Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

व्हेज गोल्ड कॉइन / सेंसमी टोस्ट

क
केडी
Tue, 01/03/2017 - 13:28
VegGoldCoin1 साहित्य १० ब्रेड स्लाईस २ मध्यम आकाराचे बटाटे, उकडून, किसून २ बारीक चिरलेल्या शिमला मिरच्या ४ ते ५ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून १/२ इंच आलं, बारीक चिरून ८ ते १० लसूण पाकळ्या, बारीक चिरून १ बारीक चिरलेला कांदा २ मोठे चमचे सोया सौंस १ चमचा मिरपूड (असल्यास सफेद) मीठ चवीनुसार १/२ कप कॉर्नफ्लॉर ३ ते ४ चमचे पांढरे तीळ तळणीसाठी तेल कृती ब्रेडच्या कडा काढून वाटीने गोलाकार कापून घ्या. बटाट्यांपासून ते मीठा पर्येंत सर्व जिन्नस एका बाऊल मध्ये मिक्स करून घ्या. हे मिश्रण आता ब्रेडच्या कॉइन वर दाबून बसवा. एका ताटलीत तीळ पसरवून, ब्रेड चे मिश्रण लावलेले कॉइन तिळाच्या ताटलीत दाबून घ्या. सगळ्या ब्रेड च्या कॉईन्स ना मिश्रण आणि तीळ लावून झाले कि ते फ्रिज मध्ये साधारण २० ते २५ मिनिटे ठेऊन द्या. कॉर्नफ्लॉर मध्ये पाणी घालून त्याची पातळीशी पेस्ट बनवून घ्या. कढईत तेल गरम करून, कॉईन्स कॉर्नफ्लॉर च्या पेस्ट मध्ये घोळवून, मंद आचेवर हे कॉईन्स तळून घ्या. गरम गरम व्हेज गोल्ड कॉईन्स शेजवान सौंस बरोबर खायला घ्या! ह्यात चिकन चे शिजवलेले तुकडे घालून, चिकन गोल्ड कॉईन्स बनवू शकता. बऱ्याच हॉटेल मध्ये एक चायनीज स्टार्टर म्हणून हा पदार्थ सेंसमी टोस्ट नावाखाली मिळतो. भाज्यांमध्ये स्वीट कॉर्न चे दाणे पण वापरून बघू शकता, कांद्या ऐवजी, कांदेपात वापरून बघा. VegGoldCoin2

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 10553 views

💬 प्रतिसाद
क
कैवल्यसिंह Tue, 01/03/2017 - 14:10 नवीन
वा वा काय दिसतेय पाककृती... एकदम झक्कास.... जाम भारी... मोबाईलच्या स्क्रिनमधे हात घालता आला आसता.. तर सगळे मीच संपवले आसते सगळे गोल्ड कॉईन... :-) :-)
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 01/03/2017 - 14:30 नवीन
अहाहा!! ह्याचं एयर फ्रायर व्हर्जन होऊ शकेल ना?
  • Log in or register to post comments
क
केडी Tue, 01/03/2017 - 18:00 नवीन
एयर फ्रायर मध्ये सुद्धा होतील हे, प्रयत्न करून बघायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
क
के.पी. Tue, 01/03/2017 - 14:51 नवीन
पाकृचं नाव वाचल्यावर वाटलं की किचकट पाकृ असणार बहुतेक,पण ही तर फारच सोप्पी आहे! मस्त..
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Tue, 01/03/2017 - 15:58 नवीन
मस्त पाकृ!
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Tue, 01/03/2017 - 15:58 नवीन
मस्त पाकृ!
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 01/03/2017 - 16:11 नवीन
एकदम सोप्पी!!!
  • Log in or register to post comments
स
सही रे सई Tue, 01/03/2017 - 16:14 नवीन
मस्तच.. तोंपासू
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Tue, 01/03/2017 - 17:32 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Tue, 01/03/2017 - 18:51 नवीन
मस्त पाककृती
  • Log in or register to post comments
अ
अजया Wed, 01/04/2017 - 03:22 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Wed, 01/04/2017 - 07:54 नवीन
यात मी मका, गाजर आणि खूप बारीक चिरून फ्रेन्च बीन्स पण घातल्या. भन्नाट मस्त झाली कॉईन्स. धन्यवाद
  • Log in or register to post comments
क
केडी Wed, 01/04/2017 - 08:51 नवीन
फोटो काढले असतील तर इथे जरूर टाका!
  • Log in or register to post comments
क
केडी Sat, 01/07/2017 - 12:41 नवीन
सविता००१ हिने केलेल्या ह्या पाककृती चा फोटो इथे देत आहे. तिला सध्या मिपा वर फोटो टाकणे जमत नाहीये म्हणून... मस्त आलाय फोटो, आणि मांडणी झकास केली आहे! Image removed.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Sat, 01/07/2017 - 14:49 नवीन
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Sat, 01/07/2017 - 14:50 नवीन
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Sat, 01/07/2017 - 14:50 नवीन
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Sat, 01/07/2017 - 15:24 नवीन
चुकून तीनदा झाला प्रतिसाद. कसा काय ते नाही कळालं. केडी: मोठ्ठ काम केलस माझ तू. धन्स रे
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Wed, 01/04/2017 - 14:26 नवीन
फोटो फारच कातील आलेत....
  • Log in or register to post comments
र
रुपी Wed, 01/04/2017 - 20:38 नवीन
मस्त.. तोंपासु :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 01/05/2017 - 11:42 नवीन
दुत्त दुत्त! Image removed.
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 01/05/2017 - 14:05 नवीन
सुंदर, विकांती करुन बघणेत येईल.
  • Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब Fri, 01/06/2017 - 04:05 नवीन
ब्रेड फ्राय केला तर किती ऑइल पिणार सन? एअर फ्रायर व्हर्जन दे नी दिकरा.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा