Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

मसूरदाल हलवा - एकभान्डी झटपट पाककृती!

आ
आषाढ_दर्द_गाणे
Mon, 02/13/2017 - 21:39
बरेच दिवस मूगडाळ हलवा खायची इच्छा होत होती . पण घरातली मुगाची डाळ संपली होती आणि नेमकी तेव्हाच मित्राला 'भारतीय वाण्याकडून मसूर आण' सांगितल्यावर त्याने अख्ख्या मसूराच्या जागी (उसळ करायला. हो, फार छान लागते) चुकून ढीगभर मसुरीची डाळ आणून गळ्यात मारली. मग तिची विल्हेवाट लावायला 'मूग मसूर भाई भाई' म्हणत मसूरडाळीचा हलवा करायचे ठरवले. श्रीमती तरला दलाल यांच्या मूगडाळ हलव्याच्या पाककृतीतल्या डाळ भिजवणे, वाटणे आणि त्यापायी सत्राशेसाठ भांडी खराब करणे वगैरे गोष्टींना फाटा देऊन साधी सोपी कृती अमलात आणली साहित्य एक वाटी मुगाची डाळ एक वाटी साखर एक वाटी तूप एक वाटी चिकाटी/सहनशीलता (पेशन्स) अर्धा वाटी दूध शंभर ग्राम बदाम सात आठ वेलच्या (पूड करून) अर्धे जायफळ (किसून. मूळ कृतीत केशर सांगितले आहे. पण ते घरी नव्हते. नसायचेच) tayaari टीप: चित्रात तूप आणि साखर वर नोंदवलेल्या प्रमाणापेक्षा कमी घेतलेले दाखवले आहे. पण हलवा बनवायला लागल्यावर तो माझा भाबडेपणा होता हे लक्षात आले. तदुपरांत, प्रसरणशील कमरेला 'नक्की कार्डीओ करेन पुढच्या आठवड्यात' वगैरे (भोळी) वचने दिली आणि झक्कत अख्खी एक-एक वाटी तूप आणि साखर घातली. कृती मूळ कृतीत सांगितल्याप्रमाणे डाळ तीन-तीन तास भिजवायला वेळ नसल्याने, अगदी थोड्या पाण्यासह डाळ कुकर मध्ये घेतली आणि अतिशय कमी आचेवर शिटीसकट गरम करायला ठेवली daal पाणी कमी असणे महत्वाचे आहे कारण हलवा बनवताना ह्याच पाण्याचे बाष्पीभवन करायचे आहे. एक शिटी होईल ना होईल इतपत वाफ देऊन गॅस बंद केला. साधारण दहाएक मिनिटे. डाळ छान खुलून पिवळी, फडफडीत झाली. shijleli थोडी कच्ची राहिली तरी हरकत नाही. नंतर त्याच कुकर मध्ये तूप घेऊन डाळ परतायला सुरवात केली. ह्याच वेळी वाटीभर चिकाटी गरजेची आहे. कारण हे वेळखाऊ आणि मेहनतीचे काम आहे. पण कठीण मुळीच नाही. डाळ भांड्याच्या बुडाशी चिकटणार नाहीशी झाल्यावर दूध घातले, जे पटकन मिसळून गेले. halawtana पुढे त्यात वेलचीची पूड आणि किसलेले जायफळ घातले आणि सरतेशेवटी साखर घातली साखर आधी घालू नये कारण ती जळण्याचा संभव आहे. मग डाळ परतत ठेवली नि हवा तसा रंग आणि ढवळायचा कंटाळा आल्यावर गॅस बंद केला. हलवा भांड्याला चिकटेनासा झाला पाहिजे. tayaar फोडलेल्या (चिरलेल्या नव्हे) बदामांनी सजवून पेश है - मसूर दाल हलवा halwa दिसायला पुरणासारखा 'वेष बावळा' असला तरी चवीला अगदी मुगाच्या डाळीच्या हलव्यासारखाच! दोन खवय्ये/ चार आम आदमींना सहज पुरेल. ता. क: बदाम फोडायची सोपी कृती - एक दणकट मग घ्या. नाजूक वा पाहुणे आल्यावर काढायचा असतो त्यापैकी कप नको. 'जुम्मा चुम्मा दे दे' मध्ये अमिताभने धरला होता तसा मजबूत हवा. बशीत/ कापफळ्यावर (चॉपिंग बोर्ड) बदाम पसरून ठेवा. मग मग आडवा (त्याचे तोंड समोर होईल असा) धरून एका बदामावर मोहर (निळ्या शाईचा स्टॅम्प) उमटवायला वापरतो तितुका जोर लावून फटका मारा. जास्त जोर नको मग,बदाम,बशी ह्या पैकी काहीही तुटेल. उचितजोर फटका मारलात कि बदाम तुटून त्याचे छोटे तुकडे होतील. मग काय, मग उचला आणि सुरु व्हा - एक बदाम, एक फटका शंभरेक ग्राम बदामांना पंधराएक फटके पुरेत. सजावटीसाठी बदाम तुकडे एका मिनिटाच्या आत तयार!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 11706 views

💬 प्रतिसाद
र
राघवेंद्र Mon, 02/13/2017 - 22:06 नवीन
छान आहे !!!
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 02/13/2017 - 22:41 नवीन
पहिल्यांदाच पाहतिये ही पाकृ.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 02/14/2017 - 03:35 नवीन
दर्दी पाक क्रुती
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 02/14/2017 - 03:39 नवीन
साहित्य एक वाटी मुगाची डाळ एक वाटी साखर एक वाटी तूप एक वाटी चिकाटी/सहनशीलता (पेशन्स) अर्धा वाटी दूध शंभर ग्राम बदाम सात आठ वेलच्या (पूड करून)
एक तो घोडा बोलो नै तो चतुर बोलो, ये मुंग मसूर, मुंग मसूर क्या हय?
  • Log in or register to post comments
आ
आषाढ_दर्द_गाणे Tue, 02/14/2017 - 16:56 नवीन
लिहिता लेख भूलचूकीने, रुसला हतमलचा एकदाच मूड। होती ना तीन चित्रे, नि उल्लेख छप्पन्न, तरी मजवर उगी बरसले श्री. सूड।। हतमल = HTML चित्रे, उल्लेख = मसुरीची/चे
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 02/15/2017 - 14:19 नवीन
अंगत पंगत वरच्या सुरंगा दातार यांची प्रतिक्रिया वाचल्यासारखं वाटलं.
  • Log in or register to post comments
आ
आषाढ_दर्द_गाणे Wed, 02/15/2017 - 23:42 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 02/16/2017 - 09:57 नवीन
अंगत्पंगत नामक पेज आहे चेपुवर, मराठी रेसिपीजचं. त्यातली एक व्यक्ती अशा कविता पाडत असते.
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Tue, 02/21/2017 - 11:35 नवीन
हलवा करू तेव्हा करू, पाकृ पेक्षा कविता अधिक छान वाटतेय. हलव्यामध्ये टाकलेल्या बदामांकारता मी वापरत असलेली पद्धत, (पण त्याकरता चिकाटी अजून अर्धी वाटी लागेल) बदाम अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा, सोलून घ्या आणि काप करा. बदामाची चव अधिक चांगली लागते. एक वाटी डाळीला शंभर ग्राम बदाम अंमळ जास्त वाटतात.
  • Log in or register to post comments
क
कैवल्यसिंह Tue, 02/14/2017 - 03:57 नवीन
पाककृती मस्तय... पण साहित्यामधे मुगाची डाळ लिहीली आहे.. व साहित्याच्या फोटूमधे तर मसुर डाळ दिसतेय.. नक्की कोणती डाळ? तसही मला जास्त गोड पदार्थ आवडत नाहीत.. स्पायसी पदार्थ भरपूर आवडतात..
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 02/14/2017 - 04:54 नवीन
पाकृ एकदम ढिंच्याक लिहिता, पण मधेच हिट्विकेट होता. साहित्यात मूगडाळ कशी काय आली अचानक! बरं हा खाल्ल्यावर मूगडाळीचा हलवा खाऊन होते तशीच समाधिस्त अवस्था होते का?
  • Log in or register to post comments
आ
आषाढ_दर्द_गाणे Tue, 02/14/2017 - 16:54 नवीन
पण मधेच हिट्विकेट होता
अगदी. ह्यावेळी अतिशहाणपणा अंगचट आला. ते मुगाची लिहिलेय तिथे खरे तर मुगाची मसुरीची असे लिहायचे होते. रिव्हर्स स्वीप मारताना हिटविकेट! तरी नशीब फोटो नीट दिसतायत ह्या वेळी.
बरं हा खाल्ल्यावर मूगडाळीचा हलवा खाऊन होते तशीच समाधिस्त अवस्था होते का?
समाधीचे माहित नाही, पण निद्रादेवी नक्की प्रसन्न होते! तूप, साखर आणि जायफळ एकत्र खाल्ल्यावर अजून काय होणार म्हणा...
  • Log in or register to post comments
प
पिंगू Tue, 02/14/2017 - 06:59 नवीन
आषाढ, थंडी गेली आणि हलवा आता आला होय.. बाकी, साहित्य यादी मध्ये मसूर डाळच टाका.. (एक वाटी मुगाची डाळ)
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 02/14/2017 - 08:25 नवीन
. .. . . ... . .... .. ...
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Wed, 02/15/2017 - 13:56 नवीन
मसूर डाळ खुश झाली असेल कुणी मला गोड पदार्थात वापरलं म्हणून,पण पाककृती करून पहिली पाहिजे,शिजवून झाल्यवरची कृती मावेत केली तर सोपी होईल पाककृती.
  • Log in or register to post comments
आ
आषाढ_दर्द_गाणे Wed, 02/15/2017 - 23:36 नवीन
शिजवून झाल्यवरची कृती मावेत केली तर सोपी होईल पाककृती
म्हणजे मावा वापरायचा असे म्हणताय का? तो कुठून मिळणार इथे? असो. तुम्ही पाकृ केलीत तर कशी झाली ते कळवा
  • Log in or register to post comments
प
पिंगू गुरुवार, 02/16/2017 - 05:38 नवीन
मायक्रोवेव्ह रे. मावा नाय..
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sun, 03/12/2017 - 19:10 नवीन
आयला जबरीच! कभी करके देखता हूँ.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 03/19/2017 - 10:59 नवीन
दिसतो आहे हलवा. करून बघायला हवा. स्वाती
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 47 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    16 hours 59 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 3 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 7 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा