Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

डावचीच्चाक.. अर्थात कच्चा चिवडा..

स
सानझरी
Fri, 06/02/2017 - 17:27
तर मंडळी .. हा पदार्थ संध्याकाळी 'काहीतरी खावंसं वाटतंय पण काय ते कळत नै' अशा वेळेला करायचा. आमच्या घरी 5-6 च्या दरम्यान नुसती आई म्हणून हाक मारली तरी मातोश्री विचारतात.. 'हं, मग काय करून देऊ?' 'ते नै माहीत. पण दे काहीतरी करून.' इति आम्ही.. आणि मग कच्च्या चिवड्याचा बेत ठरतो.. सर्वप्रथम पातळ पोहे आणि मुरमुरे एकत्र करून घ्यावे. त्यात बाजूने कांदा आणि कोथिंबीर टाकायची. मग त्यात मधोमध लाल तिखट टाकायचं. त्यानंतर गरम तेलात जिरं टाकून ते तेल तिखटावर सोडायचं. असं केल्याने तिखट जळतं/शिजतं आणि पोटास बाधत नाही. मग त्यात आणखी थोडी कोथिंबीर आणि मीठ, पिठीसाखर टाकून सगळं एकत्र करायचं.. सगळं नीट एकत्र केलं की त्यात लिंबू पिळायचं. वरून थोडे शेव टाकून सर्व्ह करायचं. अवांतर टिपा.. 1. यात कच्चंच तेल टाकलं तरी मस्त लागतं. 2. साध्या शेवेऐवजी आलू भुजीया टाकला तर हा चिवडा भारी लागतो. 3. यात वरून टोमॅटो किंवा उकडलेला बटाटा (मिरपूड टाकून) झकास लागतो.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 25409 views

💬 प्रतिसाद
ज
जुइ Tue, 06/13/2017 - 23:02 नवीन
नक्कीच करून बघेन.
  • Log in or register to post comments
स
सानझरी Wed, 06/14/2017 - 14:39 नवीन
धन्सं जागु नि जुइ.. :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 57 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 9 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 13 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 17 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा