Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

आंब्याची शिकरण (दूध आंबा):

अ
अनन्न्या
Mon, 05/01/2017 - 08:14
साहित्य: 5 हापूस आंबे, (हापुसच), दूध अर्धा ली. , साखर दोन चमचे, अगदी थोडे मीठ. aamba कृती: आंबे स्वच्छ धुवावेत. दोन बाजू कापून घ्याव्यात, त्यावर उभ्या आडव्या फोडी होतील अशा सुरीने रेषा माराव्यात. चमच्याने भांड्यात काढून घ्याव्यात. दोन्ही कडा पण कापून त्याच्या फोडी करून घ्याव्यात . कोयीचा रस काढून घ्यावा. दूध न तापवता गार करून घ्यावे. फोडी आणि रस एकत्र करावा. त्यात दूध आणि साखर आणि अगदी चवीला मीठ घालावे. नीट मिक्स करावे. आणि गारेगार खावे. मिठाने दूध नासत नाही, पण जर नको असेल तर नका घालू. चवीला मीठ घातले तर छान लागते. एक नवीन सोपी स्वीट डिश, अजून शाही करायचे तर देताना आईसक्रीम चा गोळा ठेवा. चविनुसार साखर वाढवण्यास हरकत नाही. aamba

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 12609 views

💬 प्रतिसाद
य
यशोधरा Mon, 05/01/2017 - 08:19 नवीन
फोटो दिसत नाहीये, हे नशीबच म्हणायचे! छान रेश्पी.
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Mon, 05/01/2017 - 08:37 नवीन
नेहमीप्रमाणेच टाकलाय फोटो
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 05/01/2017 - 08:39 नवीन
अगो, तू टाकलायस गो, पण मला हापिसात दिसत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 05/01/2017 - 08:42 नवीन
ते शिकरण असते ना? असो शाही कारभार आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 05/04/2017 - 05:38 नवीन
आमच्याकडे बायको ती शिकरण म्हणते मी ते शिकरण म्हणतो. कोब्रा ती शिकरण म्हणतात
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या गुरुवार, 05/04/2017 - 10:11 नवीन
ते ही असेल पण बोलीभाषा असतेच ना! शाही आहे हेच महत्त्वाचं!!
  • Log in or register to post comments
अ
अजया Mon, 05/01/2017 - 09:07 नवीन
आंब्याचे आणि शिकरण म्हणत धागा उघडला. फोटोने गारद केले!
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Mon, 05/01/2017 - 09:49 नवीन
आत्ताच करून खाल्ल पण. पहा माझा उत्साह....... :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 05/01/2017 - 16:15 नवीन
पातेलं पाहून कल्पनेनीच आंत उडी मारल्या गेली आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
म
मंजूताई Mon, 05/01/2017 - 17:23 नवीन
सोप्पी .... उद्या च करुन पाहण्यात येईल ...
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 05/01/2017 - 17:38 नवीन
ए बाई, असे फोटू दाखवून का त्रास देतेस? कृती चांगली नसायला काय झालय? येऊ का तुझ्या गावात रहायला? आमच्याकडे ही पाकृ पाठवून सिद्ध कर की हा पदार्थ छान लागतो. अजून इथे बाजारात पुरते पिकलेले आंबे आले नाहीयेत. मागील अठवड्यात सहा मेक्सिकन आंबे आणले. दोन बरे निघाले. उरलेल्या चारांचा मुरांबा करावा लागला. तुझी आठवण अश्यावेळी येतेच!
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Tue, 05/02/2017 - 10:57 नवीन
विचारतेस कशाला? अगं जेव्हा आंबे येतील तेव्हा कर आत्ता बघू नको
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 05/01/2017 - 17:47 नवीन
दिसले फोटो. अनन्या तू दुष्ट बाई आहेस.
  • Log in or register to post comments
र
रुपी Mon, 05/01/2017 - 22:08 नवीन
छान पाकृ! पण मला पहिलाच फोटो इतका आवडला की माझी त्यानंतर शिकरण बनवायला आंबेच राहणार नाहीत. :)
  • Log in or register to post comments
व
विशाखा राऊत Mon, 05/01/2017 - 22:43 नवीन
वाह :)
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 05/02/2017 - 05:38 नवीन
:)
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 05/02/2017 - 06:02 नवीन
मला आधी सांगा पहिल्या फोटो प्रमाणे आंबा कापण्याचा कसा!
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 05/02/2017 - 08:09 नवीन
शन्वारी आणि काल आमरस झालाय, त्यामुळे फार जळजळ झाली नाही.
  • Log in or register to post comments
म
मितान Tue, 05/02/2017 - 11:28 नवीन
आंबा कापून असा पुढे ठेवल्यावर कसला रस आणि कसले शिकरण !!!! फोटु मस्त !
  • Log in or register to post comments
म
मनिमौ गुरुवार, 05/04/2017 - 10:50 नवीन
तो आंबा ईतका सुबक चिरल्यावर शिकरण करायला दम तरी कसा धरवतो
  • Log in or register to post comments
प
पियुशा गुरुवार, 05/04/2017 - 10:54 नवीन
रेसेपि भारी ,म्ला असा अम्बा कधी जमनारे कापायला :प
  • Log in or register to post comments
प
पियुशा गुरुवार, 05/04/2017 - 10:55 नवीन
रेसेपि भारी ,म्ला असा अम्बा कधी जमनारे कापायला :प
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 05/04/2017 - 11:28 नवीन
आधी नीट टायपिंग शिक मग मग आंबेकापिंग. =)) =))
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 05/04/2017 - 18:32 नवीन
@आधी नीट टायपिंग शिक मग मग आंबेकापिंग.››› =))
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 05/04/2017 - 11:50 नवीन
त्ला ल्ह्याय्ला जम्लं की म्बा क्पाय्ला शिंक!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 12 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 16 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 20 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा