Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

हवा हवाई फलाफल

ल
लीना कनाटा
Sat, 01/14/2017 - 16:44

Book traversal links for हवा हवाई फलाफल

  • ‹ हवा हवाई कुसकूस- किनवा टिक्की
  • Up
उपकरण : एअर फ्रायर कृती : फलाफलचे रेडीमिक्स विकत आणावे. वेष्टणावर दिलेल्या प्रमाणात रेडीमिक्स मध्ये पाणी घालून मळावे. त्याचे छोटे गोळे करून टिक्की सारखा आकार द्यावा. खरंतर फलाफल साधारणतः गोल छोट्या चेंडू सारखे असतात परंतु एअर फ्रायरच्या सोइ साठी टिक्कीचा आकार दिला. फलाफल तेलात न तळता हवेवर तळावेत ( कि हवावेत? ). या फलाफल टिक्क्या एअर फ्रायर मध्ये ठेवून ऑलिव्ह ऑइलचा ईस्प्रे मारावा आणि २० मिनिटे एका बाजूने तर १५ ते १८ मिनिटे दुसऱ्या बाजूने तांबूस सोनेरी रंग येई पर्यंत टाळावेत. फलाफलला तळायला ( कि हवायला ? ) जास्त वेळ लागतो असा अणभव आहे. फलाफल आतून सॉफ्ट परंतु बाहेरून अतिशय क्रिस्पी होतात. या बरोबर त्झाटझीकी, त्झातझिकी, त्झाट्झकी, झाझीकी, सासिकी, छाचिकी, चाचीक्की - enough of it - Tzatziki सॉस असेल तर उत्तमच (आम्ही याला "झकाझकी" सॉस म्हणतो). झकाझकी सॉस नसेल तर हमूस, हामूस, हुम्मुस, हमस, हमास, हंमास, हम्मस, हंम्मस, who-moss, hum-moose, hum-oose, homos, hamas, hoommos, hummoos, home'-os , hum-mos - enough of it again - Hummus डीप देखील चालेल (याला डीप म्हणावे, सॉस म्हणावे कि सरळ चटणी म्हणावे ??) . मोबल्याने एक, दोन फटू खेचावेत आणि फलाफल टिक्क्यांचा गिल्ट फ्री फन्ना उडवावा. यथावकाश फटू येथे शेअर करावेत. हवा हवाई फलाफल

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9248 views

💬 प्रतिसाद
र
रेवती Sat, 01/14/2017 - 17:47 नवीन
ही पाकृही आवडली.
  • Log in or register to post comments
क
कैवल्यसिंह Sat, 01/14/2017 - 21:55 नवीन
मस्तय पाककृती.. पण या सोबत ते पिटा/पीटा का पिता (वडील नव्हे)/पीता आसेच त्या ब्रेडचे नाव आहे तो ब्रेड नाही का? त्या ब्रेडमधे घालून खातात न फलाफल?.... मी तर आसेच ऐकले आहे ब्वा...
  • Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब Sun, 01/15/2017 - 02:05 नवीन
ए रेडिमिक्स मंदी काय मजा नाय चाईल्ड, आपुन अश्या रेसिपीला फाऊल समजतो. ओरिजिनल दे नी काय तर.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 01/15/2017 - 09:01 नवीन
वरच्या डिकरा सारखेच शेम टु शेम बोलतो ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अम्बरसरिया..मुंडयावे कचिया कलियाँ ना तोड़, तेरे माँ ने बोले हैं मुझे तीखे से बोल... :- Fukrey
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sun, 01/15/2017 - 12:11 नवीन
आपुन अश्या रेसिपीला फाऊल समजतो. झकास!
  • Log in or register to post comments
ल
लीना कनाटा Tue, 01/17/2017 - 04:16 नवीन
ओपी डीक्रा, आजकाल इन्स्टंट चा जमाना हाय नी, पोरे लोकांस्नी समदे इन्स्टंट लागतें. आन तसं बी आपुन न्यू हाय ना मिपा मंदी. शिशु शाळंचा धागा वाचला कि नाय? शिक्शान चालू हाय नि मिपा शाळं मंदी, तवा धीरे धीरे समझलच ट्रिक्स ऑफ द मिपा ट्रेड. बाकी पिंक टाकला ह्ये ब्येस क्येला, मिष्टेक तर ध्याना मंदी आली नी. आन ते दुजा बे डिक्राने तमे मंजुरी दि ना के, ते लोकांस्नी बी धन्स. बोल्लेतो, निंदकाचे ट्रोल असावे धाग्याला ह्ये ब्येस हाय.
  • Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब Tue, 01/24/2017 - 14:03 नवीन
हे बरंय. मी नवी मी नवी करत दुसऱ्याला ट्रोल म्हणणे. शिशुशाळा काय आहे ते काही मी वाचलेले नाही अन तुमचे एकंदरीत ऍटीट्युड पाहून वाचायची इच्छा ही उरलेली नाही. तुमचा इन्स्टंटचा सोस तुम्हाला(च) लखलाभ.
  • Log in or register to post comments
स
सामान्य वाचक Sun, 01/15/2017 - 16:08 नवीन
200 ग्राम कबुली चणे रात्री भिजत घालावेत, सकाळी निथळून पाणी न घालता वाटावेत वाटताना त्यात 1 मोठा कांदा, 6 7 लसूण पाकळ्या, घालावे नंतर त्यात मीठ, थोडे तिखट, हवी असल्यास कोथिंबीर चिरून घालावी बायण्डिंग साठी थोडे बेसन (गरज असेल तर)घालावे आणि एअर फ्रायर मध्ये टिक्क्या करून तळाव्यात झाझिकी : 1 काकडी किसून, त्यात 3 4 लसूण पाकळ्या बारीक चिरून घालाव्यात आणि घट्ट दही आणि मीठ घालून मिक्स करावे
  • Log in or register to post comments
ल
लीना कनाटा Tue, 01/17/2017 - 04:21 नवीन
सावा काका, आभार्स बर्र्का फलाफल आणि झाझिकी ची फ्रॉम स्क्रॅच पाकृ दिल्याबद्दल.
  • Log in or register to post comments
स
सामान्य वाचक Tue, 01/17/2017 - 08:40 नवीन
तुमच्या पाककृतीत ढवळाढवळ केल्याबद्दल तरीपण अभार्स बद्दल आभार
  • Log in or register to post comments
फ
फ्रेनी Sun, 01/29/2017 - 13:52 नवीन
छान आहे रेसिपी
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sun, 01/29/2017 - 14:38 नवीन
हो! सामान्य वाचक यांनी दिलेली रेसिपी छानच आहे. करण्यासारखं काहीतरी आहे त्यामुळे नक्कीच करुन बघणेत येईल.
  • Log in or register to post comments
र
रुपी Sun, 01/29/2017 - 18:34 नवीन
छान दिसत आहेत फलाफल. बाकी मिपाच्या मास्टर्शेफ्सच्या फलाफल, झाझिकीच्या पाकृ हे घ्या.. झाझिकी फलाफल शवर्मा फलाफल सँडविच
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 50 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 3 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 4 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 7 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 10 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा