Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

मँगो पुडींग

अ
अनन्न्या
Fri, 05/19/2017 - 09:15
aamba साध्या सरळ शांत स्वभावाच्या नवय्राने एकोणिस वर्ष मला सहन केलं, मी करत असलेल्या प्रायोगिक रेसिपी नावं ठेवता खाल्ल्या म्हणून आज त्याच्यासाठी ही स्पेशल डीश! आंब्याचा सीझन आहे हे काही विसरून चालणार नाही!! साहित्यः केकसाठी: मैदा १५० ग्रॅम, तूप १०० ग्रॅम्, मिल्कमेड२०० ग्रॅम, १ चमचा बेकींग पावडर, अर्धा चमचा खायचा सोडा, ५/६ चमचे साखर , दूध अर्धा कप, तूप, व्हॅनिला इसेन्स अर्धा चमचा. (केक बाहेरून आणता येईल.) पुडींगसाठी: अर्धा कि. प्लेन केक, चार हापूस आंबे,दोन रायवळ किंवा रसाचे आंबे, चार चमचे आंबा ज्यूस, अर्धा लि. दूध, दोन चमचे कस्टर्ड पावडर , साखर,आमरस पाव लि., चेरी सजावटीसाठी. aamba कृती: केक: मैदा, बेकींग पावडर, खायचा सोडा, चाळणीने तीन वेळा चाळून घ्यावे. यामुळे सोडा, बेकींग पावडर नीट मिक्स होईल. ओव्हन १८० डिग्रीवर प्रीहीट करावा. केकच्या भांड्याला तूप लावावे. तयार मिल्कमेड आणि तूप परातीत घेऊन फेसावे. फेसताना अर्धा कप दूध मिश्रणात घालावे.व्हॅनिला इसेन्स घालावा. आता चाळलेला मैदा मिश्रणात मिसळावा. मिश्रण एकजीव करावे. ५/६ चमचे साखर मिसळावी. केकच्या भांड्यात मिश्रण घालून ओव्हनला २०० डीग्रीवर ३० मिनिटे ठेवावे. सुरीचे टोक घालून केक तयार झाला का ते पहावे. झाला असेल तर जाळीवर काढून गार करावा. स्लाईस करून घ्याव्या. aamba पुडींगः १)आंब्याच्या दोन्ही बाजूचे काप काढून चौकोनी फोडी करून घ्याव्या. फोडींमध्ये चार चमचे साखर घालावी. कढईत घेऊन पाच मिनिटे गॅसवर ठेवावे. साखर विरघळली की उतरून गार करावे. २) अर्धा लि. दुधातील अर्धी वाटी बाजूला ठेवून बाकीचे गरम करावे. चार चमचे साखर घालावी. अर्धी वाटी गार दुधात दोन चमचे कस्टर्ड पावडर मिसळून घ्यावी. गरम करायला ठेवलेल्या दुधात पावडरचे दूध मिसळावे. सतत ढवळत रहावे. मिश्रण दाट झाले की गार कारावे. लागल्यास साखर वाढवावी. ३) आंब्याच्या कोयींचा रस काढून त्यात चार चमचे साखर घालून मिक्सरला फिरवावा. ४) रायवळ आंब्याचा रस काढून त्यात दोन चमचे साखर, पाव वाटी पाणी घालून ज्यूस करावा. तयार ज्यूस वापरू शकता. ५) काचेचा गोल बाऊल घ्या. तळाला केकचा थर द्या. त्यावर दोन तीन चमचे ज्यूस शिंपडा. त्यावर आंब्याच्या फोडी पसरा. तयार कस्टर्ड मध्ये ३ नं स्टेपला काढलेला रस मिसळून घ्या. आता हे कस्टर्ड आंब्याच्या फोडींवर पसरा. फ्रीजरला गारेगार करा, आणि खा. aamba

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7194 views

💬 प्रतिसाद
स
सविता००१ Fri, 05/19/2017 - 09:44 नवीन
अनन्या, मस्त ग. आणि हो, लग्नाच्या वाढ्दिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Fri, 05/19/2017 - 10:00 नवीन
बघ करून!!
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 05/19/2017 - 11:10 नवीन
वॉव मस्त आहे रेसिपी. तोपासु. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
म
मंजूताई Fri, 05/19/2017 - 13:14 नवीन
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! अनन्या!
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 05/19/2017 - 13:16 नवीन
फोटू आवडले, रेसिपीही. लग्नाच्या वाढदिवसाबद्दल अभिनंदन, शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
म
मनिमौ Fri, 05/19/2017 - 13:17 नवीन
शुभेच्छा. तुझ्या हातच खायला खरच एक रत्नागिरी कट्टा झालाच पाहिजे
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Sat, 05/20/2017 - 11:59 नवीन
केव्हा येताय?
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Fri, 05/19/2017 - 17:44 नवीन
करा, खा आणि खिलवा!!
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Sat, 05/20/2017 - 19:26 नवीन
मस्त मस्त
  • Log in or register to post comments
प
पियुशा Fri, 07/14/2017 - 09:56 नवीन
वॉव कसली क्यूट दिसतेय डिश ,ते यम्मी :)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 07/16/2017 - 08:56 नवीन
पुडिंग मस्त दिसतय.. स्वाती
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 27 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 39 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 43 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा