Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

सोप्पा रवा मँगो केक

अ
अनन्न्या
Wed, 05/17/2017 - 07:29
आता तुम्ही म्हणाल किती सारखं आंबा आंबा, पण काय करू आंब्याचं पीक यावर्षी एवढं आलय की जे करायचं त्यात आंबा हवाच! सकाळी मिल्कशेक, दुपारी पायरीचा रस पोळी, जोडीला रायतं घ्या, लोणचं घ्या जे आवडेल ते, अधे मधे खायला आंबा नुसता कापून आणि रात्री आंबा शिकरण!! मग काय आज केक केला. साहित्यः एक वाटी हापूस आंब्याचा रस, पाऊण वाटी साखर, पाऊण वाटी दही, मीठ, अर्धा चामचा खाण्याचा सोडा, एक वाटी रवा, दोन चमचे साजूक तूप. कृती: आंब्याचा रस काढून घ्या. तो मिक्सरला फिरवू नका. मधेच एखादा तुकडा छान वाटतो. दही, साखर, तूप आणि आमरस एकत्र करून फेटून घ्या. त्यात रवा मिसळा , आणि दोन तास तसेच ठेवा. दोन तासांनी फ्रायपॅनला तूप लावा. तयार मिश्रणात अर्धा चमचा सोडा, चवीपुरते मीठ घालून नीट ढवळून घ्या. फ्रायपॅनमध्ये मिश्रण ओता. आणि सारखे करून २० मिनिटे मंद गॅसवर झाकणासहित ठेवा. वीस मिनिटांनी सुरीचे टोक घालून बघा, मिश्रण चिकटत नसेल तर केक झाला. गॅस बन्द करा. केक थोडा गार झाला की उलटा टाका ताटात! आवडीप्रमाणे कापा, मनसोक्त खा. आंब्याचा स्वाद काय भारी येतो, आणि रंग तुम्हीच सांगा!! aamba

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 15047 views

💬 प्रतिसाद
न
नूतन सावंत Wed, 05/17/2017 - 07:52 नवीन
मस्त,मस्त.रच्याकने,ते जास्त झालेले आंब्याचे पीक इकडे का पाठवून देत नाही?
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Wed, 05/17/2017 - 08:13 नवीन
बाजार फुललाय केशरी रंगाने!
  • Log in or register to post comments
म
मंजूताई Wed, 05/17/2017 - 07:53 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 05/17/2017 - 08:53 नवीन
Image removed. Image removed. .. Image removed. .. Image removed.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Wed, 05/17/2017 - 09:51 नवीन
आईग्ग... कसला भारी कलर आहे. .. सुरेख. ते आम्ब्याच फूल तर भन्नाट
  • Log in or register to post comments
व
विशाखा राऊत Wed, 05/17/2017 - 13:31 नवीन
मी काहीही लिहिणार नाहिये आता.. कसला भारी रंग. एक नंबर
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 05/17/2017 - 13:44 नवीन
एकच नंबर.
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 05/17/2017 - 13:52 नवीन
अतिमस्त.. अनेक दुर्दैवी गृहिणींचा हा केक बिघडतो आणि चक्क शिरा बनतो. आंबा फ्लेवर शिरा. आणि शेजारच्या पोरासोरांना खावा लागतो. -(कोंकणात बालपण गेलेला पोरसोर) गवि
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Wed, 05/17/2017 - 16:23 नवीन
पण शिराही छान लागतो आंब्याचा!
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 05/17/2017 - 18:55 नवीन
हो, मागच्या वीकांती हापिसातल्या लोकांना खाऊ घातला. लोकांना आंब्याचं असंही काही होऊ शकतं हे माहीतच नव्हतं.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Wed, 05/17/2017 - 16:29 नवीन
अनेक दुर्दैवी गृहिणींचा हा केक बिघडतो आणि चक्क शिरा बनतो. आंबा फ्लेवर शिरा. आणि शेजारच्या पोरासोरांना खावा लागतो.
-(कोंकणात बालपण गेलेला पोरसोर) गवि
गुड प्रॉब्लेम टू हॅव :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 05/17/2017 - 14:14 नवीन
जबरी
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Wed, 05/17/2017 - 14:27 नवीन
जबराट रंग दिसतोय केकचा.
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Wed, 05/17/2017 - 17:58 नवीन
सुरेख !! वाह, मजा आली.
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 05/17/2017 - 18:01 नवीन
सांदणाचा भाऊ आहे.
  • Log in or register to post comments
र
रुपी Wed, 05/17/2017 - 18:45 नवीन
काय सुंदर रंग आलाय. ते आंब्याचं फूलही फार सुरेख जमलंय!
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 05/17/2017 - 23:25 नवीन
काय रंग! वा!
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 05/18/2017 - 03:13 नवीन
सुरेख दिसतोय केक.
  • Log in or register to post comments
स
सूड Sat, 05/20/2017 - 15:38 नवीन
हा आज मी करुन पाह्यला. फक्त सोड्याऐवजी फ्रूट सॉल्ट घातलं. मस्त जाळीदार आणि हलका झाला. Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Sat, 05/20/2017 - 17:05 नवीन
का बरं?
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 05/22/2017 - 08:39 नवीन
मला दिसतोय. इमेज पण शेअर्ड इमेजेस मध्ये आहे.
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 05/22/2017 - 11:52 नवीन
माझाही गणेशा झालाय. सेटिंग्ज कृपया पुन्हा चेकवणे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 05/20/2017 - 16:20 नवीन
भारी झाला आहे केक. सूडचाही मस्त. केळ्याचाही मस्त होतो.
  • Log in or register to post comments
ह
हर्मायनी Tue, 05/23/2017 - 05:42 नवीन
मीही करून बघितला . छान झाला होता . लग्नानंतर घरात केलेली पहिली वेगळी रेसिपी .. धन्यवाद !
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 05/28/2017 - 15:16 नवीन
आमच्याकडेही झाला आज आंबा रवा केक Image removed.
  • Log in or register to post comments
र
रुपी Mon, 05/29/2017 - 00:52 नवीन
वा! मस्तच हो कंजूस काका.
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 05/29/2017 - 08:15 नवीन
भारीच!!
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 05/29/2017 - 09:02 नवीन
अगदी आकर्षक रंग... मस्त..
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Sat, 06/03/2017 - 10:28 नवीन
रंग पण झकास
  • Log in or register to post comments
ज
जागु Mon, 05/29/2017 - 09:27 नवीन
मस्त. पुढच्या आठवड्यात करतेच.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 24 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 36 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 40 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा