Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

अनवट किल्ले ४ : चहाडघाटाचा रक्षक काळदुर्ग (Kaldurg )

द
दुर्गविहारी
Fri, 04/21/2017 - 14:39
💬 22

Book traversal links for अनवट किल्ले ४ : चहाडघाटाचा रक्षक काळदुर्ग (Kaldurg )

  • ‹ अनवट किल्ले ३: मानवाकृती सुळक्यांचा कोहोज
  • Up
  • अनवट किल्ले ५ : असाच लोभ असावा (Asawa ) ›
आतापर्यंत पाहिलेले किल्ले बलदंड आणी सामरीकद्रुष्ट्या महत्वाचे आहेत. पण आज आपण माहिती घेत असलेला काळदुर्ग हा तुलनेने कमी महत्वाचा किल्ला म्हणावा लागेल. पालघरच्या पुर्वेला समुद्राला संमातर उत्तर दक्षिण अशी एक डोंगररांग आहे. या रांगेत तीन किल्ले आहेत, असावा, काळदुर्ग आणि तांदुळवाडी. हि डोंगररांग घनदाट वनश्रीने नटलेली आहे, ईथे किल्ला आणि त्याच्या पायथ्याशी पाझर तलाव अशी रचना आहे. या गडाची उंची ३५० मी. आहे. आज आपण जाणार्‍या काळदुर्ग हा किल्ला पालघर - मनोर- वाडा या रस्त्यावर असलेल्या चहाड घाटावर लक्ष ठेवण्यासाठी उभारलेला आहे. या भागात असलेल्या सागवानी झाडांची तोड करून जहाज बांधणीसाठी त्याची वहातुक चालायची , त्यावर देखरेख करण्यासाठी या किल्ल्याची उभारणी झाली असावी. ईतिहासात डोकावले असता, हा किल्ला माहिमच्या बिंब राजाकडे होता. याची उभारणी बहुतेक शिलाहारानी केली असावी. शिवकाळात हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात असावा. पुढे संभाजी रांज्याच्या काळात हा किल्ला मराठ्यांनी घेतला. काळदुर्ग ह्या किल्ल्याला काळमेघ, नंदिमाळ अशीही नावे आहेत. इथे यावयाचे झाले तर दोन मार्ग आहेत. १) मुबंई - अहमदाबाद धावणार्या पॅसेंजर पालघरला थांबतात किंवा विरार - डहाणु लोकलने पालघरला उतरावे. किल्ला जरी पुर्वेला असला तरी पालघर पश्चिम हुन मनोर किंवा वाडाकडे जाणार्‍या बस किंवा खाजगी जीप पकडायच्या व वाघोबा देवस्थान हा स्टॉप सांगायचा. चहाड घाटात हे मंदिर आहे. इथे मांकडाचा प्रचंड सुळसुळाट आहे. २) स्वताची गाडी असेल तर विरार हून अहमदाबादच्या दिशेने निघाल्यानंतर मस्तान नाक्यापाशी गाडी डावीकडे मनोर रस्त्याला वळवायची आणी चहाड घाटामधे वाघोबा मंदिरापाशी थांबायचे. kl1 या रस्त्याने जाताना किल्ल्याचे दर्शन होते, तेंव्हा शंकराच्या पिडिसमोर बसलेल्या नंदीसारखा आकार दिसतो, कदाचित यामुळेच याचे नाव नंदिमाळ पडले असेल. kl2 वाघोबा देवस्थान हे छोटे मंदिर आहे. जंगल्यातल्या खिंडीत अशी व्याघ्रस्थाने दिसतात, उदा. अशेरी, हरिश्चंद्रगड. kl3 मंदिराच्या मागे हा पाण्याचा हातपंप आहे. हवे असेल तर पाणी या ठिकाणी भरुन घेतलेले चांगले कारण गडावर पिण्यायोग्य पाणी नाही. ठीक याच्या जवळुन चढायला सुरवात करायची हे लक्षात ठेवायचे. डाव्या, उजव्या वाटा सोडून सरळ चढत रहायचे. शक्य झाल्यास एखादा स्थानिक वाटाड्या घ्यावा म्हणजे चुकण्याची शक्यता नाही तसेच कमी वेळात किल्लाही पाहून होतो. साधारण पाउण ते एक तासात आपण एका सपाटीवर पोहचतो. kl3 इथे किल्ला डाव्या हाताला किंवा पुर्वेला दिसत असतो, जर तासाभरात सपाटी आली नाहीतर वाट चुकली असे समजावे. kl2 पठाराजवळुन दिसणारा माथा. या पठारावरून सरळ चालात राहिल्यानतंर एक वाट सरळ जाते तर एक वाट डावीकडे चढाला लागते, या डाव्या वाटेने चढण्यास सुरवात करायची कि अर्ध्या तासात एका छोट्या सुळक्यासारख्या दगडाजवळ आपण पोहचतो, kl6 जणु हा नैसर्गिक बुरुजच. इथे थोड्यावेळ थांबुन आजुबाजुचा नजारा बघायचा. घाटातून अंखड गाड्यांची वर्द्ळ चालू असते. इथून पंधरा वीस मिनीटात आपण गडमाथ्यावर पोहचतो. kl7 नैसर्गिक बुरुजापासून एखद्या सुळक्यासारखा दिसणारा कातळमाथा. kl8 माथ्याजवळ आलो कि आधी हे कड्यालगत कोरलेले पाण्याचे टाके दिसते. माथा म्हणजे चौकोनी कातळ आहे. याचे पायर्‍यासारखे दोन भाग पडतात. आपला प्रवेश आधी खालच्या माची वर होतो. kl9 इथे एक मोठ टाक कोरलेल आहे तसेच काही खळगे आहेत. या खळग्याजवळुन एक वाट उतरते, kl11 या वाटेने उतरल्यास एका भग्न शिवमंदिराजवळ आपण येतो. हे आहे मेघोबाचे मंदिर. इथे शिव पिंड, नंदी व इतर काही मुर्त्या दिसतात. उत्तर कोकणातला पहिला पाउस इथे पडतो म्हणुन हा आहे "मेघोबा". kl13 हे पाहुन कातळ कोरीव पायर्‍या चढून आपण येतो सर्वोच्च माथ्यावर. किल्ला चढायला एकंदर तास दिड तास लागतो आणि माथ्यावर विशेष अवशेष नसले तरी इथून दिसणार्‍या द्रुष्याने सर्व कष्टांचा विसर पडतो. इथेही एक कोरडे टाके आहे. गडावरुन विस्त्रूत परिसर दिसतो. उत्तरेला असावा किल्ला, ईशान्येला अशेरी, पुर्वेला कोहोज आणि सुर्या नदी, आग्नेयेला टकमक , दक्षिणेला तांदुळवाडी, तर पश्मिमेला पालघर शहर दिसते. हवा स्वच्छ असेल तर समुद्राची रेघही दिसेल, तर वायव्येला देवखोप पाझर तलाव दिसतो. kl87 देवखोप पाझर तलाव व मागे काळदुर्ग गडाचा एकंदर चिंचोळा माथा विचारत घेता हा फार महत्वाचा किल्ला नसणार, फक्त निरीक्षणाचे ठाणे असणार असा अंदाज बांधता येतो. दोन दिवसाची सवड असेल तर, या भागातले काळदुर्ग, असावा व तांदुळवाडी असे तीनही किल्ले पहाता येतील. kl56 काळदुर्ग किल्ल्याच्या परिसराचा नकाशा ( किल्ल्यावर विशेष अवशेष नसल्याने गडमाथ्याचा नकाशा दिलेला नाही) (टिपः- या भटकंतीचे मी काढलेले फोटो सापडत नसल्याने सर्व फोटो आंतरजालावरुन साभार) संदर्भ ग्रंथः- १ ) दुर्गसंपदा ठाण्याची- सदाशिव टेटविलकर २ ) शिवछत्रपतीच्या दुर्गाचां शोध - सतीश गुरुसिध्द अक्कलकोट ३ ) ठाणे जिल्हा गॅझेटिअर ४ ) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स ५ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट ६ ) डोगंरयात्रा- आनंद पाळंदे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 11549 views

💬 प्रतिसाद
य
यशोधरा Fri, 04/21/2017 - 15:38 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 04/21/2017 - 17:13 नवीन
तपशीलवार लिहिलंय. ही मालिका खूप छान होतेय. कामणदुर्ग उर्फ कामण्या वेगळा ना?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 04/22/2017 - 04:12 नवीन
प्लस वण टू आगोबा.
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Sat, 04/22/2017 - 07:03 नवीन
कामणदुर्ग वेगळा आहे. तो वसई जवळ आहे. येत्या आठवड्यात आसावा या किल्ल्यावर लिहील्यानंतर पुढचे दोन धागे कामणदुर्ग आणि गुमतारा असे येतील.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल कार्टं Sat, 04/22/2017 - 14:02 नवीन
तीन चार वर्षांपूर्वी गेलो होतो तिथे. आयुष्यात पहिल्यांदा आणि रान केळी खाल्ली तिथं, सीताफळा एवढ्या बिया त्याच्या.
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 04/21/2017 - 20:14 नवीन
क्या बात है! खूप छान, तपशीलवार आणि नेटके लिहिलं आहे.
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Sat, 04/22/2017 - 07:04 नवीन
यशोधराताई, वल्ली आणि बुवा व एस सर सर्वांचे मनापासून आभार.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल कार्टं Sat, 04/22/2017 - 14:04 नवीन
पालघराला जाणे झाले तर हा किल्ला दिसतो पण मी आतापर्यंत डोंगर समजत होतो याला. आज कळले की इथे किल्लाही आहे. किती जवळ आहे मला.
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Sat, 04/22/2017 - 16:55 नवीन
किल्ला जरुर बघून या. अवशेष फार नाहीत, पण वरुन परिसर फार छान दिसतो.
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Sat, 04/22/2017 - 16:53 नवीन
आज चक्क मेन बोर्ड्वर लेख आला. खुपच समाधान वाटले. मिपा वर चांगल्या लिखाणाची कदर होते.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 04/22/2017 - 17:19 नवीन
खूप छान लिहिताय. फोटोही आम्हाला अगदी नवीन असल्याने खास आहेत! शेवटचा फोटो दिसत नाहीये. जरा बघा.
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Sun, 04/23/2017 - 18:51 नवीन
शेवट्चा फोटो म्हणजे परिसराचा नकाशा का दिसत नाही याचे कारण मलाही समजत नाही आहे. तरी नव्याने जाणार्‍या लोकांच्या द्रुष्टीने नकाशा महत्वाचा असल्याने परत पोस्ट करीत आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 04/25/2017 - 03:56 नवीन
नकाशा दिसत नाहीये.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Mon, 04/24/2017 - 07:12 नवीन
हि लेखमालिका आवर्जून वाचतो आहे. अपरिचीत आणि अनवट गडांची माहिती लिहिताय हे खूप चांगलं आहे.
  • Log in or register to post comments
अ
अद्द्या Mon, 04/24/2017 - 07:48 नवीन
लेखमालिका खूप छान होतीये .. फोटो तर सुंदरच .. सोबत लिहिलंय हि छान .. लगे रहो
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 04/25/2017 - 01:58 नवीन
लेखमालिका खूप छान होतीये - खरंच. इकडे फारसं जाणं होत नाही. एकदाच तुंगारेश्वरला वरपर्यंत गेलो आहे.
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Tue, 04/25/2017 - 05:32 नवीन
लेखमाला मस्त चालु आहे. नविन किल्यांची माहिती मिळत आहे.
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Tue, 04/25/2017 - 14:08 नवीन
पु. भा. प्र.
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Tue, 04/25/2017 - 14:18 नवीन
किसन शिंदे, अद्द्या, कंजुस काका, राघवेंद्र, मी-सौरभ सर्वांचे मनापासून धन्यवाद. ह्या परिसरात शिवकालात फार मोठी युध्दे झाली नाहीत. तसेच सुरतेच्या पहिली स्वारी सोडली तर शिवाजी महाराज आले नाहीत. त्याद्रुष्टीने फक्त माहुली किल्लाच महत्वाचा. फक्त चिमाजी अप्पानी वसईची मोहिम हिच काय ती जमेची बाजु. म्हणून ट्रेकर्सना नवीन किल्ल्याची सविस्तर ओळख व्हावी यासाठीच हि मालिका सुरु केली आहे. पुढे काही किल्ले तर एकून ही माहित नसलेले असणार आहेत.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 04/26/2017 - 10:52 नवीन
मस्त लेख ! माहितीसाठी आभार !!
  • Log in or register to post comments
अ
अजया Wed, 04/26/2017 - 13:11 नवीन
वा! छान लेख. छोटा किल्ला म्हंटलं की मला फार आनंद होतो! पालघरात हक्काची मैत्रीण असल्याने हा किल्ला जमवणार. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Wed, 04/26/2017 - 16:51 नवीन
जरुर जाउन या आणि व्रुतांतही मिपावर लिहा
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 16 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 36 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा