Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

तीन हटके रेसिपी (सांजा, अंडाकरी आणि सोयाबीनची भजी)

व
वसंत वडाळकर_मालेगांव
Mon, 02/13/2017 - 07:31
नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळा सांजा आणि वेगळी अंडाकरी तसेच सोयाबीनची भजी यांची रेसिपी आज मी तुम्हाला सांगतो. रेसिपी १ - अफलातून सांजा आपण सांजा (जाड कणिक किंवा रवा भाजून केलेला उपमा) किंवा उक्कड पेंडी (बारीक कणिक भाजून केलेला उपमा) करतांना प्रथम रवा किंवा कणिक भाजून घेतो. त्यानंतर काजलेले रवा किंवा कणिक बाजूला काढून कढईत प्रथम तेल किंवा फोडणीसाठी मोहरी किंवा जीरे वापरतो. त्यानंतर मिरची, कांदा आणि टमाटे टाकून व्यवस्थित शिजवून घेतो. मग तिखट, मीठ, मसाला टाकून शेवटी पाणी टाकतो. पाणी उकळल्यावर त्यामध्ये भाजलेला रवा किंवा कणिक टाकून शिजवून घेतो. ही झाली नेहमीची पद्धत! पण मी आपणाला एक नवीन पद्धत सांगतो आहे. त्यानुसार आपण एकदा करून पहा, आपणाला नक्की आवडेल आणि खायला सुंदर आणि स्वादिष्ट लागेल! 1. एका पातेल्यात दोन कप पाणी घ्या. त्यामध्ये तेल, जिरे आणि ठेचलेले लसूण, कांदा, टमाटे तसेच तिखट, मीठ, मसाला टाका. 2. ते पाणी उकळू द्या. तोपर्यंत रवा किंवा कणिक भाजत राहा. 3. पाणी उकळू लागले की ते भाजलेल्या रवा किंवा कणिकेवर टाका आणि शिजू द्या. अशा पद्धतीने केलेला रवा किंवा उक्कड पेंडी खूप स्वादिष्ट लागते. जेव्हा हे पदार्थ घरी मी बनवतो तेव्हा हीच पद्धत वापरतो. याचप्रमाणे वरील उकळत्या पाण्यात भाजीच्या फोडी टाकून भाजी शिजवता येते. त्यामुळे फोडणी जळत नाही आणि जळका वास सुद्धा लागत नाही. ------ रेसिपी २ - हटके अंडाकरी साहित्य: अर्धी वाटी ओले खोबरे, दोन कांदे; लसूण, आले आणि कोथिंबीर यांची पेस्ट; तिखट, मीठ, हळद आणि गरम मसाला; आवश्यकतेनुसार तेल आणि चार अंडी कृती: १. प्रथम ओले खोबरे व कांदे भाजून त्याची पेस्ट करावी. कढई मध्ये तेल टाकून जीऱ्याची फोडणी द्यावी. २. ओले खोबरे व कांदे पेस्ट त्यात टाकून तेल सुटेपर्यंतशिजू द्यावे. ३. मग आले, लसूण आणि कोथिंबीर यांची पेस्ट टाकावी. ४. त्यात तिखट, मीठ, हळद आणि गरम मसाला हे आवश्यकतेनुसार टाकावे. ५. मग तीन कप पाणी टाकावे. ६. पाण्याला उकळी आल्यावर त्यात चार अंडी फोडून "कच्ची" टाकावी. ७. दहा ते पंधरा मिनिटे शिजू द्यावे. यात हटके काय आहे? आपण नेहेमी करतो त्या अंडाकरी मध्ये अंडी आपण आधी उकडून घेतो. मात्र येथे वापरलेल्या पद्धतीनुसार पनीर करतांना ज्याप्रमाणे दुध फाटते त्याप्रमाणे यात अंडी फाटतात. ही अंडाकरी भातासोबत आणि भाकरीसोबत चांगली लागते. रेसिपी ३ - सोयाबीन वड्यांची भजी आपण नेहमी कांदा, गिलके, बटाटे यांची भजी करतो. याचप्रमाणे सोयाबीन ची सुद्धा भजी बनवता येतात व ती दिसायलाही एकसारखी आणि गोल दिसतात. साहित्य: १) सोयाबीन वड्या १५ ते २० २) बेसन पीठ ३) तिखट, मीठ, हळद आवश्यकतेनुसार ४) तेल कृती: १) प्रथम सोयाबीन वड्यागरम पाण्यात दोन तास भिजत ठेवा आणि त्यानंतर वड्यातील पाणी काढून टाका २) मग बेसन पीठ घेऊन त्यात चवीनुसार व आवश्यकतेनुसार हळद व तिखट मिसळा. मग त्यात पाणी टाकून सोयाबीन वड्यांना लागेल असे पीठ भिजवा. ३) भिजलेल्या पिठात सोयाबीन वड्या टाकून गरम केलेल्या तेलात टाळून घ्या ४) हे सोयाबीन चे भाजे फार चवदार व खुसखुशीत लागतात. ५) ही भजी हिरव्या मिरचीच्या किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खावीत. चवदार लागतात!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 10092 views

💬 प्रतिसाद
स
संजय पाटिल Mon, 02/13/2017 - 08:36 नवीन
अंडाकरीची ही पद्धत माहित होती. बाकिच्या दोन पहिल्यांदाच वाचल्या. फोटु हवे होते.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 02/13/2017 - 08:39 नवीन
कल्पक पाकृ.
  • Log in or register to post comments
क
कैवल्यसिंह Mon, 02/13/2017 - 11:16 नवीन
मस्तच.. अशी अंडाकरी आम्ही नेहमीच करतो त्यामुळे हि पद्धत माहित आहे.. पण उपमा/सांजा व सोयाबीन वड्यांची भजी ह्या दोन्ही जरा वेगळ्या व जरा हटके पद्धती आहेत.. करुन बघन्यात येतील..
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले Mon, 02/13/2017 - 13:23 नवीन
सोयाबीन वड्या नक्की कश्या प्रकारे खाव्यात ? एकूणच ते प्रकरण काही समजत नाही. एका ठिकाणी वाचले आहे कि कुकर ला २ शिट्ट्या काढून पाणी काढून टाकावे, तर अजून एका ठिकाणी वाचले कि पाण्यात १५ मिनिटे उकळून घ्यायच्या आणि दाबून पाणी काढून टाकायचे आणि मग वापराव्यात. वरती आपण लिहिले आहे कि २ तास गरम पाण्यात भिजवावे. नेहमी खाणारे काही मार्गदर्शन करू शकतील का ? एकूणच त्या वड्यांचा स्पंज सारखा पोत आणि रबरासारखा चिवटपणा बघून ते खावेसे वाटत नाहीत. ते खाल्लेले पचतात कि स्पंज तसाच बाहेर ? :) आणि त्यामध्ये खरंच उच्च प्रतीची प्रथिने असतात का ? का उगीचच हाइप आहे ?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 02/13/2017 - 14:13 नवीन
मला तर एकूण सोयाबीन ह्या प्रकाराबद्दलच शंका आहे. तेल आणि वड्याही.. हे आरोग्यास उपायकारक आहे की हानिकारक ह्याबद्दल डॉक्टरांमध्येही एकमत नाही. आमच्या घरात सोयाबीन तेल आणणे गेली पाच वर्षे बंद केलं आहे. महाग असले तरी मराठी जेवणाकरता शेंगदाना तेल उत्तम. अथवा सूर्यफूल..
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Mon, 02/13/2017 - 17:27 नवीन
माझ्या आजीची हॄदयविकाराच्या झटक्यानंतर रुबी हॉस्पिटलात शस्त्रक्रिया झाली होती. तिथे पथ्य-पाण्याबद्दल बोलतांना जेव्हा डॉक्टरांना विचारले की भाज्या वगैरे बनवायला सोयाबीन तेल वापरावे का तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यांच्या मते सोयाबीनचे तेल हे आरोग्यास उपायकारक नसून हानिकारक आहे. डॉक्टरांनी आजीला अगदी प्रमाणात वापरून शेंगदाणा तेलाच्याच भाज्या खाण्याचा सल्ला दिला.
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले Mon, 02/13/2017 - 17:40 नवीन
+१ मला पण असेच वाटते. तसेच राईस ब्रान तेलाचे पण. कोणाला तरी काहीतरी मार्केट मध्ये खपवण्यासाठी केलेल्या ह्या मार्केटिंग गिमिक वाटतात. शेंगदाण्याचे तेल सर्वात उत्तम.
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Mon, 02/20/2017 - 10:27 नवीन
हा स्पंज कम रबर सहज पचतो. उच्च प्रथिने या बाबत काही माहिती नाही. गरम मसाला घालून केलेली सुकी अथवा लिप्ती भाजी चविष्ट लागते.
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 02/13/2017 - 14:06 नवीन
अंडाकरी माहीत आहे. मॅगीसारखा उकडलेला सांजा आणि सोयाबीन भजी हे नवीन प्रकार आहेत. करून बघायला पाहिजेत.
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 02/13/2017 - 17:08 नवीन
फोटो??
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Mon, 02/13/2017 - 21:37 नवीन
अरे वा! आमच्याकडे उपमा असाच करतात - छान होतो. बाकी दोन माहिती नव्हत्या. अंडाकरी नक्की करुन बघेन ! पुढच्या वेळी फोटो नक्की टाका
  • Log in or register to post comments
आ
आषाढ_दर्द_गाणे Mon, 02/13/2017 - 21:42 नवीन
तोन्पासु, पाककृतीकरता धन्यवाद!
  • Log in or register to post comments
P
palambar Sat, 02/25/2017 - 12:24 नवीन
सोयाबीन ची भाजी अथवा भात चांगला लागतो! दोन तास एवढा वेळ भिजवावे लागत नाही, गरम पाण्यात थोडा वेळ भिजवून, पाणी दाबून काढून टाकावे, वरील अंडाकरीच्या मसाल्यात घालून सुध्दा भाजी छान होईल.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Mon, 03/06/2017 - 11:38 नवीन
आम्ही असा फक्त उपमा करतो. आता सांजा पण करून पाहीन. सोयाबीन्ची भजी पहिल्यांदाच ऐक्ली. मी फक्त त्या भाजीसाठी नाहितर बिर्याणीत वापरते. आता हे पण करीन.मस्त कल्पना आहेत. पण सोया चंक्स इतका वेळ भिजवून नाही ठेवायला लागत हो. अर्धा तास बास झाला. तिखट पदार्थ असेल तर किंचित मीठ घालून उकळलेल्या पाण्यात २० मि. ठेवून पाणी काढून टाका आणि वापरा. जर गोड पदार्थ असेल तर मीठ नाही घालायचं.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 52 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 4 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 8 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 11 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा