Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

एयर फ्राईड इटली

ल
लीना कनाटा
Fri, 12/23/2016 - 15:30
प्रेरणा : केडीभाऊ, स्वादि आणि सास्व तैं व इतर उपकरण : टफ्फल एयर फ्रायर कृती : १) प्रथम नेहेमी प्रमाणे इटल्या कराव्यात. इटली पात्रातून काढून थोड्या गार झाल्यावर इटल्या अर्ध्या कापाव्यात. त्या अर्ध्या भागाचे पुन्हा दोन उभे भाग करावेत. अशा रीतीने एका इटलीचे चार उभे भाग होतील. २) १० इटल्यांचे ४० उभे काप एयर फ्रायर मध्ये टाकावेत. इटल्यांच्या तुकड्यांवर १ चमचा तेल टाकावे. ऑइल स्प्रे असेल तर अत्युत्तम. ३) एयर फ्रायर १५ मिनिटांसाठी चालू करावा. १५ मिनिटांनंतर रागरंग बघून, खरं म्हणजे इटल्यांचा रंग बघून आणखी १० किंवा १५ मिनिटे फ्रायर चालू करावा. आता मात्र जवळपास थांबून बकध्यान किंवा इट्लीध्यान करावे. इटल्यांना अपेक्षित तांबूस सोनेरी रंग चढला कि एयर फ्रायर बंद करावे. ४) फ्राईड इटल्या बाहेर काढून डिश मध्ये मांडाव्यात. टोमॅटो किंवा तत्सम डिपींग सॉस बरोबर असावा. मोबल्याच्या मदतीने १, २ फटू खेचावेत. ५) फ्राईड इटल्यांचा गिल्ट-फ्री फन्ना उडवावा. छान क्रिस्पी होतात. ६) यथावकाश मोबल्या वरचा फटू इथे शेर करावा. एयर फ्राईड इटली तळटीप : माझ्या आधी केलेल्या सगळ्या इटल्या सर्व्हर ने खाल्ल्या मुळे नवीन इटल्या केल्या आहेत. त्या संपण्याआधी आस्वाद घ्यावा, हि विनंती.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 11593 views

💬 प्रतिसाद
य
यशोधरा Fri, 12/23/2016 - 15:32 नवीन
इटली नाय हो, इडली. बाकी फोटो मस्त दिसतो आहे.
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 12/23/2016 - 15:49 नवीन
मागील्वेळचाच प्रतिसाद देते कारण ते फार मनात आहे की फ्राईड इडलीबरोबर सांबार खाऊन पहायचे आहे.
  • Log in or register to post comments
ल
लीना कनाटा Sat, 02/04/2017 - 01:26 नवीन
रेवाक्का, खास तुमच्या साठी फ्राईड इटल्या विथ सांबार Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 02/12/2017 - 14:02 नवीन
फोटू आवडले. आता इडल्या करताना मुद्दाम थोड्या जास्त उरवून फ्राईड इडल्या करणार व सांबारही जास्त करणार. धन्यवाद फोटू आठवणीने दिल्याबद्दल.
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 12/23/2016 - 17:15 नवीन
परत एकदा मागचा प्रतिसाद. यात सिसिली कुठली आणि नेपल्स कुठले ते सांगा. ते मधले सेंट पिटर्स बॅसिलिका आहे का? आणि यात इंग्लंड (अंड शी ऱ्हाइम् होतं म्हणून) घालून करता येईल का? ;-)
  • Log in or register to post comments
ल
लीना कनाटा Sat, 12/24/2016 - 18:18 नवीन
येस्सार, काय म्हंता कायबी कळ्ळना. सेंट टफ्फल्स इटॅलिका समजून खावा कि.
  • Log in or register to post comments
अ
अजया Sat, 12/24/2016 - 06:08 नवीन
=)))
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Sat, 12/24/2016 - 07:37 नवीन
सॉस सोबत का खायच्या पण? इडल्या सांबार आणी चटनी सोबतच खाव्यात!!!
  • Log in or register to post comments
प
प्रियाजी Sat, 12/24/2016 - 10:52 नवीन
लीना कनाटा, इटल्या फारच आवडल्या. नेहमीच्या इडल्या केल्यावर ह्या नक्की करणार. पण एअर फ्रायर नसल्याने फ्रायपॅन मध्ये प्रयोग केले जातील.
  • Log in or register to post comments
प
पियुशा Mon, 12/26/2016 - 09:26 नवीन
वा वा भारी कलपाना आहे ही :)
  • Log in or register to post comments
ल
लीना कनाटा Tue, 12/27/2016 - 01:34 नवीन
पियुशा ताई, या इटल्या काल्पनिक नाहीयेत. या खऱ्याखुऱ्या फ्राईड इटल्या आहेत. फस्त करायच्या आधीचा फटू पण आहे.
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 12/27/2016 - 03:36 नवीन
लीनामामी, अहो त्या म्हणत आहेत की इडल्या अशा एअर फ्रायरमध्ये फ्राय करायची कल्पना भारी आहे. तुमच्या इडल्या, आपलं ते इटल्या काल्पनिक आहेत असं त्यांचं म्हणणं नाहीये! ;-)
  • Log in or register to post comments
स
साहेब.. Tue, 12/27/2016 - 04:22 नवीन
मला इडली कोरडी खायला आवडते. कधीतरी करून पाहील हा प्रकार.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Tue, 12/27/2016 - 05:27 नवीन
या इडल्या माइक्रोवेव ओवनमध्ये कश्या करायच्या?
  • Log in or register to post comments
ल
लीना कनाटा Sun, 01/01/2017 - 04:53 नवीन
Image removed. उपकरण : टफ्फल एयर फ्रायर कृती : नेहेमी प्रमाणे साबुवडे करावेत. तेलात तळण्या ऐवजी हवेवर तळावेत. बाहेरून छान क्रिस्पी होतात आतून सॉफ्ट राहतात. गिल्ट फ्री फन्ना उडवावा.
  • Log in or register to post comments
ल
लीना कनाटा Mon, 01/02/2017 - 21:33 नवीन
पील (सोलणे ), कट (कापणे), सोक (पाण्यात भिजवणे), ड्रेन (सुकवणे), फ्रीझ (थंड करणे) इत्यादीची झंझट नको, कच्चे कट पोटॅटो फ्रेंच फ्राईज विकत आणावेत. तेलात तळण्या ऐवजी फक्त एक चमचा तेल वापरून सोनेरी रंगाचे होईपर्यंत हवेवर तळावेत. बाहेरून छान क्रिस्पी होतात आतून सॉफ्ट राहतात. मीठ, मिरपूड भुरभुरावी किंवा सॉस बरोबर गिल्ट फ्री फन्ना उडवावा. Image removed.
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 01/03/2017 - 00:56 नवीन
लीनामामींनी नव्या पदार्थांचा दणका लावलाय. साबूदाण्याचे वडे व (फ्राय न केलेले) फ्राईज आवडले. फ्राईज विकत तरी कश्याला आणायचे? घरी कापलेले नाही का चालणार?
  • Log in or register to post comments
ल
लीना कनाटा Tue, 01/03/2017 - 02:50 नवीन
वर लिवलंय कि, सोकापाभिसुथं ची झंझट नगं म्हून इकत आणायची बटाट्याची काचरं. आनि हि समदी क्रुती लिवायचा टंकाळा :)
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 01/03/2017 - 03:21 नवीन
लाईट बिल खुप येतं का हो हे वापरलं की?
  • Log in or register to post comments
ल
लीना कनाटा Tue, 01/03/2017 - 05:24 नवीन
एयर फ्रायर १,४०० वॉट चा आहे. वर दिलेल्या पाकृंना साधारणतः २० ते २५ मिनिटे लागतात. म्हणजे अर्धा (०.५) किलोवॉटआवर (kWh) वीज खर्च होते.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sun, 02/12/2017 - 15:34 नवीन
इटलीचे त्रुस्कनी, लोम्बारर्डिनी व्हेनेझिया असे काही भाग आहेत म्हणे पण फ्राईड इटली असा काही भाग गुगलवर दिसत नाहीय !!!! )))))
  • Log in or register to post comments
ल
लीना कनाटा Sun, 02/12/2017 - 17:41 नवीन
अहो चौराकाका, हि सोनियांची इटली नाही हो. हि उडप्या कडे मिळते ना ती इटली. ती कापायची आणि सोनियाचा रंग येई पर्यंत तेलात किंवा हवेवर तळायची. शोधायची असेल तर उडप्या कडे शोधा, गुगल वर नव्हे :)
  • Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब Mon, 02/13/2017 - 04:46 नवीन
एअर फ्रायर पाककृती फर्मास आहेत, बाकी सगळे ओढून ताणून 'मी कशी नवी आहे इथे' हे भासवायला केलेले प्रतिसाद वाटत आहेत. असो.
  • Log in or register to post comments
ल
लीना कनाटा Tue, 02/14/2017 - 04:34 नवीन
धन्स ओपी साहेब. बाकी प्रतिसादावरून नवं जुनं कसं कळते म्हणे?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 24 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 36 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 40 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा