Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

आमची फटाफट झणझणीत मिसळ

स
सविता००१
Mon, 05/01/2017 - 10:01
कृती: आधी नेहमीसारखी तेल, मोहरी,जिरे, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करून त्यात वाफवलेली मटकी घातली. गोडा मसाला, तिखट, मीठ, किंचित आमचूर पावडर आणि साखर घालून ससरसरीत उसळ करून घेतली. आता कट करायचं ठरवलं :) कट्/तर्री: जरा जास्त तेलाची फोडणी करून त्यात कढीपत्त्याबरोबरच थोडी पुदिना पाने चिरून घातली. आलं-लसूण पेस्ट १ चमचा, ४ छान लालभडक पण ओल्या मिरच्या आणि २ छोट्या कांद्यांची पेस्ट त्यात घालून परतले. १ मोठ्या टोमॅटो ची प्युरी त्यात घालून तेल सुटेतो परतलं. त्यात धने जिरे पावडर, गरम मसाला, तिखट (सोसेल एवढं). मी १ टी-स्पून घातलं होतं. मी मिसळ नुसतीच तिखटजाळ करण्यापेक्षा ती सणसणीत होईल पण घशात येणार नाही अशी करते. हे परतल्यावर त्यात चिमूट्भर साखर घालून पाणी घातलं. चवीनुसार मीठ आणि यातही थोडी आमचूर पावडर घातली. तर्रीला किंचित घट्टपणा येण्यासाठी २ चमचे फरसाणच मिक्सरला फिरवून लावलं ;) हवी तेवढीच दाट होते याने तर्री. मग नेहमीप्रमाणे बाउल मध्ये आधी उसळ, मग तर्री, मग फरसाण घालून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घालून सजवली. एक लिंबाची फोड आणि गव्हाचा पाव याबरोबर फन्ना पाडण्यास दिली घरच्यांना.  झाली सुद्धा मिसळ. हाकानाका :) . .

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 24217 views

💬 प्रतिसाद
प
पद्मावति Mon, 05/01/2017 - 10:13 नवीन
क्लास्स!!
  • Log in or register to post comments
म
मितान Mon, 05/01/2017 - 10:53 नवीन
फरसाण पीठ करून लावण्याची आयडिया आवडली आहे ! नक्की करण्यात यील ! फोटू पाहणारच नाही ;)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 05/01/2017 - 14:19 नवीन
स वि ता ता ई जब्बरदस्त आयडीया फरसाणाची. नेक्स्टटैम जेंव्हा मिसळ करशिल तेंव्हा आठवणीने काचेच्या भांड्यात न ठेवता दुसर्‍या (पोर्सलीन, स्टील वगैरे) मध्ये ठेवून हाय रेझोलुशन फोटो काढशील? आपल्या मिपावर मिपाकरानेच बनवलेली मिसळीचा फोटो असावा अशी फार इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Mon, 05/01/2017 - 16:34 नवीन
सौताताई च म्हण. अरे मला हे माहित नव्हत. छान स्टील च्या भांड्यात असलेली मिसळ मी काचेच्या बाऊल मधे काढ्ली• अाता नक्की
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 05/01/2017 - 14:38 नवीन
एक महिन्या पासून झारखंड मध्ये आहे कामानिम्मित. पडवळ खाऊन वैतागलो आहे. तुमची पाककृती पाहून तोंडाला पाणी सुटले. कधी परत घरी जातोय असे झाले आहे. फरसाण ची आयड्या आवडली...
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 05/01/2017 - 16:13 नवीन
हम्म्म्म..! इसमे नया तो है कुछ! निच्चीत करूण पाहनेत यील!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 05/01/2017 - 17:17 नवीन
अश्या बघताक्षणी भूक खवळणार्‍या पाकृवर बंदी घाला रे ! ;) =))
  • Log in or register to post comments
प
पिंगू Mon, 05/01/2017 - 17:56 नवीन
जबरीच आहे. फरसाण वापरायची आयडिया आवडेश..
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 05/01/2017 - 18:34 नवीन
भारीये! झटपट मिसळ असल्याने बटाट्याच्या भाजीला फाटा दिलाय की तुमच्याकडे ती मिसळीत घालतच नाहीत? ते काही असो, फोटू छान आलाय.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Tue, 05/02/2017 - 03:11 नवीन
हो ग रेवती ताई. बटाटा नाही घातला यावेळी. नेहमी घालते. पोहे वगैरेही नाही केले
  • Log in or register to post comments
र
रुपी Mon, 05/01/2017 - 22:34 नवीन
वा.. मस्त फोटो.. छोट्या बाउलमध्ये काय आहे?
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Tue, 05/02/2017 - 03:05 नवीन
छोट्या बाऊल मध्ये कट आहे. मिसळीवर वरून घ्यायला.
  • Log in or register to post comments
व
विशाखा राऊत Mon, 05/01/2017 - 22:46 नवीन
मस्त मिसळ
  • Log in or register to post comments
क
केडी Tue, 05/02/2017 - 02:35 नवीन
एक नंबर!
  • Log in or register to post comments
र
रातराणी Tue, 05/02/2017 - 03:27 नवीन
म्म्मम्म्मम्म्मम्ममस्त!!!
  • Log in or register to post comments
म
मनिमौ Tue, 05/02/2017 - 03:54 नवीन
भारी दिसतीये की मिसळ
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 05/02/2017 - 05:46 नवीन
मस्त दिसतेय! खाऊन मग सांगेन कशी झाली ती! =))
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 05/02/2017 - 06:05 नवीन
हे एक भारीये की फरसाणची आयडीया. फोटो झक्कास आहेत.
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 05/02/2017 - 10:28 नवीन
झक्कास!!!!!
  • Log in or register to post comments
स
सपे-पुणे-३० Tue, 05/02/2017 - 11:38 नवीन
झक्कास मिसळ आणि फोटो. फरसाणाची आयडिया नवीन समजली.
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 05/02/2017 - 12:33 नवीन
फोटो दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Tue, 05/02/2017 - 12:56 नवीन
का रे? तुला एकट्यालाच दिसत नाहियेत बहुतेक.
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 05/02/2017 - 16:43 नवीन
बास! खूप झालं! आता स्वयंपाकगृहावर स्वारी याच पाककृतीने केली जाईल. धन्यू. (ता. क. - टीव्र निषेढ. जीभ खवळली आहे. कधी एकदा करतो आणि खातो असं झालं आहे!)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 05/03/2017 - 01:53 नवीन
साखर?
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Wed, 05/03/2017 - 02:53 नवीन
हो. चिमूट्भर साखर फोड्णीत घातली आणि तिखट घालून लगेच पाणी घातल की छान लाल भडक तर्री येते. थोड्या तेलात•
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Wed, 05/03/2017 - 08:07 नवीन
वा ! झकास मिस्सळ.. फरसाण आणि साखरेची आयडिया आवडली..
  • Log in or register to post comments
र
रुस्तम Wed, 05/03/2017 - 08:34 नवीन
हो. चिमूट्भर साखर फोड्णीत घातली आणि तिखट घालून लगेच पाणी घातल की छान लाल भडक तर्री येते. थोड्या तेलात•
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 05/03/2017 - 06:17 नवीन
मस्त !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- "Largo al factotum" [ The Barber of Seville ] Andre Rieu
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Wed, 05/03/2017 - 18:45 नवीन
मस्त मस्त,आता पुण्याला आले की एक फराळ तुझ्याकडे.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Wed, 05/03/2017 - 19:38 नवीन
पुण्याला आले की नाही ग, माझ्याकडे म्हणून ये.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल कार्टं गुरुवार, 05/04/2017 - 08:27 नवीन
पूर्ण रेसिपीही वाचू शकलो नाही, मसाले वाचता वाचता तोंपासु. नंतर वाचीन.
  • Log in or register to post comments
प
पियुशा गुरुवार, 05/04/2017 - 10:58 नवीन
हे देवा वाचव सव्या पासुन मिपाला ;) झक्कास हो !
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 05/04/2017 - 11:38 नवीन
तर्रीला किंचित घट्टपणा येण्यासाठी २ चमचे फरसाणच मिक्सरला फिरवून लावलं
करुन पाहिल्याशिवाय मत देववत नाही पण घट्टपणासाठी फरसाण .... मनात कल्पना करुन उगीच खटकतंय. नुसती पापडी किंवा गाठी वापरुन कदाचित जास्त बरं वाटेल. ओव्हरऑल, अ गुड रेसिपी. ता.क. कोंकणातल्या फरसाणाची सर मुंबईपुण्याच्या आणि देशावरच्या फरसाणांना नाही. खासकरुन मिसळीला योग्य फरसानाबाबत. कोंकणवासीयांकडून / कोंकणप्रेमीयांकडून अनुमोदने स्वीकारली जातील. कोंकणातल्या छोट्यामोठ्या बसस्टँडांवर आणि खाडीच्या फेरीसाठी वाट पाहताना तिथे असलेल्या टपरीत मिसळ खाल्लीय का कोणी? तर मी म्हणतो ते लगेच पटेल.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ गुरुवार, 05/04/2017 - 12:48 नवीन
फरसाण फिरवून लावलं म्हणाले त्यात पापडी आणि गाठीच होती हो.अगदी डाळमूठ वगैरे नाही. इथे पुण्यात सुद्धा एक साधं फरसाण मिळतं आणि एक मिसळीकरता. साधं फरसाण म्हणजे अगदीच बोअर असतं. (वैयक्तिक मत) त्यात फक्त सपक पापडी, तेवढीच सपक जाड शेव असते. मिसळीच्या फरसाणात मस्त सगळी भरताड असते. आणि खमंग. तेच वापरलं आहे मी. (मिसळीत. मिक्सरला लावताना नाही). तुम्ही पहा एकदा करून. कोंकणातल्या फरसाणाबद्दल काही म्हणके काही माहीती नाही मला. तुम्हीच द्या ती इथे.
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 05/05/2017 - 14:32 नवीन
तुम्ही यात सगळ्या पदार्थांचे प्रमाण न दिल्याने थोडा पिरॅब्लेम झालाय माझा. आता माझ्या हिशेबाने बनवण्याचा प्रयत्न करतो. आय ब्लेम यू, सविताताई! :-P
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Fri, 05/05/2017 - 15:55 नवीन
अर्र..एकडाव माफी. मी फक्त उसळीच प्रमाण नाही दिल मी. मी एक पावशेर मटकी कुकर मध्ये वाफवून घेतली. आणी फोडणी मध्ये ती घालून मग एक छोता चमचा तिखट, अर्धा चमचा गोडा मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घातल होत. आणि उसळ सरसरीत होइल एवढ पाणी.
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Tue, 05/09/2017 - 18:52 नवीन
झकास सवे! मस्त दिसतेय मिसळ!
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ गुरुवार, 07/20/2017 - 11:02 नवीन
मस्त !!!
  • Log in or register to post comments
ग
गणामास्तर गुरुवार, 07/20/2017 - 11:22 नवीन
ठीकठाक रेसिपी आणि फोटो. मिसळ हा पदार्थ असा आहे की त्याचा फोटो पाहूनचं तोंडाला पाणी सुटले पाहिजे, तसे काही झाले नाही. मिसळमध्ये रस्सा आणि तर्री (वाटीतली सेपरेट तर्री मला तर्रीसारखी दिसत नाहीये) दिसतंच नाहीये आणि वरून पेरलेला टोमॅटो खटकला.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 18 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 19 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 22 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 25 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा