Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

आमला मुर्ग

क
केडी
Mon, 12/26/2016 - 06:45
Amla Murg-1 साहित्य ७०० ते ८०० ग्रॅम चिकन, तुकडे करून ६ ते ८ मोठे आवळे १ इंच आलं १० ते १२ लसूण पाकळ्या ४ ते ६ हिरव्या मिरच्या २ माध्यम आकाराचे कांदे १ चमचा गरम मसाला १ चमचा लाल तिखट १/२ चमचा हळद १ चमचा धने पावडर १/२ चमचा जिरें पावडर मीठ, चवीनुसार २ कप पाणी ३ मोठे चमचे तेल थोडी कोथिंबीर, चिरून हि पाककृती मला कैरी मुर्ग वरून सुचली. घरात आवळे होते, कैरी ऐवजी ते वापरून बघितले, आणि आंबट तिखट असा चिकन चा रस्सा जिरा राईस बरोबर ओरपला! ह्याची ग्रेव्ही शक्यतो जरा पातळच ठेवायची, म्हणजे भाता बरोबर खाताना लज्जत येते! कृती आवळ्याच्या बिया काढून फोडी करून घ्या. निम्म्या फोडी, अर्ध आलं, निम्म्या लसूण पाकळ्या, निम्म्या हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडंसं मीठ घालून मिक्सर मधून बारीक वाटून घ्या. चिकनचे तुकडे स्वच्छ धुऊन, कोरडे करून घ्या. ह्या तुकड्यांना वाटलेला मसाला लावून, चिकन किमान एक तास मुरत ठेवा (कच्चे चिकन कायम फ्रिज मध्ये ठेवावे, मुरताना सुद्धा). कांदे, उरलेलं आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या मिक्सर मधून बारीक वाटून घ्या. पॅन मध्ये तेल घालून, हे मिश्रण परतून घ्या. मिश्रण छान परतून झालं, हि ह्यात मुरलेले चिकनचे तुकडे घालून, मोठ्या गॅस वर ५ ते ६ मिनिटे परतून घ्या. परतताना ह्यात, लाल तिखट, हळद, जिरें आणि धने पावडर घाला. मसाला सगळ्या चिकनच्या तुकड्यांना व्यवस्थित लागला, आणि चिकनचा रंग पांढरट झाला, कि गॅस बारीक करून, पॅन मध्ये २ कप पाणी घाला. पॅन वर झाकण ठेवून, चिकन मंद आचेवर शिजू द्या (साधारण २० ते २५ मिनिटे). अधून मधून हलवत राहा. चिकन शिजत आलं, कि त्यात उरलेले आवळ्याचे तुकडे, गरम मसाला घालून पुन्हा झाकण ठेऊन अजून ५ ते ७ मिनिटे शिजून घ्या. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून, चव बघून लागेल तसं मीठ घाला. जिरा राईस किंवा पोळी, बरोबर गरम गरम खायला घ्या!! Amla Murg-2

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4527 views

💬 प्रतिसाद
क
केडी Mon, 12/26/2016 - 06:48 नवीन
मागल्या आठवड्यात प्रकाशित केलेली, पण server down झाल्यामुळे उडालेली पाकृ परत टाकत आहे. ह्या वेळी फोटो दिसतील अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 01/01/2017 - 14:04 नवीन
प्र'कटण सुरू- क्रिप्या आपून लवकरात लवकर एक हाटेल काडावे, आनी अश्या इविध पा. क्रु. करूण त्या खान्यास थितेच बलवावे. हिते फोटू टाकूण छळू णये. अशी विणम्र विणंती! प्र'कटण खलास! ढण्यवाड!
  • Log in or register to post comments
क
केडी Mon, 01/02/2017 - 07:14 नवीन
देव करो आणि तुमची हि ईच्छा पूर्ण होवो! :-) :-)
  • Log in or register to post comments
क
कैवल्यसिंह Mon, 01/02/2017 - 16:06 नवीन
मस्त पाककृती आहे... यात चिकन ऐवजी मटन व फिश वापर्लेतर चालते का?
  • Log in or register to post comments
क
केडी Tue, 01/03/2017 - 10:12 नवीन
मटण चालू शकेल, पण ते आधी शिजवून घ्या किंवा मग प्रेशर कुकर मध्ये ५ ते ६ शिट्ट्या काढून आमला मटण शिजवावे.
  • Log in or register to post comments
न
नरेश माने Tue, 01/03/2017 - 08:16 नवीन
मस्त पाक़कृती आणि फोटो एकदम तोंपासु.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा