Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

युरोपच्या डोंगरवाटा २: प्लीट्विच्का जेझेरा (Plitvice Lakes) उर्वरित भाग

न
निशाचर
Wed, 05/03/2017 - 00:04
💬 15
युरोपच्या डोंगरवाटा १: प्लीट्विच्का जेझेरा (Plitvice Lakes) भाग १ अप्पर लेक्सचा निरोप घ्यावासा वाटत नव्हता, पण जाणं भाग होतं. Lower Lakes were calling... बोटीच्या धक्क्याशी आलो तर पुढची बोट निघणारच होती. पार्कमध्ये प्रवेश करून साडेतीन तास होत आले होते. एकदाच पाच मिनिटं बसून विश्रांती घेतली होती आणि झाग्रेबच्या बाजारात घेतलेले सुके अंजीर खाल्ले होते. आता पाय थकले होते आणि भूकही लागली होती. पोटपूजेची सोय 'उस पार'च होणार होती. तोपर्यंत निवांत बसलो.

.

.

'उस पार' कॅफेत खाण्यासाठी बर्गर, फ्राईज किंवा थंड सँड्विच एवढंच होतं. सँड्विच गरम करून देणार नाही, हे ही सांगण्यात आलं. क्रोएशियात एवढी गैरसोय कुठे झाली नव्हती. स्थानमाहात्म्य, दुसरे काय? सँड्विच खाऊन पुन्हा कॉफी नामे गरम पाणी प्यायल्यावर तरतरी आली. थोडा वेळ आराम केला. लोअर लेक्ससाठी पुरेसा वेळ हातात नव्हता. H रूट हा बोटीच्या धक्क्यानंतर थोड्याच अंतरानंतर canyon च्या सुरुवातीला पाणी ओलांडून बराचसा canyon च्या वरून पूर्व बाजूने जातो, मग Veliki slap (“Great Waterfall”) च्या आधी पुन्हा पाणी ओलांडून धबधब्याशी जाऊन शेवटी परत पूर्व बाजूने St1 बस थांब्याशी येतो. आम्हाला शॉर्टकट शोधणं भाग होतं. तिथल्या एका रेंजरला विचारलं. त्याने नेहमीच्या पायवाटेऐवजी दोन्ही बाजूंना पायर्‍या कुठे आहेत ते सांगितलं. तसं गेलो तर अंतर खूप कमी होणार होतं. एक ते दीड तासात तर बहुतेक सगळं पाहता येणार होतं. परत येताना एका गुहेतून पायर्‍या आहेत असं आधीही एका ठिकाणी वाचलं होतं. पण खडा चढ, आणि पावसात चिखलही असणार. या पायर्‍या नकाशातही नाहीत. रेंजरने व्यवस्थित माहिती दिली. मग त्याने सांगितल्याप्रमाणेच निघालो. आम्हाला canyon क्रॉस न करता वरून पश्चिम बाजूनेच जायचं होतं. शेवटी पायर्‍या उतरून Veliki slap पाहून मग पाण्यापर्यंत उतरून दरीतून काठाने थोडं चालल्यावर पाणी ओलांडून गेल्यावर लगेच गुहेतून डोंगर चढायचा होता. पार्कच्या या भागाचं वैशिष्ट्य म्हणजे वरून दिसणारा एकात एक मिसळणार्‍या तलावांचा नजारा. सुरूवातीलाच एका view point ला उजवीकडे बघितल्यावर प्लीट्विच्काचा सगळ्यांत प्रसिद्ध देखावा दिसला.

.

डावीकडे canyon आणि छोटीमोठी तळी होती. पुढे जावं तसं समोरचं दृश्यही बदलत होतं.

.

.

.

.

वरच्या फोटोत दिसणार्‍या गुहेतून आम्हाला नंतर जायचं होतं! त्यामुळे खालच्या फोटोतील नागमोडी रस्त्याचं अंतर आणि नंतर गुहेच्या वरच्या भागापर्यंत येण्यासाठीचा वळसा वाचणार होता.

.

पायर्‍या उतरताना धबधबा दिसत तर नव्हता, पण आवाज येत होता. चिखल नसला तरी पालापाचोळा खूप होता. बाकीच्या वाटांसारखी इथे देखभाल करत नसावेत.

.

एकदाचे धबधब्याचे दर्शन झाले. आतापर्यंत बघितलेल्या पाण्यापुढे हा धबधबा नावालाच “Great Waterfall” वाटला.

.

.

.

आता पुन्हा पाण्याच्या जवळून भटकंती सुरू झाली.

.

.

.

.

.

.

.

.

गुहेच्या तोंडाशी हा बोर्ड होता. गुहेच्या आतल्या भागात वटवाघुळं असतात, तसेच छोटे लवणस्तंभही आहेत. पण त्यासाठी दिवसाउजेडी यावं लागतं. गुहेत शिरल्यावर परत मागे वळून पाणी आणि झरे डोळे भरून पाहिले. पायर्‍या चढायला लागल्यावर The Lord of the Rings आणि गोल्लमची आठवण येणं साहजिक होतं!

.

गुहेतून बाहेर येऊन पुन्हा पायर्‍या आणि पायवाटेने चढून St1 बस स्टॉपशी आलो. वाटेत दुसर्‍या बाजूने लोअर लेक्स दिसले आणि थकवा पळून गेला.

.

.

पार्कच्या या भागासाठी सव्वा तास लागला होता. बसची थोडा वेळ वाट पाहावी लागली. एकदाचे बसने St2 ला आलो. तिथून परत प्रवेशद्वारापर्यंत जाताना मात्र पाय बंड पुकारत होते. दोन्ही भागातील भटकंती मिळून अकरा किमी चालणं झालं होतं. विश्रांतीचा वेळ सोडून बसबोट प्रवासासकट पाच तास लागले होते. तरीही लोअर लेक्स घाईत बघितल्यासारखं वाटत होतं. पण पुन्हा कधीतरी नक्की जायचंय प्लीट्विच्का जेझेराला... फक्त हिरवाई असताना कि बर्फ असताना ते ठरत नाहीये...

.


वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9235 views

💬 प्रतिसाद
स
स्रुजा Wed, 05/03/2017 - 01:35 नवीन
___/\___ पारणं फिटलं डोळ्यांचं
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 05/03/2017 - 06:22 नवीन
सुरेख, सुरेख! ते पाणी पाहून मला हिमालयामधील नद्यांची आठवण झाली अगदी :)
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 05/03/2017 - 08:25 नवीन
वा! सुंदर!
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 05/03/2017 - 08:56 नवीन
मी इथे का नाहीये अत्ता या क्षणी???? शॅ!
  • Log in or register to post comments
द
दशानन Wed, 05/03/2017 - 09:06 नवीन
वाह!! सुरेख फोटो!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 05/03/2017 - 10:16 नवीन
अप्रतिम निसर्गसौंदर्याचे अप्रतिम फोटो !
  • Log in or register to post comments
अ
अभिजित वर्तक Wed, 05/03/2017 - 11:26 नवीन
अप्रतिम सौंदर्य --- पारणं फिटलं डोळ्यांचं
  • Log in or register to post comments
अ
अभिजित वर्तक Wed, 05/03/2017 - 11:27 नवीन
अप्रतिम सौंदर्य --- पारणं फिटलं डोळ्यांचं
  • Log in or register to post comments
भ
भ ट क्या खे ड वा ला Wed, 05/03/2017 - 20:18 नवीन
फोटो , वर्णन दोन्ही ... भन्नाट...
  • Log in or register to post comments
भ
भ ट क्या खे ड वा ला Wed, 05/03/2017 - 20:19 नवीन
फोटो , वर्णन दोन्ही ... भन्नाट...
  • Log in or register to post comments
भ
भ ट क्या खे ड वा ला Wed, 05/03/2017 - 20:19 नवीन
फोटो , वर्णन दोन्ही ... भन्नाट...
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Wed, 05/03/2017 - 23:27 नवीन
पुन्हा कधीतरी नक्की जायचंय प्लीट्विच्का जेझेराला... फक्त हिरवाई असताना कि बर्फ असताना ते ठरत नाहीये... हिरवाई असतांना जास्त मजा येईल.
  • Log in or register to post comments
न
निशाचर Sat, 05/06/2017 - 00:11 नवीन
प्रतिसादांसाठी सगळ्यांचे आभार!
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 05/06/2017 - 18:46 नवीन
फोटो काय अप्रतिम आहेत. सुंदर.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sun, 05/07/2017 - 16:51 नवीन
अप्रतिम!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 45 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    20 hours 1 minute ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 4 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा