चिरुन, मीठ, लाल तिखट, हळद, तीळ घातले. भरडसर वाटून धने आणि जीरे घातले, आणि थोडेसे तेल घालून पुरीसाठी घेतो तसे घट्ट मळून घेतले. कढईत तेल गरम करायला ठेवले आणि पुर्‍या तळून घेतल्या. त्या भरडसर धन्यांमुळे आणि अर्थातच टोमॅटोमुळे काय चव आली! पावसाळ्यात एखाद्या संध्याकाळी नक्की करुन पाहा. केचप, चटणी, लोणचे, दही किंवा यातले काहीच सोबत न घेता अश्याच खा :) p1

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 19488 views

💬 प्रतिसाद
ज
जेम्स वांड Sat, 06/03/2017 - 03:42 नवीन
तोंडाला पाणी सुटले वट्ट. प्रयोग करायला हवा हा. एरवी बाहेरून टोमॅटो काळा होईपर्यंत भाजून सोलून केलेलं टोमॅटो भरीत सुद्धा फारच जास्त आवडीचे
  • Log in or register to post comments
र
रुपी Mon, 06/05/2017 - 03:35 नवीन
धन्यवाद! टोमॅटोचे भरीत कधी खाल्ले नाही. असे नक्की करुन बघेन. त्यासाठी फार पिकलेले टोमॅटो चालत नसतील ना?
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Sat, 06/03/2017 - 04:25 नवीन
रुपे काय दिसताहेत ग टोम्ॅटोज!! मला निसत बघत बसायलाच आवडेल त्याकडे. प्युरेच्या पुर्या भारी दिसताहेत! !
  • Log in or register to post comments
म
मंजूताई Sat, 06/03/2017 - 05:17 नवीन
टोमॅटो ची असं च वाटलं फोटो त पुर्या दिसल्या रेसिपी त पुरी :) मस्त ! टोमॅटो, प्युरी, पुर्या....
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 06/03/2017 - 05:38 नवीन
मसाला पुरी, पालक पुरी हे सारं फार आवडीचं. त्यात अजून एका पुरीची भर पडली. पाकृ आवडल्या गेली आहे! Sandy
  • Log in or register to post comments
र
रुपी Mon, 06/05/2017 - 03:45 नवीन
बाब्बौ संदीप भाऊ पाकृ मध्ये? धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 06/03/2017 - 05:52 नवीन
व्वाह...!!!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 06/03/2017 - 11:11 नवीन
असेच म्हणतो.. +१ व्वाह...!!!
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 06/03/2017 - 08:29 नवीन
आवडली रेसिपी !
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 06/03/2017 - 10:54 नवीन
टंबाटी लय भारी दिसत्यात गड्या. पुऱ्या म्हंजी आक्षी पुर्नबिरम्मच की! अहाहा!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sat, 06/03/2017 - 11:41 नवीन
आहाहा...मस्तच!
  • Log in or register to post comments
प
पलाश Sat, 06/03/2017 - 13:11 नवीन
सुंदर लेखन. पाककृती आणि फोटोसुद्धा मस्त!!!
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 06/03/2017 - 13:24 नवीन
प्युरी आणि पुरी दोन्ही रेशीप्या एक नंबर!
  • Log in or register to post comments
स
सानझरी Sat, 06/03/2017 - 13:44 नवीन
झकास रेसिपी.. करून बघेन.. :D
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Sat, 06/03/2017 - 13:56 नवीन
का ग टाकली पुरीची रेसिपी. फॅटी लिव्हर झालंय त्यात आम्हा खान्देशी लोकांना भाजीत कचच तेल घेतल्याशिवाय होत नाही.तिखट मिठाची अतिप्रिय पुरी उद्या करावीच लागेल. उद्या टमाटे प्युरी घालते त्यात.
  • Log in or register to post comments
स
सपे-पुणे-३० Sat, 06/03/2017 - 14:06 नवीन
पुऱ्या मस्त टेम्पटिंग आहेत. घरचे टोमॅटो मस्तच दिसतायत. मी टोमॅटो प्युरी करून आईस ट्रे मध्ये ओतून त्याचे क्युब्स झाल्यावर झिप लॉक पिशवीत भरून ठेवते. हे क्यूब्ज वर्षभर आरामात टिकतात.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Sat, 06/03/2017 - 17:49 नवीन
अप्रतिम दिसताहेत. खूप खूप आवडतात. केल्याच पाहिजेत आता.
  • Log in or register to post comments
प
पिंगू Sat, 06/03/2017 - 21:28 नवीन
पुर्‍या छानच बनल्या आहेत. मिश्र पीठ वापरुन थालीपीठ सुद्धा छान होईल ना..
  • Log in or register to post comments
र
रुपी Mon, 06/05/2017 - 03:46 नवीन
धन्यवाद. कल्पना छान आहे.. एकदा करुन पाहाय्ला पाहिजेत
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Sat, 06/03/2017 - 22:10 नवीन
एखादा बॉक्स पाठवुन दे! मला गेले अनेक दिवस अत्यंत भंगार टोमॅटो इथे मिळत आहेत. त्यामुळे पुरी पेक्षाही त्या फोटोने जास्त जळजळ झाली.
  • Log in or register to post comments
र
रुपी Sun, 06/04/2017 - 16:39 नवीन
या वर्षीचे टोमॅटो अजून 'मेकींग' मध्ये आहेत! तयार झाले की पाठवते. तुमचा पत्ता द्या ;)
  • Log in or register to post comments
र
रुपी Sun, 06/04/2017 - 16:42 नवीन
सर्वांना धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 06/04/2017 - 16:54 नवीन
पुर्‍या लै भारी दिसताहेत. आवडल्या. (टमाटे पण आवडले, गोल मस्त) आने दो, और भी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
इ
इडली डोसा Mon, 06/05/2017 - 05:49 नवीन
पुर्‍या पटकन उचलुन खाव्याश्या वाटतायेत. फारच टेम्टिंग दिसतायेत. किती छान छान पदार्थ करतेस रुपी, तू माझ्या शेजारी का राहात नाहिस? ;)
  • Log in or register to post comments
क
केडी Mon, 06/05/2017 - 06:08 नवीन
स्वतःच्या बागेत पिकवून ते खाणे ह्याची लज्जत कमाल असेल... फोटो आणि पाककृती मस्तच!
  • Log in or register to post comments
स
सप्तरंगी Mon, 06/05/2017 - 08:11 नवीन
घरचे टोमॅटो, सही..
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 06/05/2017 - 08:29 नवीन
टम्म फुगलेल्या पुर्‍या बघून जीव गार्डन गार्डन झाला.
  • Log in or register to post comments
र
रुपी Mon, 06/05/2017 - 19:45 नवीन
प्रतिसाद देणार्‍या सर्वांना मनापासून धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 06/05/2017 - 20:08 नवीन
टोमाटो अगदी दृष्ट काढण्याऐवढे गोंडस दिसतायेत. पुऱ्या आयत्या मिळाल्या तर खायला मजा येईल ;)
  • Log in or register to post comments
ज
जुइ Tue, 06/06/2017 - 07:22 नवीन
स्वत:च्या बागेतील टॅमॅटोची पुरी करण्याची मौज काही औरच!! शिवाय टोमॅटोचा वेल व्हवा यासाठी लागणारे चांगले हवामान पाहुन अंमळ जळजळ झाली :-)
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Tue, 06/06/2017 - 08:10 नवीन
झकास!मस्त टोमॅटो! मस्त प्युरे! मस्त पुऱ्या!T
  • Log in or register to post comments
उ
उल्का Wed, 06/07/2017 - 03:18 नवीन
अतिशय सोप्या पद्धतीने छान सांगितलं आहेस. टोमॅटो तर फोटोतून काढून तसेच कापून खावे असं वाटलं. मस्तच!
  • Log in or register to post comments
स
स्मिता चौगुले Mon, 06/12/2017 - 13:09 नवीन
मस्तच.. :)
  • Log in or register to post comments
र
रुपी Mon, 06/12/2017 - 20:15 नवीन
नव्याने प्रतिसाद देणार्‍या सर्वांना धन्यवाद! जुइ, इडो, पिरा, रातराणी आणि इतरही ज्यांना टोमॅटो, पुर्‍या खाव्याश्या वाटत आहे, केव्हाही या :)
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 06/13/2017 - 07:46 नवीन
वाह, भारीये प्युरीची पुरी ! मी अशीच पालक पुरी करते. पालकाची प्युरी करून.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 06/13/2017 - 16:27 नवीन
एकदम झक्कास!! :)
  • Log in or register to post comments
द
दीपा माने गुरुवार, 07/13/2017 - 23:18 नवीन
छान आहे ही पाकृ. प्रवासासाठी अगदी योग्य.
  • Log in or register to post comments
प
पियुशा Sun, 07/16/2017 - 08:59 नवीन
अग कसल्या भारी दिसताहेत !
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 07/16/2017 - 09:06 नवीन
मस्त आहेत ह्या पुर्‍या, ही माझी टोमॅटो पुरी स्वाती
  • Log in or register to post comments
र
रुपी Sun, 07/16/2017 - 22:40 नवीन
नव्याने प्रतिसाद दिलेल्या सर्वांना धन्यवाद! @स्वातीताई - पुर्‍या आणि चटणी सुंदर दिसत आहे. खूप दिवसांनी मिपावर पाहून छान वाटले :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 52 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 4 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 8 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 11 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा