Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

पुडाची वडी

स
सविता००१
Sat, 03/04/2017 - 10:41
डिस्क्लेमरः १.खरं तर फेसबुक वर ही पा़कृ. पोस्ट करून हा .... जमाना लोटला. पण इथे आपण काही लिहूया असं स्वप्न सुद्धा पडत नव्हतं हो. जाम घाबरते मी इथल्या सुगरणींना आणि बल्लवाचार्यांना. तेव्हा त्यांना सगळ्यांना नमन करून आणि पिराताईंचं स्मरण करून इथे धिंगाणा घालायचं ठरवलंय आज. बघा राव... छळायचं नाय उगा... ;) २. आमचा कॅमेरा कम मोबल्या लैच बेसिक हाय. तेव्हा फोटोकडे फक्त पाकृची कल्पना येण्यासाठी असलेलं माध्यम अशा दयार्द्र दृष्टीने पहावे. ३. नाही हो.. संपलं सगळं सांगून. राधिका स्पेशल (माझ्या नवर्याची बायको वाली) पुडाची वडी आज पहिल्यांदाच करून पाहिली आणि मस्त झाली. नागपूर कडची पाककृती असल्याने मस्त झणझणीत करा तुम्हीही पहा: साहित्य: आवरणासाठी : १ कप बेसन, १ कप मैदा, मीठ, १ छोटा चमचा तिखट, अर्धा छोटा चमचा हळद, २ चमचे तेल आणि पाणी घालून घट्ट गोळा मळून घेतला आणि १ तास झाकून ठेवला. हा असा. . सारण: २ १/२ (अडीच कप ) धुवून , कोरडी करून मग बारीक चिरलेली कोथिंबीर, १ कप सुके खोबरे किसून, १ मोठा चमचा खसखस, १ मोठा चमचा तीळ, ८-१० हिरव्या मिरच्या, ७-८ लसूण पाकळ्या, १/२ इंच आलं, मीठ, साखर, १/२ छोटा चमचा तिखट, धने-जिरे पूड १ छोटा चमचा, १ लिंबाचा रस, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद हे असं दिसत होतं. . पोळीवर लावण्यासाठी : २ टी -स्पून तेल आणि २ चमचे गोडा मसाला एकत्र करून. तळण्यासाठी तेल. कृती: नेहमीप्रमाणे फोडणी करून त्यात तीळ आणि खसखस घातली. मिरच्या, आलं-लसूण पेस्ट करून त्यात परतून घेतली. नंतर त्यात किसलेलं खोबरं घातलं. छान परतल्यावर त्यात थोडं तिखट, मीठ, साखर, धने-जिरे पूड आणि लिंबाचा रस घालून एकत्र केलं. हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात चिरलेली कोथिंबीर घातली. मग मळलेल्या पिठाचा लिम्बाएवढा गोळा घेऊन तांदळाच्या पिठीवर लंबगोल लाटला. त्यावर तेल आणि गोड्या मसाल्याचे मिश्रण लावले आणि सारण बाजूच्या थोड्या कडा सोडून पसरले. चारी बाजूंनी एखादा पुडा बांधतो त्याप्रमाणे एकावर एक घेऊन चिकटवली. (मी थोडा पाण्याचा हात घेतला होता. सगळ्या वड्या करून झाल्यावर तेल तापवून घेऊन मंदाग्नीवर तळल्या. आणि टोमेटो सॉस बरोबर मटकावल्या. .

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 24008 views

💬 प्रतिसाद
स
सस्नेह Sat, 03/04/2017 - 10:57 नवीन
खूप खमंग लागतात या वड्या ! बादवे,
धुवून , कोरडी करून मग बारीक चिरलेली कोथिंबीर,
एवढा तपशील वाचून अंमळ ड्वाले पाणावले !
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sat, 03/04/2017 - 10:59 नवीन
क्या बात मस्तच!
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 03/04/2017 - 11:46 नवीन
हे तर मासवडीसारखं प्रकरण दिसतंय!
  • Log in or register to post comments
म
मोदक Sat, 03/04/2017 - 11:52 नवीन
तळलेल्या वड्या... ह्म्म्म... शॅलो फ्राय करुन जमेल का..?
  • Log in or register to post comments
म
मनिमौ Sat, 03/04/2017 - 14:22 नवीन
किती दिवसांनी. बादवे वडी खमंग दिसतेय. सेनापती बापट रस्त्याला भेट देणे आले
  • Log in or register to post comments
र
राधी Sat, 03/04/2017 - 15:12 नवीन
मासवड्या? तसाच काहीचा प्रकार दिसतोय. आमच्याकडे घाटावर अगदी अशाच पद्धतीच्या वड्या बनवल्या जातात. त्यात फक्त बेसन पीठ वापरतात, मैदा वापरत नाही. बाकी सारणही थोड्या फार फरकाने असेच असते. माझ्या साबा अतिशय सुरेख बनवतात या मासवड्या. मला बै नै जमत त्यांच्यासारख्या.
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Sun, 03/05/2017 - 10:35 नवीन
नाही मासवड्या वेगळ्या. बेसन पिठ घेरुन वाफ काढून मग थापतात आणि सारण भरतात.
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 03/04/2017 - 17:25 नवीन
आईग्गं! द्या बाबा या वड्या आता! फोटू चांगला आलाय. बेसिकच फोटू हवे असतात. भारीतले दिले तरी खाता येत नाहीतच ना!
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 03/04/2017 - 17:57 नवीन
छान पाकृ!
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Sat, 03/04/2017 - 18:37 नवीन
मस्तच ख मं ग!
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Sat, 03/04/2017 - 20:26 नवीन
अहाहा!!!!! आता हे पण सांग की तळण्याला पर्याय आहे का? मला वाटतं मासवडीला तळत नाहीत. साधारण अशीच असते ती.
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 03/05/2017 - 06:08 नवीन
वॉटरमार्कसाठी कुठलं साहित्य वापरलंत? ;-)
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Sun, 03/05/2017 - 06:29 नवीन
साठी साहित्य आम्ही नाही सांगणार ज्जा.... इथे फक्त पाकृचं साहित्य ;)
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Sun, 03/05/2017 - 06:54 नवीन
मोदक आणि पिरा, माझ्या मैत्रिणीच्या म्हणण्यानुसार मावे मध्ये ५ मिनिट ग्रिल करून ही वडी करता येते. ती म्हणाली थोडसं तेलाचं ब्रशिंग करून ठेवायच्या मावेत. पण माझ्याकडे मावे नाही. त्यामुळे आपापल्या जबाबदारीवर करणे. ;)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 03/05/2017 - 06:54 नवीन
काहीतरी उपयोग आहे का इथे फोटो टाकून आणि साहित्य वगैरे देऊन. खायला बोलावलंस तर खरं तरी मानता येईल. . . . पळाऽऽऽ!!
  • Log in or register to post comments
र
रॉजरमूर Sun, 03/05/2017 - 13:47 नवीन
एअर फ्रायर मध्ये तळता येतील की या वड्या..... के डी भाऊ घ्या मनावर .
  • Log in or register to post comments
क
केडी Mon, 03/06/2017 - 08:33 नवीन
अगदी हाच विचार आला, मागच्या वर्षी नागपुरात जाऊन सांबर वडी खाल्लेली, तेव्हाच वाटलेलं, आता करतो एकदा प्रयत्न. Image removed. बाकी पाकृ मस्त आहे, सविता! एकदा दोन्ही पद्धतीने करून बघतो!
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Mon, 03/06/2017 - 11:23 नवीन
कर कर. लगेच कर. तू तर आणखीन छान करशील. शिवाय मस्त फोटो .. बादवे- वरच्या फोटोतलं तेल केवढं काळं आहे... बापरे.. पण वडी मस्त दिसतेय. इतकी मोठी कढईभर नाही केली मी.
  • Log in or register to post comments
क
केडी Mon, 03/06/2017 - 11:39 नवीन
हो, नागपुरात भर बाजारात एका टपरी वजा जागेत तळताना दिसला, आणि मोह आवरला नाही, पण चवीला खमंग होती! :) आता मी करतो प्रयत्न ...तसं मटार करंजी एअर फ्रायर मध्ये केली होती, पण त्याला फार तळल्या पेक्षा बेक्ड चव आलेली. बहुदा तेल स्प्रेने मारण्यापेक्षा ब्रश ने लावून बघतो यंदा (थोडं जास्ती तेल लावलं तर होतील तळल्या सारख्या)
  • Log in or register to post comments
ख
खादाड गुरुवार, 03/16/2017 - 13:19 नवीन
If I am not wrong ha badhkar square rambhau kadla photo aahe
  • Log in or register to post comments
ख
खादाड गुरुवार, 03/16/2017 - 13:23 नवीन
??
  • Log in or register to post comments
ख
खादाड गुरुवार, 03/16/2017 - 13:24 नवीन
??
  • Log in or register to post comments
क
केडी Fri, 03/17/2017 - 06:28 नवीन
तुम्ही म्हणताय त्याच एरियात होतो, नक्की रामभाऊ का कोणी दुसरा ते मात्र आठवत नाहीये
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Sun, 03/05/2017 - 14:33 नवीन
मस्त मस्त.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 03/05/2017 - 15:02 नवीन
घरगुती मेनू, घरगुती फोटो, चव ही मस्त घरचीच. वा वा वा वा वा. आता घरगुती कौतुक . येऊद्या आणि
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Sun, 03/05/2017 - 15:52 नवीन
सहीच !
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Sun, 03/05/2017 - 16:33 नवीन
इतक्या थोर पदार्थाला त्या निर्बुद्ध मालिकेच्या नावे खपवू नका हो...
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Mon, 03/06/2017 - 02:38 नवीन
खपवायचय काय? पण मला हा पदार्थच मुळी या मालिकेमुळे कळाला. बाकी निर्बुद्ध मालिका हे मान्यच.
  • Log in or register to post comments
ज
जुइ Sun, 03/05/2017 - 16:36 नवीन
बघतेच करुन!
  • Log in or register to post comments
प
पिंगू Sun, 03/05/2017 - 16:43 नवीन
आता पुणे वारी करायलाच हवी..
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Mon, 03/06/2017 - 03:56 नवीन
आमंत्रण लागतंय की काय?- या कधीही. @मनिमौ: तू येणार असं कळ्ल्यापासून सेनापती बापट रोड ला लायटिंग करून ठेवलीये. ये;)
  • Log in or register to post comments
प
पुंबा Mon, 03/06/2017 - 08:18 नवीन
फोटो दिअसले नाहीत हे किती बरंय. नुसत्या वर्णनानेच इतकी वाट लागलीये. तोंपासु पाकृ.
  • Log in or register to post comments
म
मितान Mon, 03/06/2017 - 10:27 नवीन
तोंडाला पाणी सुटलं !!!!! फेसबुकवर वाचली पाहिली तेव्हापासून करायची आहे. आता स्वतःच स्वतःला आग्रह करायलाच हवाच आहेच :))
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 03/06/2017 - 11:51 नवीन
कोल्हापूरमधे पुडाची वडी मिळते. गृहिणी आणि वहिनी नावाची घरगुती फराळाची दोन दुकाने आहेत , तिथे अतिशय उत्तम पुडाचा वड्या मिळतात
  • Log in or register to post comments
प
पियुशा Wed, 03/08/2017 - 06:34 नवीन
ओह माय माय !!!
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Wed, 03/08/2017 - 23:29 नवीन
तोंपासु!! मस्तचं दिसातायेत पुडाच्या वड्या सव्या :) यम्मी! यम्मी!
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई गुरुवार, 03/09/2017 - 05:22 नवीन
मस्तच, मला फार आवडतात
  • Log in or register to post comments
स
सही रे सई Tue, 03/14/2017 - 03:49 नवीन
व्वा मस्तच आहे.. काका हलवाई कडे मिळते ही , त्याची टेस्ट खतरनाक भारी असते.. मी एक दोनदा सिंहगड रोड वरच्या काका कडून आणली होती ही .. पुणेकरांनी try केली नसेल तर नक्की आणून बघा.
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 03/20/2017 - 08:13 नवीन
सिंहगड रोड वरच्या काका कडून
आता आणून बघायलाच हवी.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 03/19/2017 - 10:50 नवीन
मस्त दिसत आहेत ग पुडाच्या वड्या. मितान म्हणते तसं स्वत:च स्वतःला आग्रह करायला हवा आहे. कधी मुहूर्त लागतो बघू या. ए फ्रा मध्ये चांगल्या होतील. गिल्टफ्री खाता येतील. स्वाती
  • Log in or register to post comments
ज
जागु Mon, 03/20/2017 - 08:19 नवीन
रेसिपी मस्तच. मिरच्यांऐवजी मसाला चालेल का? कारण मिरच्या मुलांच्या तोंडात येणार. धुवून , कोरडी करून मग , मला वाटल एखाद धान्य घ्यायचय की काय. खुपच निराशा झाली हो .. :))
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 27 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 39 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 43 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा