Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

थाई फ्राईड गार्लिक

क
केडी
Tue, 03/21/2017 - 04:39
TFG साहित्य ८ ते १० लसूण पाकळ्या, बारीक चिरून २ चमचे ऑलिव्ह ऑइल कृती हे असे फ्राईड गार्लिक, सूप्स किंवा नूडल्स वर गार्निश म्हणून घेतले जाते. काही हॉटेलात हे चकणा म्हणून देखील दिले जाते. हि देतोय ती अगदी सोपी मायक्रोवेव्ह पाककृती. तो नसेल, तर पळीत तेल घेऊन बारीक आचेवर लसूण खरपूस तळून घेणे. एका मायक्रोवेव्ह सेफ भांड्यात तेल आणि लसूण मिक्स करा. साधारण ८ ते १० मिनिटे हाय वर मायक्रोवेव्ह करा। (एक एक मिनिटाच्या अंतराने, बाहेर काढून थोडं हलवा) लसणीच्या रंग बद्दलला (तांबूस) कि बाहेर काढा, वाटल्यास एक चिमूट मीठ घाला। गार झाले की लसूण छान कुरकुरीत होतील. हा असा तळलेला कुरकुरीत लसूण, आणि तळलेला कांदा, पोह्याच्या चिवड्यात सुद्धा छान लागतो. ह्यातच मिक्स्ड हर्ब्स आणि काळीमिरी घातले कि वेगळी चव येईल (गार्लिक टोस्ट साठी). [अर्थात त्यासाठी लसूण तांबूस होईस्तोवर नाही थांबायचं, आणि तेला ऐवजी बटर वापरायचे]. अशीच एक फोडणी आमच्याकडे मुगाच्या खिचडी सोबत करतात. पळीत भरपूर तेल घेऊन त्यात हिंग मोहरीची फोडणी करायची, त्यात अश्या लसूण पाकळ्या (साला सकट) घालून, लसूण मऊ होईस्तोवर तळून, शेवटी एक चमचा लाल तिखट आणि मीठ घालून हि अशी खमंग फोडणी मुगाच्या खिचडी वर घालून खायची! सोबत तोंडी लावायला एखादा पापड!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6662 views

💬 प्रतिसाद
स
सविता००१ Tue, 03/21/2017 - 07:07 नवीन
अशीच एक फोडणी आमच्याकडे मुगाच्या खिचडी सोबत करतात. पळीत भरपूर तेल घेऊन त्यात हिंग मोहरीची फोडणी करायची, त्यात अश्या लसूण पाकळ्या (साला सकट) घालून, लसूण मऊ होईस्तोवर तळून, शेवटी एक चमचा लाल तिखट आणि मीठ घालून हि अशी खमंग फोडणी मुगाच्या खिचडी वर घालून खायची! सोबत तोंडी लावायला एखादा पापड! आमच्याकडे पण :) केदार - हुश्श. ही रेसिपि येते राव मला ;)
  • Log in or register to post comments
क
केडी Tue, 03/21/2017 - 07:13 नवीन
बास का राव, करा आता चेष्टा! :-)) :-)) तुझ्या रेसिपी बघत असतो मी चेहेरापुस्तिकेवर.....एक से एक बढकर....!
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 03/21/2017 - 12:25 नवीन
ऑलिव्ह ऑईल हे वेगळे. मला डाएटिशियन म्हणाली की ऑलिव्ह तेल तळायला वगैरे वापरू नये.
  • Log in or register to post comments
क
केडी Tue, 03/21/2017 - 13:16 नवीन
ऑलिव्ह ऑईल चे ४ प्रकार असतात. ते सगळं नंतर कधीतरी सविस्तर लिहीन, अर्थातच फ्राईड गार्लिक मायक्रोव्हेव पाकृ साठी ऑलिव्ह ऑइल चालून जाईल. बाकी, गॅस वर करताना घरातला नेहेमीच घरातले तेल वापरा.
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Tue, 04/04/2017 - 18:46 नवीन
कधी?
  • Log in or register to post comments
क
केडी Wed, 04/05/2017 - 08:05 नवीन
सध्या ऑफिस आणि उन्हाळ्याने बेजार...थोडी सवड मिळाली कि लिहितो ......तेल पुराण..... _/\_
  • Log in or register to post comments
स
सविता००१ गुरुवार, 04/06/2017 - 14:01 नवीन
विचारायला आले होते. पण चांगलं सणसणीत मोठ्ठं आधीच विचारून ठेवलय तुम्ही. बेस्ट
  • Log in or register to post comments
स
सविता००१ गुरुवार, 04/06/2017 - 14:07 नवीन
विचारायला आले होते. पण चांगलं सणसणीत मोठ्ठं आधीच विचारून ठेवलय तुम्ही. बेस्ट
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 04/06/2017 - 16:01 नवीन
भूक चाळवली गेली आहे !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- His Holiness the Dalai Lama Speaks to the Press in Bomdila, AP, India
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 28 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 40 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 44 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा