Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

हुरड्याचे वडे (पोंक वडे)

क
केडी
Fri, 03/10/2017 - 07:35
हुरड्याचे वडे (पोंक वडे) Ponk Wade साहित्य २ कप कोवळा हुरडा १ कप गव्हाचे पिठ १/२ कप बेसन १/३ कप ज्वारीचे पिठ १ मोठा चमचा प्रत्येकी लसूण, आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट मूठभर कोथिंबीर, बारीक चिरून १ छोटा चमचा ओवा १ मोठा चमचा मोहन (तेल) १ चमचा इनो फ्रुट सॉल्ट / बेकिंग सोडा चवीनुसार मीठ तळायला तेल कृती हुरडा म्हंटल, कि डोळ्यासमोर येते ती म्हणजे गर्द अमराई किंवा हिरवा गार शेतमळा, त्याच्या सावलीत, गौऱ्यांवर भाजलेली कोवळी ज्वारीची कणसे, सोबत शेंगदाणा चटणी, गूळ, शेव, दही आणि नंतर पिठलं भाकरी, ठेचा, आणि मसाला वांग्याचे तुडुंब जेवण! हल्ली मात्र हाच हुरडा शहरांमध्ये पॅकबंद पिशव्यात घरी आणून तव्यावर भाजून, दुधाची तहान ताकावर भागवली जाते. हुरडा हा महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ, गुजरात मध्ये ह्याला पोंक म्हंटले जाते. हि पाककृती तिथलीच. हुरडा मिक्सर मधून जाडसर भरडून घ्या. ह्यात सगळी पीठे, आलं, लसूण, मिरची पेस्ट, कोथिंबीर, ओवा आणि चवीनुसार मीठ घाला. मिश्रणात, १ मोठा चमचा मोहन घालून, ते हाताने मळून घ्या. गोळे होतील अश्या रीतीने पाणी घालून सगळं एकजीव करून घट्टसर मळून घ्या. गोळे करण्यापूर्वी, सोडा/फ्रुट सॉल्ट घालून पुन्हा एकदा एकजीव करून त्याचे गोळे करून मंद आचेवर तळून घ्या! गरम गरम पोंक वडे, हिरव्या चटणी आणि टोमॅटो सॉस बरोबर खायला घ्या! [हे वडे एयर फ्रयर मध्ये होतात, पण खमंगपणा जो यायला पाहिजे, तो येत नाही, म्हणून तळूनच काढावे. ह्याच मिश्रणाचे वडे करण्यापेक्षा थालिपीठं थापून ती शॅलो फ्राय केलीत तरी चांगली लागतील] Ponk Wade

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 12146 views

💬 प्रतिसाद
स
सूड Fri, 03/10/2017 - 07:57 नवीन
फ्रुट सॉल्ट मुळे तेल फार पीत नाहीत ना?
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Fri, 03/10/2017 - 09:37 नवीन
कातिल दिसताहेत। बेस्ट
  • Log in or register to post comments
क
केडी Fri, 03/10/2017 - 12:41 नवीन
आता करून बघ आणि फोटो टाक इथे!
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Sat, 03/11/2017 - 06:31 नवीन
आधी हुरडा पहाते मिळतोय का आता.. वर्णन वाचून मनातल्या मनातच जिभल्या चाटल्यात :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 03/10/2017 - 12:37 नवीन
सुरेख दिसतायत. चवही चांगली असणार. माझ्याकडे फ्रोजन पोंक मिळतोय का पाहते.
  • Log in or register to post comments
क
केडी Fri, 03/10/2017 - 12:44 नवीन
नाहीच मिळाले तर मग ह्यात स्वीट कॉर्न घालून, कॉर्न चे बनवून बघा, किंवा मटार घालून, अर्थात हुरड्याची चव वेगळीच ....
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Fri, 03/10/2017 - 14:35 नवीन
मिळतो का इथे हुरडा??? फ्रोजन का होईना, पण मिळत असेल तर एक नंबर काम होईल! धाग्यावर हळहळायला आले होते, पण अत्यानंदात परत जात आहे!
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 03/10/2017 - 15:11 नवीन
आता हुरडा कुठे मिळणार पण? कणसं भरली की! :-( बादवे, गौऱ्यांवर हे खरं तर गवऱ्यांवर असं पाहिजे ना?
  • Log in or register to post comments
स
सप्तरंगी Fri, 03/10/2017 - 15:25 नवीन
मस्त पाककृती, हुरडा मिळाला तर जरा इकडे पण पाठवा..
  • Log in or register to post comments
क
केडी Fri, 03/10/2017 - 15:27 नवीन
बादवे, गौऱ्यांवर हे खरं तर गवऱ्यांवर असं पाहिजे ना?
बरोबर, गवऱ्यांवरच भाजतात कणसे :-))
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 03/10/2017 - 16:02 नवीन
लै भारी!
  • Log in or register to post comments
ड
डॉ श्रीहास Sat, 03/11/2017 - 04:53 नवीन
फारच मस्त असतील चवीला... नो डाऊट !!
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Sat, 03/11/2017 - 18:31 नवीन
मस्त मस्त.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 03/19/2017 - 10:55 नवीन
फार छान खमंग दिसत आहेत वडे. आता हुरडा कुठे शोधावा म्हणते मी? स्वाती
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 03/19/2017 - 11:43 नवीन
हुरडा एकदाच खाल्ला होता... तेव्हाच तो इतका आवडला होता तर हुरड्याचे वडे किती भारी लागतील ? :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तू आता है सीने में जब जब सांसें भरती हूँ, तेरे दिल की गलियों से मैं हर रोज़ गुज़रती हूँ, हवा के जैसे चलता है तू मैं रेत जैसे उडती हूँ, कौन तुझे यूँ प्यार करेगा जैसे मैं करती हूँ... :- M.S. DHONI
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 13 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 27 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 29 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 33 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा