Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

खरवसाची वडी

अ
अनन्न्या
Wed, 11/30/2016 - 08:16
kharvas साहित्यः पहिल्या दिवसाचा चीक दोन वाट्या, साखर दोन वाट्या, वेलची पावडर, दूध दोन वाट्या, केशर, बदामाचे काप. kharvas कृती: पहिल्या दिवसाचा चीक नुसताच शिट्टी न लावता १५ मिनिटे कुकरला वाफवून घ्यावा. गार झाला की भांड्यातून काढून किसावा. मी अर्धा चीक मिक्सरला फिरवून घेतला. जेवढा चीक असेल तेवढी साखर, चीक आणि दूध कढईत एकत्र करावे. kharvas मध्यम आचेवर मिश्रण ढवळत रहावे. एकजीव झाले की वेलची पावडर आणि केशर मिसळावे. kharvas ताटाला तूप लावावे. मिश्रणाचा गोळा होत आला की ताटात थापावे. गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. हवे असल्यास बदामाचे काप सजावटीसाठी लावावे. kharvas गोडीला कमी हवे असेल तर साखरेचे प्रमाण कमी घ्यावे. पूर्वी मुंबईकर मंडळींना लगेच चिकाचे दूध पाठवता येत नाही, म्हणून अशा वड्या करून खरवस पोहोचवला जायचा.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 16647 views

💬 प्रतिसाद
त
त्रिवेणी Wed, 11/30/2016 - 08:22 नवीन
बरीच कठीण य बै रेसिपी.इथे मुळात चिक दिसायची मारामार वड्या कधी करणार. बाकी फोटू नेहमीप्रमाणे मस्त.परत एक रत्नागिरी ट्रिप करतेच आता.
  • Log in or register to post comments
व
विचित्रा Wed, 11/30/2016 - 10:00 नवीन
चीक नसला तरी दुधात मिल्क पावडर मिसळून करता येतो खरवस.
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Wed, 11/30/2016 - 13:51 नवीन
टिकाऊ वडी आहे चिकाची!
  • Log in or register to post comments
म
मंजूताई Wed, 11/30/2016 - 08:28 नवीन
आम्हीपण अगदी शेम टु शेम अश्शीच करतो :) खूप दिवस टिकतात. बाकी वड्या भारी दिसताहेत.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 11/30/2016 - 08:43 नवीन
जबराट!
  • Log in or register to post comments
म
मितान Wed, 11/30/2016 - 08:56 नवीन
आमच्याकडे पण अशाच करतात . कमी गोड करायच्या म्हणून साखर कमी घातली तर वड्या खुटखुटीत कशा होतील असं वाटतंय. परवा नुसता खरवस करताना गुळ कमी पडला तर वड्या वेगळ्या लागत होत्या.
  • Log in or register to post comments
G
gogglya गुरुवार, 12/01/2016 - 10:34 नवीन
पिं चिं मध्ये खरवसाचे दुध कोठे मिळेल ?
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Wed, 11/30/2016 - 09:32 नवीन
पण वडीला थोडी कमी साखर चालते.
  • Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ Wed, 11/30/2016 - 09:35 नवीन
मस्त दिसतायत वड्या
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Wed, 11/30/2016 - 09:42 नवीन
तोंपासू दिसत आहेत वड्या. पण अजून कधी खायचा योग आला नाहिये सो चवीबाबत अजाण आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Wed, 11/30/2016 - 13:50 नवीन
तुम्हाला तर नक्कीच आवडेल, थोडे पनीरसारखे लागते.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Wed, 11/30/2016 - 10:07 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 11/30/2016 - 10:16 नवीन
वरुन तिसर्‍या चित्रातला किस पाकात आहे की तळताय?
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Wed, 11/30/2016 - 13:48 नवीन
तळालेला नाही
  • Log in or register to post comments
प
पियुशा Wed, 11/30/2016 - 10:33 नवीन
सही दिसताहेत :)
  • Log in or register to post comments
अ
अजया Wed, 11/30/2016 - 17:36 नवीन
तोंपासु.चिक कुठून मिळवायचा आम्ही :( या टिकाऊ वड्या आहेत ना?मग अनन्न्या घेऊन ये ना मुंबईला ;)
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या गुरुवार, 12/01/2016 - 04:31 नवीन
पाठवते
  • Log in or register to post comments
प
पुंबा Wed, 11/30/2016 - 17:37 नवीन
कातिल दिसतायत वड्या.. माझी आईदेखील अश्याच करते..
  • Log in or register to post comments
स
सही रे सई Wed, 11/30/2016 - 17:59 नवीन
तोंपासु.चिक कुठून मिळवायचा आम्ही :( -> अगदी माझ्या मनातल बोललीस अमेरिकेत मिळतो का ते प्लीज कोणीतरी सांगा.
  • Log in or register to post comments
र
रुपी Wed, 11/30/2016 - 19:29 नवीन
चायनाग्रास बनवून बघा. अगदी खरवस नाही, पण बर्‍यापैकी त्याच्या जवळ जाणारा पदार्थ आहे. बाकी, वड्या मस्त दिसत आहेत, पण चीक मिळालाच तर खरवसच खाणे जास्त आवडते.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 11/30/2016 - 18:44 नवीन
खरवस आणि या वड्या खाऊन युगं लोटलीत असं वाटतंय.... अतिशय आवडता पदार्थ. पुण्यात असताना कधीतरी जनसेवात जाऊन खरवस खायचो. (नेमका जेवायच्या वेळी धागा समोर आला पण उघडला नाही त्याचं आत्ता बरं वाटतंय! :) )
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 11/30/2016 - 20:22 नवीन
जेंव्हा सहजगत्या चीक मिळायचा व सर्व प्रकार घरी व्हायचे तेंव्हा आवडायचे नाहीत पण आता चीक मिळत नाहीये म्हटल्यावर हवीहवीशी वाटणारी पाकृ. फोटू चांगला आलाय.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 12/01/2016 - 12:47 नवीन
खरवस आमच्याकडे महिन्यातून २-३ वेळा तरी नक्की होतो. वड्यांविषयी पहिल्यांदाच माहिती होतंय. पुढल्यावेळी चीक आल्यावर ट्राय करायला लावतो.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 12/01/2016 - 12:50 नवीन
मस्त दिसताहेत वड्या ! बराच खटाटोप आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या गुरुवार, 12/01/2016 - 13:09 नवीन
तयारीसह तासभर लागतो. शिजलेला चीक गार होण्यासाठी थांबावे लागते म्हणून!
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 12/01/2016 - 12:56 नवीन
छान प्रकार!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 12/01/2016 - 14:36 नवीन
मस्त प्रकार ! अजुन तरी हा पदार्थ चाखायची संधी मिळालेली नाहीये.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तेरे गीतों कि में दिवानी...ओ दिलबर जानी.तुने कही और मैंने मानी...ओ दिलबर जानी. :- Prem Geet
  • Log in or register to post comments
भ
भुमन्यु Fri, 12/02/2016 - 10:34 नवीन
१. मिक्सर मधुन चिक काढुन घेतल्यास वडी एकजीव होते. (पण मला किसलेल्या चिकाचीच वडी आवड्ते घरी सगळ्यांना दुसर्‍या पद्धतीने केलेली आवडते) २. खरवसाबरोबर खोवलेलं नारळ घालुन पण वडी छान लागते.
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Sat, 12/03/2016 - 04:44 नवीन
खोबरं घातलं की जास्त टिकत नाहीत म्हणून नाही घातलं.
  • Log in or register to post comments
स
सन्तोश नारकर Mon, 01/23/2017 - 15:25 नवीन
मस्तच १ न॑बर
  • Log in or register to post comments
म
मनिमौ Mon, 01/23/2017 - 17:54 नवीन
पण खरवस आवडत नाही सो माझा पास
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 01/23/2017 - 21:08 नवीन
ग्रेट रेसिपी. जेंव्हा चीक मिळायचा तेंव्हा का नाही या वड्या केल्या असा प्रश्न पडलाय. एकांकडे अशी वडी खाल्ली होती. फार्फार आवडता पदार्थ आहे. तू काढलेले फोटू आवडले.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 43 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    16 hours 56 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    16 hours 57 minutes ago
  • सुंदर !!
    16 hours 59 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 3 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा