Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

स्टफ्ड बन (व्हेज आणि नॉन व्हेज)

क
केडी
Sat, 04/08/2017 - 07:58
STFDBN1 साहित्य
बन साठी ३ १/२ कप मैदा १ मोठा चमचा यीस्ट १/२ कप तेल (ऑलिव्ह असल्यास उत्तम) २ मोठे चमचे कोमट पाणी १/२ कप दूध २ चमचे साखर १ अंडं, फेटून मीठ, चवीनुसार पांढरे तीळ एग वॉश (१ अंड्याचे पांढरे, २ चमचे पाणी घालून फेटून) नॉन व्हेज सारणासाठी १ १/२ कप उकडलेल्या चिकन चे बारीक तुकडे (boneless cooked shredded chicken) २ कांदे, बारीक चिरून १ मोठा चमचा आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट १ चमचा गरम मसाला १ चमचा लाल तिखट १/२ चमचा हळद १ चिमूट चाट मसाला मीठ चवीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर व्हेज सारणासाठी १ १/२ कप पनीर चे छोटे तुकडे बाकी सगळे नॉन व्हेज सारणा सारखे कृती आधी बन ची तयारी करून घ्या. कोमट पाण्यात यीस्ट, अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा मैदा घालून ते नीट मिसळून घ्या. हे मिश्रण १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवा. दुधाला एक उकळी काढून ते हातांना कोमट लागे इतपत गार करून घ्या. ह्यात उरलेली साखर, तेल आणि मीठ (साधारण एक ते दिड चमचा) घालून, साखर विरघळे पर्येंत ढवळून घ्या. आता ह्या मध्ये १ कप मैदा घालून पातळसर पेस्ट बनवून घ्या. अंडे फेटून, ते आणि यीस्ट, ह्या पेस्ट मध्ये घाला. उरलेला मैदा घालून मऊ गोळा मळून घ्या. हा गोळा ओल्या फडक्याने झाकून साधारण दोन ते अडीच तास बाजूला ठेवा. तो पर्येंत सारणाची तयारी करून घ्या. हा गोळा फुगून साधारण दुप्पट झाला कि हलक्या हातांनी दाबून त्याचे साधारण १२ गोळे करून घ्या. प्रत्येक गोळा हाताने दाबून त्यात एक ते दिड चमचा सारण भरून घ्या. गोळ्याला बन सारखा आकार देऊन, वरून तीळ पेरून, सगळे बन अजून ३० मिनिटे ओल्या फडक्या खाली ठेवून द्या. Step1 ओव्हन १८० ला प्री-हिट करून घ्या. हे सगळे बन साधारण १० ते १५ मिनिटे भाजून घ्या. वरून हलका रंग आला कि बाहेर काढून ब्रश ने एग-वॉश लावून पुन्हा ओव्हन मध्ये ठेवून अजून १० ते १२ मिनिटे खरपूस भाजून घ्या. सारणाची कृती तेल गरम करून त्यात आलं लसूण मिरची पेस्ट परतून, त्यात कांदा घालून तो परतून घ्या. गॅस बारीक करून ह्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून, मग ह्यात चिकन (किंवा पनीर चे तुकडे) घालून ते परतून घ्या. शेवटी गॅस बंद करून, वरून चाट मसाला आणि कोथिंबीर घालून, हे सारण गार करत ठेवा. [सारणासाठी अजून काही कल्पना]
  1. बरेच लोक असे स्टुफ्ड बटाटे वडे करतात, आत मध्ये बटाटा वाड्याचे सारण भरून करू शकता
  2. अंडा भुर्जी, किंवा बॉईल्ड एग भुर्जी
  3. चिकन किंवा मटणाचा खिमा
  4. चीज चिल्ली टोस्ट सारखे चीज, हिरवी मिरची, कोथिंबीर
  5. गोड हवे असल्यास फ्रेश स्ट्रॉबेरी आणि स्ट्रॉबेरी जॅम किंवा सध्या आंब्याचा सिझन सुरु आहे तर मँगो जॅम आणि आंब्याचे काप वैगेरे
STFDBN2

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7163 views

💬 प्रतिसाद
प
पैसा Sat, 04/08/2017 - 08:29 नवीन
अहाहा! खूप छान!
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Sat, 04/08/2017 - 09:34 नवीन
३ १/२ कप मैदा ↑ १ कप किती मिलीचा? अमेरिकन २५० मिलि वाला कप का?
  • Log in or register to post comments
क
केडी Sat, 04/08/2017 - 11:16 नवीन
बेकिंग करताना वापरतात तो मोजायचा कप, एक कप म्हणजे साधारण 330 ग्राम.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sat, 04/08/2017 - 09:37 नवीन
मस्त. शेवटचा फोटो पाहून पाणी सुटले तोंडाला.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 04/08/2017 - 10:00 नवीन
रसना खवळवून आत् म्यास अत्रुप्त करणारा लेख! ;)
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Sat, 04/08/2017 - 11:59 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 04/08/2017 - 13:12 नवीन
चविष्ट!
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Sat, 04/08/2017 - 13:26 नवीन
  • Log in or register to post comments
द
दिपस्वराज Sat, 04/08/2017 - 16:04 नवीन
चविष्ट ......स्वादिष्ट ! शेवटचा फोटो तर कातिल .
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 04/09/2017 - 14:39 नवीन
उन्हाळा सुरु होताच करून पाहीन. पाकृ व फोटू आवडले.
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Sun, 04/09/2017 - 19:51 नवीन
मस्त,मस्त.नॉनव्हेज बन्स पावसाळ्यात मस्त वाटतील,थोडं थांबायला हवं
  • Log in or register to post comments
क
केडी Mon, 04/10/2017 - 16:58 नवीन
अगदी... गरम वाफाळलेल्या कॉफी सोबत नुकताच ओव्हन मधून काढलेला हा बन, एक सुंदर कॉम्बिनेशन होईल...
  • Log in or register to post comments
उ
उदय के'सागर Mon, 04/10/2017 - 14:47 नवीन
क्या बात, मस्तच! ते तीळ अजिबात काळे झाले नाहीत हे विशेष.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा