Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

भरली भेंडी प्रकार तिसरा (मायक्रोवेव्ह स्पेशल)

न
नूतन सावंत
Wed, 01/11/2017 - 10:56
भरली भेंडी(मायक्रोवेव्ह स्पेशल)-प्रकार तिसरा . झटपट होणाऱ्या पदार्थात यांचा नंबर खूपच वरचा आहे.अक्षरश: काहीं मिनिटात भेंडी शिजवून वाढता येतात.कोवळी करंगळीइतकी भेंडी या दिवसात खूप येतात. शिवाय हल्ली ओला नारळही खवलेला तयार मिळतो.बाकीचे जिन्नस घरात असतातच.हा पदार्थ माय्क्रोवेव्ह्सोबत आलेल्या श्रीमती तरला दलाल यांच्या पुस्तकातून घेतला आहे.गुजू पद्धतीच्या या पदार्थात मी थोडासा बदल करून हि कृती सिद्ध केली आहे.लिहायलाच जास्त वेळ न घालवता इथे कृतीच देते. साहित्य;- १.कोवळी भेडी पाव किलो २.अर्धा ते पाउण वाटी ओले खोबरे ३.पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर ४.एक मोठा चमचा धणेपूड. ५अर्ध मोठा चमचा जिरेपूड., ६.एक मोठा चमचा मिरची पूड ७.एक चहाचा चमचा साखर ८.अर्धा चहाचा चमचा आमचूर पूड ९.चिमुटभर हिंगपूड. १० एक मोठा चमचा तेल ११ चवीनुसार मीठ कृती:- १, भेंडी धुवून पुअसून डेख न काढता एक चीर द्या. २.सर्व साहित्य एकत्र करून भेंड्यात भरा. ३.एका उथळ डिशमध्ये ही भें ठेवा व पाण्याचा एक हबका द्या.( पाण्याचा शिडकावा करा.) ४. हाय पॉवरवर मायक्रोवेव्हमध्ये चार मिनिटे शिजवा, ५.गरमागरम वाढा.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5691 views

💬 प्रतिसाद
क
कैवल्यसिंह Wed, 01/11/2017 - 14:26 नवीन
पाकृ चा फोटूच दिसत नाय... मंग कशी कळनार कशी दिसतेय ते?
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 01/14/2017 - 06:21 नवीन
पाकृ छान! फटु दिसत नाय!
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 01/14/2017 - 17:50 नवीन
भरली भेंडी कॄती आवडली. फोटू दिसेना. भेंडीची भाजी रोज खाल्ली तरी आवडेल . भेंडीचे सगळे प्रकार आवडतात. आता प्रश्न हा आहे की मला भेंडी आज भारतीय दुकानात बघावी लागेल. मिळाल्यास ही पाकृ नक्की करणार.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 01/15/2017 - 09:05 नवीन
भेंडी मायक्रोवेव्हमुळे गायब झाली काय ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अम्बरसरिया..मुंडयावे कचिया कलियाँ ना तोड़, तेरे माँ ने बोले हैं मुझे तीखे से बोल... :- Fukrey
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 01/16/2017 - 03:41 नवीन
आज केली होती ही भाजी. एकदम आवडली. आमच्याकडे दोन प्रकारात भेंडी मिळते. एक म्हणजे सडपातळ व कोवळी, ती नेहमी आपण पोहोचेपर्यंत संपलेली असते. प्रकार दुसरा जाड, गोल, बुटकी (भेंडीबद्दल सांगतिये). ती कधीतरी शिल्लक असते. प्रकार दुसरा शिल्लक होता. तो आणून ही पाकृ केली. भेंडीची भाजी मुलगा खातो पण आज त्याने आपण होऊन जास्तीची वाढून घेतली, जे कधी होत नाही. मायक्रो पाकृ असल्याने परतत बसण्याचा प्रकार नव्हता. त्यानेच बरे वाटले. पुन्हा भेंडी आणीन तेंव्हा याच प्रकाराने करीन.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 41 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 1 minute ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा