Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

मायक्रोवेव्ह पापलेट

आ
आनंदी गोपाळ
गुरुवार, 12/08/2016 - 18:46
शिजवण्या आधीचा फोटो: 1before.jpg सर्वात आधी पापलेट फ्रीझरमधून काढून मावेच्या डीफ्रॉस्ट सेटिंगनुसार डीफ्रॉस्ट करावे. मी मावेसेफ झिपलॉक बॅगमधे एकेक पापलेट धुवून कोरडे करून घालून ठेवतो. ४-५ दिवस टिकतात. साहित्यः पापलेट, काकडी/टमाट्याच्या चकत्या, फोटूत दिसताहेत तशा. टमाट्यावर थोडं मीठ चिमटीतून घाला. मसाला/मॅरिनेशनः माबोवरचा वर्‍हाडी ठेचा १ चमचा. बारीक चिरलेली कोथिंबीर बचकभर धणेपूड १ चमचा जिरेपूड चिमूटभर थोडं मीठ चिंचेचा रेडीमेड कोळ सुमारे अर्धा-पाऊण चमचा थोडी हळद. १ चमचा तेल. ३ चमचे रेड वाईन हे सगळं एकत्र कालवून मासा अन काकडी टमाट्याला चोळून धीर धरवेल तिथवर ठेवा. मग मावेच्या क्रिस्प प्लेटला तेलाचा हात लावून वरच्या फोटूत दिसतंय तसं रचून ठेवा. मावे सेटिंग : क्रिस्प मोड (पिझ्झा करतो ते, त्याच प्लेटमधे.) पहिली साईड ७ मिनिट, मासा उलटवून ३ मिनिट. पापलेट छान मोठा १०० ग्रामपेक्षा जास्त होता. ती प्लेट ३० लिटरच्या मावे मधली आहे. मासा लहान असेल तर थोऽडा कुकिंगटाईम कमी करायला लागेल. अधिक क्रिस्पी हवं असेल तर थोडं तेल वरून घालून पुन्हा १-२ मिंटं क्रिस्प करावं. मला पोळीसोबत खायला थोडं ओलसर हवं होतं. फायनल प्रॉडक्ट :2after.jpg टीप : छान झाला होता ;)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7291 views

💬 प्रतिसाद
ए
एस गुरुवार, 12/08/2016 - 20:10 नवीन
अजून एक अत्याचार! मार्गशीर्ष चालू आहे हो! त्रिवार निषेध. (सवांतर- पापलेट कॅशलेस विकत मिळतात काय पुण्यात कुठे?)
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Sat, 12/10/2016 - 07:02 नवीन
Khup swast hotat mase marg shirish mahinyat
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 12/10/2016 - 07:14 नवीन
हल्ली नाही स्वस्त वगैरे होत मासे काही :)
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 12/09/2016 - 01:53 नवीन
चिल्ड बीअर आणि क्रिस्पी पापलेट... घेऊन टाक.
  • Log in or register to post comments
ब
बाजीप्रभू Fri, 12/09/2016 - 02:15 नवीन
तोंडाला पाणी सुटलं, फायनल प्रोडक्ट दाखवलेत तसे शेवटचे अवशेषहि दाखवा.
  • Log in or register to post comments
क
केडी Fri, 12/09/2016 - 10:15 नवीन
मज्जा आ गया..! मस्त सुटसुटीत पाकृ!
  • Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ Fri, 12/09/2016 - 11:21 नवीन
पापलेट हे नाव ऐकूनच णिषेध...! बाकी फोटो दिसत नसल्याने आत्म्याला शांती मिळाली :D
  • Log in or register to post comments
ए
एस.योगी Sat, 12/10/2016 - 06:54 नवीन
उत्तम पाकृ आहे, परंतु *निषेध - पापलेट पोळीसोबत ?
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Sat, 12/10/2016 - 07:03 नवीन
मस्त दिसतंय.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 12/10/2016 - 11:47 नवीन
तुमचे हे असले उपद्व्याप लै भारी असतात!
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Sat, 12/10/2016 - 17:00 नवीन
मागे ते शेकोटी चिकन, आता हे ...एकदा बोलवाच बुवा ..... खतरनाक दिसतोय एंड प्रोडक्ट
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Sun, 12/11/2016 - 08:08 नवीन
दिसतोय भारी. तरी मला कुरकुरीत तळलेले जास्त आवडतात.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 43 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    16 hours 56 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    16 hours 57 minutes ago
  • सुंदर !!
    16 hours 59 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 3 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा