Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

भाजलेल्या कैरीचे रायते

अ
अनन्न्या
Mon, 04/10/2017 - 05:18
बय्राच दिवसांनी मिपावर लिहायला जमतेय. घेऊन आलेय आंबा सिझन स्पेशल रेसिपी!! साहित्यः २/३ कच्चे रायवळ आंबे (ही आंब्याची जात विशेषतः कोकणात दिसते. त्या ऐवजी कोणत्याही कैय्रा घ्या.), ३ चमचे तेल, मीठ, गूळ, अर्धा चमचा मोहोरी, पाव चमचा हिंग, २ चमचे लाल तिखट raita कृती: कैय्रा धुवा, पुसून कोरड्या करा. निखाय्रात किंवा मध्यम आचेवर कैय्रा भाजून घ्या. गार होऊ द्या. साल सोलून गर काढून घ्या. गर हातानेच कुस्करून घ्या. जेवढा गर असेल त्याच्या दुप्पट गूळ घेऊन दोन्ही एकत्र करून घ्या. कढईत तेल तापवा. मोहोरी, हिंग आणि लाल तेखट घाला. गॅस मंद ठेवा. आता त्यात गर आणि गूळाचे मिश्रण घाला. ढवळा. मंद आचेवर गूळ विरघळू द्या. चवीनुसार मीठ घाला. साधारण सॉस इतपत झाले की गॅस बंद करा. गार झाल्यावर अजून थोडे घट्ट होते. गार झाल्यावर बरणीत भरून ठेवा. कैरीच्या आंबटपणावर गूळ जास्त लागू शकतो. चव अप्रतिम लागते. raita

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 10854 views

💬 प्रतिसाद
स
सूड Mon, 04/10/2017 - 08:12 नवीन
भारी!!
  • Log in or register to post comments
प
पिंगू Mon, 04/10/2017 - 08:22 नवीन
भारीच. पोळीवर लावून खायला मज्जा येईल.. बरे तशी किती दिवस टिकते?
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Mon, 04/10/2017 - 09:45 नवीन
आठदहा दिवस टिकते
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Mon, 04/10/2017 - 23:01 नवीन
अहाहा!!
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Mon, 04/10/2017 - 23:04 नवीन
वा वा.. हेल्दी पण आहे आणि !
  • Log in or register to post comments
र
रुपी Mon, 04/10/2017 - 23:25 नवीन
वा! दिसत पण अप्रतिम आहे!
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 04/11/2017 - 03:57 नवीन
ग्रेट दिसतय.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल कार्टं Tue, 04/11/2017 - 07:16 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Tue, 04/11/2017 - 07:56 नवीन
मस्तच ग
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Wed, 04/12/2017 - 07:25 नवीन
मस्त चव आहे
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 04/12/2017 - 08:48 नवीन
पारंपारिक पाकृ
  • Log in or register to post comments
व
विशाखा राऊत Wed, 04/12/2017 - 18:17 नवीन
:) आवडली
  • Log in or register to post comments
प
पियुशा गुरुवार, 04/13/2017 - 17:46 नवीन
तोपासु
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 31 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 35 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 38 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा