चीज कडक (दगडच) झालय ते मऊ होण्यासाठी काय करता येईल??
आमच्या घरी आम्ही आमूल कंपनीचे मोज्जारेला चीज आणलयं पन ते खुपच कडक झालयं...
कोनीतरी मला सांगीतले की मिक्सरवर बारीक करा... पन मला शंका आहे की मिक्सरवर जर टाकुन फिरवले तर मिक्सरची पाती रहातील का?..
आणि हो... ते चीज इतकं कडक झालय कि ते कापताही येत नाहीये व किसताही येत नाहीये.... दगडच होऊन बसलाय त्याचा... कोणावर फेकला तर दुखापत होईल ईतपत कडक झालय ते...
बहुतेक थंडीमुळे ते चीज कडक झाले आसावे का?
कडक झालेले चीज आजुन कोणत्या मार्गाने मऊ करता येईल जेणेकरुन ते आम्हाला पदार्थांमधे वापरता येईल?
कृपया यावर ऊपाय सांगावेत/मार्ग सुचवावा...
- KaivalyaDj
💬 प्रतिसाद
प
प्रसाद गोडबोले
Fri, 12/23/2016 - 18:34
नवीन
ऐरणीच्या देवा तुला ठिंणगी ठिणगी वाहु दे
अभाळागत माया तुझी आम्हावरी राहु दे
भेंड्या खेळायला सुरुवात केली अस्सा गैरसमज कृपया करुन घेवु नये.
ह्या गाण्यामध्ये दाखवली पध्दत वापरुन पहा चीज मऊ होते का ते असे सुचवायचे आहे =))))
- Log in or register to post comments
श
शकु गोवेकर
Fri, 12/23/2016 - 19:58
नवीन
फक्त त्याला रात्र भर गरम पाण्यात रात्रभर भिजत ठेवा सकाळ पर्यंत हे चीज पातळ होईल व सुरीने कापता येईल
- Log in or register to post comments
अ
अमर विश्वास
Fri, 12/23/2016 - 20:04
नवीन
जर ते फ्रेश मोझरीला असेल तर कोमट पाण्यात ठेवा ... १५-२० मिनिटात वापरण्या योग्य होईल
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sat, 12/24/2016 - 05:19
नवीन
.
- Log in or register to post comments