Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

थंडीसाठी झटपट आणि पौष्टीक लाडू

र
रुपी
गुरुवार, 01/05/2017 - 23:03
l साहित्यः १ वाटी गूळ १/४ वाटी डिंक पावडर १/२ वाटी खारीक पावडर १/२ वाटी सुकलेले खोबरे - बारीक किसून १/२ वाटी बदाम पावडर १/४ वाटी अक्रोड पावडर १ टे.स्पून सुंठ पावडर १ टे.स्पून खसखस पावडर तूप - साधारण अर्धी वाटी कृती: १. कढईमध्ये ३ टे.स्पून तूप घेऊन गरम करा. २. त्यात डिंक पावडर घालून फुलवून घ्या आणि एका भांड्यात काढून ठेवा. ३. त्याच कढईत आणखी २ चमचे तुपात बारीक केलेला गूळ वितळवून घ्या. गूळ वितळवून घ्यायचा आहे, त्यामुळे अगदी बारीक किसून घ्यायची गरज नाही. ४. गूळ वितळला की कढई आचेवरुन उतरवा. ५. फुलवून घेतलेला डिंक आणि उरलेले तूप आणि बाकीचे साहित्य गुळात घालून एकत्र करा. ६. या मिश्रणाचे लगेच लाडू वळा. मिश्रण कोरडे वाटत असल्यास थोडे आणखी तूप घाला. थंडीसाठी पौष्टीक लाडू तयार आहेत. टीपः मी यातले सर्व साहित्य पावडर करुनच ठेवलेले होते. त्यामुळे लाडू फार झटकन झाले. पहिल्यांदा केले तेव्हा लाडू जास्त गोड वाटले, म्हणून पुढच्या वेळी गुळाचे प्रमाण कमी आणि तूप थोडे जास्त घेतले. तुम्ही आवडीप्रमाणे कमी-जास्त करु शकता. शिवाय, हवे असेल तसे काजू, जवस पावडर, तीळ आवडीप्रमाणे घालून बनवू शकता.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6358 views

💬 प्रतिसाद
प
पद्मावति गुरुवार, 01/05/2017 - 23:07 नवीन
आहा, क्लास दिसताहेत लाडू.
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 01/06/2017 - 04:42 नवीन
मस्त आणि सोपी पाकृ.
  • Log in or register to post comments
म
मनिमौ Wed, 01/11/2017 - 06:34 नवीन
डिंक सोडला तर बाकी सगळे सामान आहे.
  • Log in or register to post comments
प
पल्लवी०८ Mon, 02/27/2017 - 08:04 नवीन
थंडीच्या दिवसात खाण्यासाठी खरच उत्तम पर्याय आहेत हे लाडू!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 02/27/2017 - 08:50 नवीन
खूप मस्त लागतात ! मी दोन बदल केले. १. बदाम पूड न करता तुकडे केले आणि मावेमध्ये रोस्ट करून मग घातले. २. गूळ गॅसवर गरम न करता किसून मिसळला आणि मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून, तूप पातळ करून घातले, मग केले लाडू. मस्त खुसखुशीत झाले :)
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Mon, 02/27/2017 - 12:38 नवीन
यम्म लाडू
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 27 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 39 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 43 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा